Current Affairs of 20 October 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (20 ऑक्टोंबर 2015)
पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा :
- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून पाकिस्तानी पंच अलीम दार यांना हटवित असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केली.
- एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यांसाठी दार यांनी पंच म्हणून काम पाहिले असून, चेन्नईत 22 ऑक्टोबरला आणि मुंबईत 25 ऑक्टोबरला होणाऱ्या अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या सामन्यातही ते पंच असणार होते.
- दार यांच्याबाबत आम्हाला कोणतीही अडचण नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले होते.
- मात्र, सध्याची परिस्थिती पाहता अलीम दार यांना उर्वरित सामन्यांसाठी वगळणेच योग्य असून, पर्यायी पंचाची लवकरच घोषणा केली जाईल, असे आयसीसीच्या एका प्रवक्त्याने सांगितले.
Must Read (नक्की वाचा):
नथुराम गोडसे याचा मृत्यूदिन बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय :
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा मृत्यूदिन बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय हिंदू महासभेने घेतला आहे.
- हिंदू महासभेने गेल्यावर्षी नथुराम गोडसे याचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला होता.
- आता त्याची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
- नथुराम गोडसे याची 15 नोव्हेंबरला मृत्यूदिन आहे.
- याच दिवशी महात्मा गांधी यांची हत्या केल्याप्रकरणी गोडसेला फाशी देण्यात आली होती.
- अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश कौशिक यांनी सांगितले, की यावर्षी आम्ही देशभरातील आमच्या 120 कार्यालयांना बलिदान दिवस साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.
- जिल्हा स्तरावरही हा कार्यक्रम होणार आहे.
- या कार्यक्रमानिमित्त हिंदू महासभा गोपाळ गोडसे यांनी लिहिलेले ‘गांधीवध क्यो’ हे पुस्तक वाटण्यात येणार आहे.
उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी साहित्य अकादमी पुरस्कार रकमेसह परत :
- देशातील असहिष्णु वातावरण व विविध घडामोडींना विरोध करत उर्दू कवी मुनव्वर राणा यांनी साहित्य अकादमी पुरस्कार रकमेसह परत केला आहे.
- रविवारी रात्री एका वृत्तवाहिनीवर सरकार विरूद्ध साहित्यकार असा कार्यक्रम सुरू असतानाच मुनव्वर राणा यांनी पुरस्कार परत करत असल्याची घोषणा केली.
- यावेळी त्यांनी पुरस्कारासह पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कमही सरकारला परत करत असल्याचे सांगितले. मुनव्वर राणा हे उर्दू साहित्यक्षेत्रात नामवंत आहेत.
- त्यांचे अनेक काव्यसंग्रह आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर नासीर खान जंजुआ यांची नियुक्ती :
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर (एनएसए) लेफ्टनंट जनरल नासीर खान जंजुआ (निवृत्त) यांची नियुक्ती करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरविले आहे.
- भारताबरोबरील सध्याचे तणावाचे संबंध लक्षात घेता देशाच्या सुरक्षाविषयक बाबींवर लष्कराची असलेली पकड आणखी मजबूत करण्याचा पाकिस्तानचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
- सरताज अझीझ हे पाकिस्तानचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्याकडे पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहारासंबंधीचे सल्लगार म्हणूनही काम आहे.
मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर :
- ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांना मुंबई मराठी साहित्य संघाचा डॉ.भालेराव पुरस्कृत ‘मराठी यशवंत पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- अभिनेते अरुण नलावडे यांना के. नारायण काळे पुरस्कार जाहीर झाला आहे.
- या पुरस्कारांचे वितरण मुंबई मराठी साहित्य संघाच्या 80 व्या वर्धापनदिनी 28 ऑक्टोबर रोजी डॉ. अ. ना भालेराव नाट्यगृहात करण्यात येईल.
वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत :
- भारताचा तुफानी फलंदाज वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
- भारतात जाऊन अधिकृतरीत्या घोषणा करणार असल्याचे खुद्द सेहवागनेच दुबई येथे झालेल्या मास्टर्स चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या लाँचिंग दरम्यान स्पष्ट केले.
- वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवृत्तीनंतर सेहवागने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भारतीय संघाबाहेर असलेल्या सेहवागने अखेरचा कसोटी सामना मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हैदराबादेत खेळला होता.
मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात एफडीसीएने उठवली :
- नेस्ले इंडियाचे उत्पादन असलेल्या मॅगी नूडल्सवरची बंदी गुजरात अन्न व औषध नियंत्रण प्राधिकरणाने (एफडीसीए) उठवली आहे.
- मुंबई उच्च न्यायालयाने ऑगस्टमध्येच मॅगीवरील देशव्यापी बंदी उठवण्याचा निकाल दिला होता.
- गुजरातचे अन्न व औषध प्राधिकरण आयुक्त एच. जी कोशिया यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार मॅगीवरील बंदी उठवण्यात येत आहे.
- गुजरातने जुलैत मॅगीवर बंदी घातली होती, कारण त्यात मोनोसोडियम ग्लुटामेट व शिशाचे प्रमाण जास्त आढळले होते.
- नंतर ही बंदी सप्टेंबपर्यंत वाढवण्यात आली होती.
- मॅगीच्या तीन प्रयोगशाळांमध्ये नवीन उत्पादन केल्यानंतरच्या चाचण्यात काहीही दोष आढळला नाही त्यामुळे आता मॅगीची बंदी उठवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- अजूनही गुजरातमध्ये मॅगी उपलब्ध नाही, पण लवकरच या नूडल्स उपलब्ध होतील.
- मॅगीचा सर्व साठा त्यावेळी बाजारातून मागे घ्यायला लावला होता.
- देशातील विविध भागातून घेतलेले मॅगीचे नमुने पूर्वी सदोष आढळले होते.
व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन :
- वैज्ञानिकांनी अनेक वर्षे प्रतीक्षा असलेला ग्लूबॉल नावाच्या नवीन कणाचे अस्तित्व शोधून काढल्याचा दावा केला आहे.
- अणुकणांना एकत्र ठेवणाऱ्या चिकट कणांना ग्लुऑन असे म्हटले जाते.
- ग्लुबॉल्स हे अस्थिर असतात व त्यांचे थेट अस्तित्व जाणवत नाही, त्यांचे क्षरण होत असताना विश्लेषण केले तरच त्यांचे अस्तित्व जाणवते.
- ग्लुबॉल्सच्या क्षरणाची प्रक्रिया मात्र अजून पूर्णपणे समजलेली नाही.
- प्रा. अँटन रेभान व फ्रेडरिक ब्रुनर या व्हिएन्ना तंत्रज्ञान विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यात सैद्धांतिक दृष्टिकोन वापरला असून त्यातून त्यांनी ग्लुबॉलचे क्षरण कसे होते हे शोधून काढले आहे.
- कण त्वरणकाने केलेल्या निरीक्षणातील माहितीशी हे संशोधन जुळणारे आहे.
- अनेक प्रयोगात एफ 0 (1710) हे सस्पंदन जाणवले असून ते प्रत्यक्षात ग्लुबॉल असल्याचे दिसून आले आहे.
- आणखी प्रयोगात्मक निष्कर्ष येत्या काही महिन्यात मिळणे अपेक्षित आहे.
- प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामध्ये आणखी सूक्ष्म कण असतात त्यांना क्वार्क म्हणतात व क्वार्क हे शक्तिमान आण्विक बलाने एकत्र बांधलेले असतात.
दिनविशेष :
- राष्ट्रीय एकता दिन
- लोकशिक्षण दिन
- 1962 : चिनी फौजांनी भारतावर आक्रमण केले.
- 1969 : पंजाबराव कृषी विद्यापीठाची स्थापना.