Current Affairs of 21 October 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (21 ऑक्टोंबर 2015)

 चालू घडामोडी (21 ऑक्टोंबर 2015)

देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार :

 • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जपानला भेट दिली, तेव्हा या प्रकल्पात साह्य करणाऱ्या ‘जायका’ (जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन एजन्सी) कंपनीच्या railwayउच्चाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी चर्चा केली.
 • देशात पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे, ती मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर.
 • जपानी कंपन्यांच्या प्रकल्पांना जलदगतीने काम करता यावे, यासाठी ‘जपान डेस्क’ स्थापन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
 • पहिली ट्रेन धावेल ती तब्बल दहा वर्षांनंतर 2024 मध्ये. 
 • पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे आव्हान मोठे आहे. त्यासाठी तब्बल 90 हजार कोटी रुपये लागणार आहेत.
 • अंदाजानुसा, मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचे तिकीट 2800 ते 3000 रुपये असेल.
 • हे अंतर 458 कि.मी. आहे.
 • ‘फॉर्च्युन 500’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाच्या जून 2015 च्या अंकातील ‘अमेरिका बाईट्‌स बिग ऑन बुलेट ट्रेन्स’ या लेखानुसार, बुलेट ट्रेनच्या संदर्भात (भारताप्रमाणे) ‘अमेरिकाही चीन, जपान व युरोपच्या कित्येक वर्षे मागे आहे,’ असे म्हटले आहे.

नेताजींसंदर्भातील रशियातील कागदपत्रे उघड होण्याची शक्‍यता :

 • भारताचे स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातील कागदपत्रे उघड करण्याच्या भारताच्या विनंतीचा विचार करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन subhashchandra boseरशियाचेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिले आहे.
 • त्यामुळे नेताजींसंदर्भातील रशियातील कागदपत्रे उघड होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.
 • भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत.
 • यावेळी त्यांनी नेताजीसंदर्भातील रशियाकडे असलेले कागदपत्रे उघड करण्याची विनंती केली.
 • पुढील वर्षी 23 जानेवारीपासून त्यांच्यासंदर्भातील कागदपत्रे खुली करणार असल्याचे आश्‍वासन मोदी यांनी दिले आहे.

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरत आहे :

 • सध्या आपल्या देशाची ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल सुरू असल्याने पिढी घडवणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित असायला हवा, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरत आहे.
 • संगणकाचे प्रशिक्षण, व्होकेशनल इंग्रजी, कृतीवर आधारित शिक्षण असे थेट शिक्षकांना समृद्ध करणारे विषय पदविका अभ्यासक्रमात घेण्याचे नियोजन आहे.
 • राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने 2005 मध्ये शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सूचना दिलेल्या आहेत.
 • त्यानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई)ने त्यांच्या विविध प्रकाशनांद्वारे मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत.
 • त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्तरावर समिती नेमण्यात आली आहे.
 • एनसीटीईने तयार केलेल्या अभ्यासक्रमावरून महाराष्ट्राच्या स्थानिक परिस्थितीत त्याची पुनर्रचना कशी करता येईल, अद्ययावत कसे करता येईल, यासाठी ही समिती काम पाहील.
 • समिती 31 ऑक्टोबरपर्यंत नवीन अभ्यासक्रम शासनाला सादर करणार आहे.

दिल्ली सरकारने केली एका मंत्रिगटाची नियुक्ती :

 • अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशी अथवा जन्मठेपेची शिक्षा देण्यासाठी आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या बालगुन्हेगारांबाबतची वयोमर्यादा कमी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा करता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली सरकारने एका मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.
 • त्याचप्रमाणे विशेष पोलीस ठाणी स्थापन करता येतील का, याची शक्यताही पडताळून पाहण्यात येणार आहे.
 • मंत्रिगटाला आपला अहवाल 15 दिवसांत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

दिनविशेष :

 • पोलीस स्मृतिदिन (1959 पासून)Dinvishesh

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.