Current Affairs of 23 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2016)

विधिमंडळाचे विशेष अधिवेशन :

  • संसदेत संमत झालेल्या संविधान (122 वी सुधारणा) विधेयकाच्या समर्थनासाठी अर्थात वस्तू आणि सेवाकर विधेयकाच्या मंजुरीसाठी (जीएसटी) 29 ऑगस्ट रोजी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन अभिनिमंत्रित करण्याची शिफारस राज्यपालांना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
  • संविधान (122 वी सुधारणा) विधेयक, हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले आहे.
  • तसेच या विधेयकातील सुधारणांना भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 368 खालील खंड (2) च्या उपखंड () आणि () मधील तरतूद लागू होत असल्यामुळे विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळण्यासाठी देशातील निम्म्याहून अधिक राज्य विधिमंडळांचे समर्थन आवश्‍यक आहे.
  • त्यामुळे या विधेयकाच्या समर्थनासाठी राज्य विधिमंडळाचे एक दिवसाचे अधिवेशन बोलविण्यात आले असून, त्याच दिवसाच्या सभागृहाच्या बैठकीच्या समाप्तीनंतर संस्थगित करण्याविषयी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • संपूर्ण देशामध्ये अप्रत्यक्ष कराची एकसमान पद्धती लागू करण्याच्या हेतूने वस्तू व सेवा करप्रणालीचा अवलंब करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिलेल्या संविधान (एकशे बाविसावी सुधारणा) विधेयक 2014 ला अनुसमर्थन दर्शवण्यासाठी प्रस्ताव विधिमंडळासमोर सादर करावयाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
  • लोकसभेने संविधान (122 वी सुधारणा) विधेयक-2014 हे विधेयक सहा मे 2015 रोजी मंजूर केल्यानंतर राज्यसभेकडे संमतीसाठी पाठविण्यात आले होते.
  • राज्यसभेने या विधेयकात काही बदल सुचविले. त्यानंतर या बदलासह तीन ऑगस्ट 2016 रोजी राज्यसभेने त्यास मंजुरी दिली.
  • तसेच हे बदल स्वीकृत करीत लोकसभेत हे संविधान सुधारणा विधेयक आठ ऑगस्ट 2016 रोजी मंजूर करण्यात आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2016)

‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर :

  • पी.व्ही. सिंधू, दीपा कर्माकर, साक्षी मलिक यांना भारतातील सर्वोत्तम ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर वर्षभर सातत्याने नेमबाजीत शान उंचावलेला जितू राय हाही या पुरस्काराचा मानकरी ठरला.
  • दीपा कर्माकरला घडवलेल्या बिश्‍वेश्‍वर नंदी यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.
  • जागतिक स्पर्धेपाठोपाठ ऑलिंपिकमध्येही अंतिम फेरी गाठलेली माणदेशी एक्‍स्प्रेस ललिता बाबर, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार असलेला मुंबईकर अजिंक्‍य रहाणे, भरवशाचा ड्रॅग फ्लिकर व्ही.आर. रघुनाथ यांना ‘अर्जुन’ पुरस्कार देण्यात आला आहे.
  • रोइंगमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या राजेंद्र शेळके यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • क्रीडा पुरस्कार इतिहासात प्रथमच एका वर्षी चार खेळाडूंना सर्वोच्च क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहेत.
  • सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपर्यंत केवळ जितू राय आणि दीपा कर्माकर यांचेच नाव पुरस्कारासाठी होते; पण सिंधू आणि साक्षीने पदक जिंकल्यानंतर त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला.
  • 2009 मध्ये 2008 मधील ऑलिंपिक कामगिरी लक्षात घेऊन सुशील कुमार, विजेंदर सिंग आणि मेरी कोमला हा पुरस्कार देण्यात आला होता, तर 2002 आणि 2012 मध्येही दोघांना संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आला होता.

नागपूरच्या पोलिस आयुक्तपदी के. व्यंकटेशम :

  • राज्यातील सहा आयपीएस अधिकाऱयांच्या गृहविभागाने (दि.22) बदल्या करण्यात आली आहेत.
  • बदल्या झालेले अधिकारी आणि त्यांचे नवे ठिकाण –
  • के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त, नागपूर शहर (अपर पोलिस महासांचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई)
  • एस.पी. यादव, अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई (पोलिस आयुक्त, नागपूर शहर.)
  • रववद्र वसघल, पोलिस आयुक्त, नाशिक (विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई)
  • एस. जगन्नाथन्, अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई (पोलिस आयुक्त, नाशिक)
  • यशस्वी यादव, अपर पोलिस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर (केंद्रीय प्रतिनियुक्तीवरुन परत आल्याने नियुक्तीच्या प्रतिक्षेत)
  • मकरांद रानडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे), ठाणे शहर या रिक्त पदी (अपर पोलिस आयुक्त (प्रशासन), ठाणे शहर)

राजकीय पक्षांच्या दर्जाचा दर दहा वर्षांनी आढावा :

  • दर दहा वर्षांनी राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने बसपा, एनसीपी आणि सीपीआय या पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  • 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीमुळे बसपा, एनसीपी आणि सीपीआयच्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जावर टांगती तलवार होती.
  • यावरून निवडणूक आयोगाने या पक्षांना 2014 मध्ये नोटिसाही जारी केल्या होत्या.
  • राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची मान्यता देण्यासंबंधीचे निकष ‘जैसे थे’ राहणार असले तरी अशा दर्जाबाबत लोकसभा आणि विधानसभेच्या सलग दोन निवडणुकीनंतर आढावा घेतला जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
  • सध्या दर पाच वर्षांनी म्हणजे एका निवडणुकीनंतर राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या दर्जाबाबत आढावा घेतला जायचा.
  • तसेच आता दर दहा वर्षांनी याबाबत आढावा घेतला जाईल.

गोव्यात ब्रिक्स परिषदेसाठी विशेष तयारी :

  • राज्यात येत्या ऑक्टोबरमध्ये 1516 रोजी ब्रिक्स परिषद होणार असल्याने तत्पूर्वी रस्त्याच्या बाजूचे सगळे होडींग्ज आणि बॅनर्स काढून टाकावेत, असा आदेश सरकारने दिला आहे.
  • सुरक्षेनिमित्त ही काळजी घेतली जाणार असून ब्रिक्स परिषदेच्यावेळी कुत्रे व गुरे देखील महामार्गावर येऊ नये म्हणून काळजी घेतली जाणार आहे.
  • संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर यांच्या सहभागाने (दि.22) पर्वरी येथे उच्चस्तरीय बैठक झाली.
  • ब्रिक्स परिषदेच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
  • तसेच काही सूचनाही विविध सरकारी खात्यांना करण्यात आल्या.

सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी :

  • भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि चेक प्रजासत्ताकच्या बार्बरा स्ट्रायकोव्हाच्या साथीने महिला दुहेरीत पहिलेवहिले विजेतेपद मिळवले आहे.
  • सानिया आणि बार्बरा स्ट्रायकोव्हाने सिनसिनाटी ओपन जिंकली आहे.
  • तसेच या विजयासोबतच सानियाने महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत वैयक्तिकरित्या अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. या आधी सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस संयुक्तरित्या अव्वल स्थानावर होत्या.
  • विशेष म्हणजे, सिनसिनाटी ओपनच्या अंतिम सामन्यात सानिया मिर्झाने आपली आधीची सहकारी मार्टिना हिंगिसचा पराभव केला.
  • तसेच या सामन्यात सानिया-स्ट्रायकोव्हा जोडीने मार्टिना हिंगिस आणि कोको वॅन्देवेग जोडीवर 7-5, 6-4 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.