Current Affairs of 21 August 2015 For MPSC Exams

Current Affairs 21 Aug 2015

 चालू घडामोडी (21 ऑगस्ट 2015)

अश्वनी लोहानी यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती :

  • मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या अश्वनी लोहानी यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती Air Indiaकरण्यात आली आहे.
  • तीन वर्षांच्या कालावधीसाठी लोहानी यांची निवड करण्यात आली असून ते रोहित नंदन यांची जागा घेतील.
  • पहिल्यांदाच रेल्वे सेवेतील अधिकाऱ्याची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
  • लोहानी हे 1980 साली भारतीय रेल्वे सेवेत यांत्रिक अधिक्षक अभियंता म्हणून रूजू झाले होते.
  • लोहानी सध्या मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळात भोपाळ येथे कार्यरत आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2015)

अवकाश मोहिमेत नागरिकांच्या सहभागासाठी “नासा”चा उपक्रम :

  • जगभरातील खगोलप्रेमींना अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा”ने एक अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे.
  • पुढील वर्षी मंगळाच्या दिशेने सोडल्या जाणाऱ्या “द इनसाइट लॅंडर” या अवकाशयानामधून तुमचे नाव मंगळावर पाठविण्याचे आवाहन “नासा”ने केले आहे.
  • मंगळाच्या निर्मितीचा शोध घेण्यासाठी “नासा”ने ही मोहीम आखली आहे.
  • या मोहिमेअंतर्गत भविष्यात काही अवकाशयाने मंगळासह विविध ग्रहांकडे पाठविण्यात येणार आहेत.
  • नागरिकांनी एका मायक्रोचिपमध्ये आपले नाव टाकून ती “नासा”कडे पाठविल्यास अशा चिप अवकाशयानात ठेवण्यात येणार आहेत.
  • अशा प्रकारे हे नागरिक भविष्यातील अवकाश मोहिमांचा अप्रत्यक्षपणे भाग बनू शकतील.
  • “नासा”ने हे आवाहन केल्यापासून चोवीस तासांच्या आत 67 हजार नागरिकांनी आपली नावे नोंदविली आहेत. NASA
  • नावे नोंदविण्यासाठी 8 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे.
  • याबाबतची अधिक माहिती “नासा”च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
  • तसेच नाव नोंदवून झाल्यानंतर तुम्हाला “बोर्डिंग पास”ही मिळणार आहे.
  • या आधीही “नासा”ने अशी मोहीम राबविली होती.
  • गेल्या वर्षी सोडलेल्या ओरायन या अवकाशयानाद्वारे सुमारे 13 लाख 80 हजार नागरिकांनी अवकाशात “प्रवास” केला होता.
  • ओरायनमधून 2030 मध्ये मानवालाच मंगळावर पाठविण्याची योजना आहे.
  • “इनसाइट”चे प्रक्षेपण 4 मार्च 2016 ला होणार आहे.
  • त्यानंतर 2018 मध्ये दुसऱ्या ओरायनचे प्रक्षेपण आहे.
  • “इनसाइट” यान मंगळावर उतरणार असून, ते “क्‍युरिऑसिटी” आणि “ऑपर्च्युनिटी” या यानांबरोबर मंगळाचा पृष्ठभागावर उतरून अभ्यास करणार आहे.
  • “इनसाइट”द्वारे मंगळाच्या अंतर्भागाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना अल्पावधीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून नवे वेब पोर्टल सुरू :

  • विद्यार्थ्यांना अल्पावधीत शैक्षणिक कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून केंद्र सरकारकडून नवे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
  • vidyalakshmi.co.in असे या पोर्टलचे नाव असून, एसबीआय, आयडीबीआय आणि बॅंक ऑफ इंडिया या बॅंकांकडून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाची माहिती यावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  •  अर्थमंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
  • वित्तीय सेवा विभाग या पोर्टलच्या अपडेट्‌सवर नजर ठेवणार असून, “एनएसडीएल ई-गव्हर्नन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेड”ने हे पोर्टल तयार केले आहे.

‘आयकॉन्स ऑफ पीसीएमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन :

  • चिंचवड नगरीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा जीवनप्रवास उलगडत त्यांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘आयकॉन्स ऑफ पीसीएमसी’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी पुण्यात होणार आहे.
  • पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीच्या उभारणीत आणि प्रगतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि जीवनप्रवासाचा आढावा या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये घेण्यात आला आहे.
  • पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील ‘जे. डब्ल्यू मॅरीएट’, सेनापती बापट रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.

सायना बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर :

  • जकार्ता येथे नुकत्याच आटोपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामन्यात सायनाला मारिनने पराभूत केले होते.
  • ऑलांपिक कांस्य विजेती सायना गुरुवारी जाहीर झालेल्या बीडब्ल्यूएफच्या रँकिंगमध्ये 82792 गुणांसह अव्वल स्थानावर पोहोचली.Sayana Nehaval
  • या आधी इंडियन ओपन जिंकल्यानंतर सायना एक मार्च रोजी अव्वल स्थानावर दाखल झाली होती.
  • पुरुष एकेरीत पारुपल्ली कश्यप आठव्या स्थानावर आला आहे.
  • महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा यादेखील दहाव्या स्थानावर झेपावल्या आहेत.
  • इंडियन ओपन विजेता के श्रीकांत हा एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आला आहे.
  • दोन वेळा विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणारी पी.व्ही. सिंधू 14व्या स्थानी आहे.
  • मिश्र दुहेरीत मात्र पहिल्या 25 खेळाडूंत एकही भारतीय नाही.

दिनविशेष :

  • 2006 : उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक यांचा मृत्यू .
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.