Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 22 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 नोव्हेंबर 2015)

विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय :

 • राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे नोव्हेंबर 2015-2016च्या खरीप आणि रब्बी हंगामांतील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असलेल्या 14 हजार 708 दुष्काळग्रस्त गावांतील आर्थिक दुर्बल प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे.
 • कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागांतील 14 हजार 708 दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त गावांतील ईबीसीधारक विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व परीक्षा मंडळांचे परीक्षा शुल्क या निर्णयामुळे माफ होणार आहे.
 • राज्यातील 2015-2016च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.
 • त्यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.

सागरी उत्पादनांसाठी लवकरच एकछत्री योजना :

 • देशांतर्गत गोड्या पाण्यातील मासेमारी, सागरी उत्पादने, खोल पाण्यातील मासेमारी या सर्वांसाठी एकच योजना अमलात आणण्याचा केंद्र सरकारचा विचार असून, नीलक्रांती : सर्वसमावेशक विकास आणि मत्स्य व्यवस्थापन योजनेसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.
 • जागतिक मासेमारी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी ही घोषणा केली.
 • भारतातील मत्स्योद्योगाची वाढ, विविध योजनांची तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज लक्षात घेऊन मंत्रालयाने विद्यमान सर्व योजनांना एकत्र करून एक सर्वसमावेशक योजना आखण्याचा निर्णय घेतला आहे.
 • या योजनेमध्ये राष्ट्रीय मत्स्योद्योग विकास महामंडळांच्या सर्व उपक्रमांचा समावेश असेल.

प्रजासत्ताक दिनाला अध्यक्ष म्हणून फ्रान्सचे फ्रान्स्वा ओलॉंद :

 • प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद हे अध्यक्ष म्हणून येण्याची दाट शक्‍यता आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात ओलॉंद यांना हे निमंत्रण दिले होते निमंत्रण स्वीकारल्याची माहिती भारत दौऱ्यावर असलेले फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस यांनी दिल्याचे समजते.
 • या वर्षी झालेल्या प्रजासत्ताक दिनाला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि चीनच्या प्रमुखांची भेट :

 • मलेशियामध्ये सुरू असलेल्या 13 व्या आसियान- भारत परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान आणि चीनच्या प्रमुखांची भेट घेत त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.
 • या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंध हा प्रमुख मुद्दा होता.
 • ऍबे हे 11 डिसेंबरला भारतात येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीला महत्त्व होते.

‘मन की बात’ हा कार्यक्रम 29 नोव्हेंबरला होणार :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी ‘मन की बात’ हा रेडिओवरून जनतेशी संवाद साधण्याचा कार्यक्रम 29 नोव्हेंबरला होणार आहे.
 • ‘मन की बात’मध्ये मोदी कोणत्या विषयावर बोलणार आहेत, ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
 • पंतप्रधान दर महिन्यात रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सरकारचे विविध उपक्रम व सुरू असलेल्या कामांविषयी माहिती देतात.
 • मोदींनी यापूर्वी “वन रॅंक, वन पेन्शन”, “काळा पैसा”, “शेतकरी‘, “परीक्षा” अशा विविध विषयांवर “मन की बात” या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला आहे.

राजेंद्र दर्डा यांच्या संकेतस्थळाचे उदघाटन :

 • लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर-इन-चीफ राजेंद्र दर्डा यांच्या डायनॅमिक स्वरूपातील rajendradarda.com  या संकेतस्थळाचे उदघाटन त्यांच्या वाढदिवशी चाहत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 • सन 2000 मध्ये त्यावेळच्या तंत्रज्ञानासह हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
 • त्यानंतर सर्वसामान्यांशी थेट आदान-प्रदान करणा-या फीचरसह 2012 मध्ये  हे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आले.
 • आता माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे संकेतस्थळ पाहण्याचे माध्यमही बदलले आहे.
 • त्यामुळे डेस्कटॉपसह स्मार्टफोन व टॅब्लेटवर सहज पाहता येईल अशा फीचर व आकर्षक डिझाईनसह डायनामिक स्वरूपात rajendradarda.com हे संकतेस्थळ अद्ययावत करण्यात आले आहे.

चीनने लढाऊ ड्रोन विमान तयार केले :

 • चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे.
 • याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते. चीनच्या लष्कराने सीएच 5 हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे.
 • त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे.
 • इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच 5 हे लष्करी ड्रोन विमान 3000 किलो वजन व 900 किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते.
 • इतर ड्रोन विमाने केवळ 1500 किलो वजन वाहून नेऊ शकतात.
 • त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान 80 कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अ‍ॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती :

 • केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची आसामच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून ते पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे संकेत दिले आहेत.
 • आसाममध्ये निवडणुका होणार असून सोनोवाल यांच्याकडे निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुखपदही सोपविण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • 1943 : दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
 • 1943 : लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
 • 1977 : ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क काँकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
 • 1998 : आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
 • 2005 : एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World