Current Affairs of 22 August 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2017)

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2017)

अर्जुन पुरस्कारांचे नियम बदलणार :

 • अर्जुन पुरस्कारापासून कुठलाही पात्र खेळाडू वंचित राहू नये, यासाठी क्रीडा मंत्रालय पात्रता नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे.
 • नव्या बदलामुळे शिफारस न केलेल्या खेळाडूंच्या नावाचादेखील पुरस्कारासाठी विचार शक्य होणार आहे.
 • क्रीडामंत्री विजय गोयल यांनी पात्रता नियमात बदल करण्याबाबत पुढाकार घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
 • क्रीडा मंत्रालयाच्या एका अधिका-याने सांगितले, की निवड समितीच्या विश्वसनीयतेवर कुठलीही शंका घेण्यात आली नाही. याशिवाय पारदर्शीपणा जपण्याचा निर्णय झाला आहे.
 • समितीत नेहमी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असतो. पण पुढील वर्षी योजनेत संशोधन होईल. लवकरच नवे निर्देश निघतील.
 • तसेच यानुसार ज्या खेळाडूंच्या नावाची शिफारस झाली नसेल किंवा संबंधित महासंघाने त्याचे नाव पाठविले नसेल तरीही त्या खेळाडूच्या कामगिरीची दखल घेत पुरस्कारासाठी विचार केला जाईल.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2017)

जगातील सर्वांत धोकादायक संघटना ‘इसिस’ :

 • ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (इसिस) या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातून बीमोड झाला असला तरी जगातील सर्वांत धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती.
 • मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
 • विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार ‘इसिस’ किंवा ‘इस्लामिक स्टेट’ने (आयएस) गेल्या वर्षी चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला.
 • 2015च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये 20 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता 2016 मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्‍क्‍याने वाढले होते.
 • स्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या आठवड्यात लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून हल्ला केल्याचा दावा ‘इसिस’ने केला आहे.
 • ‘इसिस’ शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या 950 होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.

गुगलकडून नवीन ऑपरेटिंग सिस्टीम लाँच :

 • गुगलकडून ‘अँड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटिंग सिस्टीमचे लाँच करण्यात आले आहे.
 • अँड्रॉईडच्या आत्तापर्यंतच्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांची नावे देण्यात आली आहेत. त्याच पद्धतीनुसार या सिस्टीमला ‘ओरियो’ नाव देण्यात आले.
 • न्यूयॉर्कमध्ये यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
 • स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी ‘अँड्रॉईड ओ’चे लाँचिंग करण्यात आले.
 • गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे.
 • अँड्रॉईड ओ या सिस्टीममध्ये ‘पिक्चर-इन-पिक्चर मोड’ आणि नोटिफिकेशन डॉट अशी फिचर्स असणार आहेत.
 • पिक्चर इन पिक्चर मोडद्वारे आयकॉनच्या डिझाईनमध्ये बदल करता येणार आहेत. याशिवाय नवे इमोजीही उपलब्ध होणार आहेत.
 • तसेच या मोडमध्ये दोन युझर्स एकाचवेळी एक अॅप वापरू शकणार आहेत.

टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधननिर्मिती :

 • भारतात प्लॅस्टिकची मोठी समस्या असून त्यावर मात करण्यासाठी विविध संशोधने होत आहेत.
 • दरम्यान, हैदराबाद येथिल सतीशकुमार या मेकॅनिकल इंजिनिअरने संशोधनाद्वारे अशाच प्रकारे प्लॅस्टिकच्या पुनर्वापराचा एक पर्य़ाय शोधला आहे.
 • टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मिती केल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुनर्वापरासाठी अनेकदा प्रक्रिया केल्यानंतर आणखी प्रक्रिया न होऊ शकणाऱ्या टाकाऊ प्लॅस्टिकपासून कृत्रीम इंधन तयार केले आहे.
 • सतीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, या टाकाऊ प्लॅस्टिकपासून इंधन निर्मितीसाठी केवळ तीन टप्प्यातील रिव्हर्स इंजिनिअरिंगची प्रक्रिया वापरण्यात आली आहे. यासाठी टाकाऊ प्लॅस्टिक हे अप्रत्यक्षपणे निर्वात पोकळीत तापवले जाते, त्याला डिपॉलमराईज्ड करून वायूरूपात आल्यानंतर ते पुन्हा घनरुपात आणले जाते. त्यानंतर त्यावर विशिष्ट प्रक्रीया करून द्रवरूपात इंधन म्हणून वापरण्यात येते.

दिनविशेष :

 • प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ ‘डेनिस पॅपिन’ यांचा जन्म 22 ऑगस्ट 1647 मध्ये झाला.
 • 22 ऑगस्ट 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार करुन मॅडम भिकाजी कामा यांनी तो प्रदर्शित केला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 ऑगस्ट 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.