Current Affairs of 22 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2016)

सुशीलकुमार शिंदे यांना ‘डी.लिट’ पदवी जाहीर :

  • राज्याच्या मुख्यमंत्रीपदासह आंध्र प्रदेशचे राज्यपाल आणि विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेले व सोलापूरचे सुपुत्र असलेले जेष्ठ नेते सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना सोलापूर विद्यापीठाची पहिली सन्माननीय ‘डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.)’ पदवी जाहीर झाली आहे़.  
  • सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांनी ही घोषणा 21 नोव्हेंबर रोजी केली़.
  • डिसेंबर 2016 मध्ये होणा-या विद्यापीठाच्या 12 व्या दीक्षांत समारंभात शिंदे यांचा या पदवीने गौरव करण्यात येणार आहे़
  • सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात अधिसभेच्या 14 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
  • मानद पदवीने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेने मंजूर केल्यानंतर अधिसभेने सर्वांनुमते मान्यता दिली.

अँडी मरे ठरला वर्ल्ड टूर फायनल्सचा चॅम्पियन :

  • ब्रिटनच्या अँडी मरेने धमाकेदार कामगिरी करताना सर्बियाचा बलाढ्य नोव्हाक जोकोविचला नमवून एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या किताबावर नाव कोरले.
  • तसेच, या शानदार विजेतेपदासह मरेने यंदाच्या वर्षाची अखेर जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू म्हणून करणार असल्याचे निश्चित केले, तर दुसरीकडे जोकोविचला दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून यंदाच्या वर्षाचा निरोप घ्यावा लागेल.
  • अत्यंत आक्रमक खेळ केलेल्या मरेने या अंतिम सामन्यात जोकोचा 6-3, 6-4 असा धुव्वा उडवला.
  • विशेष म्हणजे यांसह मरेने कारकिर्दीत पहिल्यांदाच एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेचे जेतेपदही पटकावले.
  • एक तास 43 मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मरेने जोकोवर पूर्ण वर्चस्व राखताना सलग 24 वा विजय मिळविला.

लष्करप्रमुख जनरल सुहाग चीन दौऱ्यावर :

  • लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे 22 नोव्हेंबर पासून चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर रवाना झाले आहेत.
  • दोन देशांमधील सहकार्य आणि विश्‍वास वाढण्यासाठी ते चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि काही महत्त्वाच्या लष्करी संस्थांना भेट देतील.
  • जनरल सुहाग यांच्याबरोबर भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळही जाणार आहे.
  • दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये दहशतवाद, नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत आणि शांतता सहकार्य या विषयांवर चर्चा होणार आहे.

कर्ज परतफेडीसाठी RBI कडून अतिरिक्त मुदत :

  • सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील नागरीकांना चलनबदली करताना अडथळा निर्माण होत आहे.
  • तसेच या पार्श्वभूमीवर RBI ने कर्जदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
  • कार, घर तसेच अन्य कारणासाठी बँकाकडून 1 कोटीपर्यंत कर्ज घेतलेल्या कर्जदारांना कर्ज परत फेडीसाठी आरबीआयने 60 दिवसांची अतिरिक्त मुदत वाढ दिली आहे.
  • RBI ने जारी केलेल्या परिपत्रकाममध्ये ज्यांनी 1 कोटीपर्यंत कर्ज घेतले आहे त्यांना या मुदतवाढीचा लाभ मिळणार असल्याचे म्हटले आहे.
  • रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे 1 नोव्हेबर ते 31 डिसेंबर या दरम्यान कर्जाचा हप्ता भरण्यास दिरंगाई झाल्याच्या कारणावरुन थकबाकीदाराचा शिक्का कर्जदाराव बसणार नाही.

दिनविशेष :

  • 22 नोव्हेंबर 1880 हा ‘धर्मरहस्य’कार केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म दिन आहे.
  • 22 नोव्हेंबर 2002 हैद्राबाद मुक्तिसंग्रामाचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे स्मृतीदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.