Current Affairs of 22 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2015)

ग्रीसचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांचा राजीनामा :

 • ग्रीसचे पंतप्रधान ऍलेक्सिस सिप्रास यांनी नुकताच राजीनामा दिला आहे.
 • ग्रीसवर सध्या आर्थिक संकट ओढवले असताना अश्यावेळी ग्रीसच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे.
 • सिप्रास यांच्या राजीनाम्यामुळे आता ठरवलेल्या कालावधीच्या आधीच निवडणुका घेण्यात येणार आहे.
 • ग्रीसमध्ये येत्या 20 सप्टेंबरला निवडणुका होणार आहेत.
 • एलेक्सिस सिप्रास यांनी याच वर्षी निवडणुका जिंकून पंतप्रधान पदावर विराजमान झाले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2015)

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी रनिल विक्रमसिंघे यांचा शपथविधी :

 • श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी रनिल विक्रमसिंघे यांचा शपथविधी झाला.
 • अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी त्यांना शपथ दिली.
 • श्रीलंकेतील अल्पसंख्याक तामिळींसह सर्वामध्ये सलोखा राखण्यासाठी राष्ट्रीय एकता सरकारने नवीन राज्यघटनेचे आश्वासन दिले आहे.
 • विक्रमसिंघे हे 66 वर्षांचे असून युनायटेड नॅशनल पार्टीच्या विजयानंतर त्यांना सत्ता मिळाली आहे.
 • युनायटेड नॅशनल पार्टी (युएनपी) व अध्यक्ष सिरिसेना यांचा श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) हा पक्ष यांच्यात सत्तावाटपाचा करार झाला आहे.
 • दोन विरोधी राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची श्रीलंकेतील ही पहिलीच वेळ आहे.

टहलियानी त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती :

 • मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी 28 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून न्या. टहलियांनी यांचा येत्या सोमवारी शपथविधी होणार आहे.
 • राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव त्यांना शपथ देतील.
 • वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी म्हणून 1987 मध्ये करिअरची सुरुवात.
 • 1997 मध्ये मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश.
 • 2000 मध्ये त्यांची शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी बढती.
 • 2009 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
 • तर 2010 मध्ये मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी बढती.

मेक इन इंडिया कार्यक्रमातहत औरंगाबाद पुढचे ठिकाण :

 • मेक इन इंडिया या पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातहत औरंगाबाद हे पुढचे ठिकाण असेल.
 • शेंद्रा-बिडकीनचा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पात समावेश असल्याने आगामी काळात औरंगाबाद हे गुंतवणुकीचे केंद्र म्हणून उदयास येईल.
 • केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी महाराष्ट्रातून निवड कण्यात आलेल्या दहा शहरांसाठी राज्य सरकारने आयएएस अधिकाऱ्यांची तज्ज्ञ सल्लागार (मेन्टॉर) म्हणून नियुक्ती केली आहे.
 • तर औरंगाबादसाठी अपूर्वा चंद्रा (उद्योग आणि ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिव) यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 • स्मार्ट सिटीसाठी देशभरातील अन्य 90 शहरांसोबत राज्यातील दहा शहरे असल्याने तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, पुणे-पिंप्री-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नाशिक, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि औरंगाबादची निवड करण्यात आली.
 • देशभरात 100 स्मार्ट शहरे विकसित करण्यासाठी केंद्राची 48 हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे.

दिनविशेष :

 • पाय दिन (22/7 = पाय)
 • 1943 : दोस्त राष्ट्रांनी इटलीचे पालेर्मो शहर जिंकले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.