Current Affairs of 21 November 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2016)

चालू घडामोडी (21 नोव्हेंबर 2016)

पी.व्ही. सिंधूला चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद :

 • रिओ ऑलिम्पिकमधील रौप्य पदकविजेती पी.व्ही. सिंधू हिने शानदार कामगिरी करताना चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
 • चीनच्याच सुन यू हिला अत्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात धक्का देत सिंधूने बाजी मारली.
 • विशेष म्हणजे, सिंधूने पहिल्यांदाच आपल्या कारकिर्दीमध्ये सुपर सिरीज प्रीमियर विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.
 • तब्बल एक तास आणि नऊ मिनिटांपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात सिंधूने सुन यूला 21-11, 17-21, 21-11 असा धक्का दिला.
 • तसेच सिंधूने आपल्या कारकिर्दीमध्ये सुन यूविरुद्ध खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांतून तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

उवेना फर्नांडिस यांना विशेष रेफ्री पुरस्कार प्रदान :

 • भारताची महिला फुटबॉल रेफ्री उवेना फर्नांडिस हिला 20 नोव्हेंबर क्वालालांपूर येथे एका कार्यक्रमामध्ये एएफसी रेफ्री विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
 • विशेष म्हणजे, भारतीय फुटबॉल क्षेत्रासाठी ही असाधारण कामगिरी आहे.
 • एएफसी रेफ्री समितीचे उपाध्यक्ष हनी बालन यांच्या हस्ते उवेना यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 • जॉर्डन येथे झालेल्या अंडर 17 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात केलेल्या चमकदार कामगिरीमुळे उवेना यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.

आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार जाहीर :

 • बालकांच्या हक्कांमध्ये सुधारणा घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या केहकशा बासू या मूळ भारतीय वंशाच्या मुलीची निवड यंदाच्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारासाठीच्या अंतिम तीन स्पर्धकांमध्ये करण्यात आली आहे.
 • या पुरस्कारासाठी जगभरातून 120 नावे पुढे आली होती. तज्ज्ञांनी त्यातून ही निवड केली.
 • केहकशासह कॅमेरूनमधील दिवीना मालौम आणि सीरियातील मुझून अलमेल्लेहान यांचीही निवड झाल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय बालहक्क संघटनेने केली आहे.
 • शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्राप्त मोहम्मद युनूस यांच्या हस्ते 2 डिसेंबर रोजी हॅंग्वे येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

महिला अर्धमॅरेथॉन स्पर्धेत मोनिका आठरे प्रथम स्थानी :

 • नाशिकच्या मोनिका आठरे आणि संजीवनी जाधवने दिल्ली महिला अर्धमॅरेथॉन स्पर्धेत अनुक्रमे प्रथमव्दितीय क्रमांक जिंकला.
 • तसेच पुण्याच्या स्वाती गाढवेला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.
 • 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत महिलांच्या या गटात महाराष्ट्राच्या महिलांनी निर्विवाद वर्चस्व राखले.
 • पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये सेना दलाच्या लक्ष्मणन् जीने विजेतेपद जिंकले. लक्ष्मणन् याने 64.37 मिनिटांची वेळ नोंदवत एक सेकंदांच्या फरकाने विजय मिळवला.
 • मोनिकाने 1 तास 15 मिनिटे 34 सेकंद, तर दुसऱ्या स्थानी आलेली संजीवनी जाधव हिने एक तास 15 मिनिटे 35 सेकंदांची वेळ नोंदवली.

दिनविशेष :

 • मराठी विनोदी लेखक चिं.वि. जोशी 21 नोव्हेंबर 1963 हा स्मृतीदिन आहे.
 • 21 नोव्हेंबर 1970 हा भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांचा स्मृतीदिन आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.