Current Affairs of 20 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 मे 2018)

चालू घडामोडी (20 मे 2018)

सोळाव्या वर्षी सर केलं माउंट एव्हरेस्ट :

  • जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते. मात्र, अवघ्या 16 वर्षांच्या शिवांगी पाठक हिने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.
  • एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला.
  • दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शिवांगीने सांगितलं तर अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2018)

तामिळनाडू ठरले सर्वात भ्रष्ट राज्य :

  • तामिळनाडू हे देशातील सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचे सीएमएस-इंडियाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे.
  • तसेच देशातील 13 मोठय़ा राज्यांमध्ये केलेल्या पाहणीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
  • संबंधित राज्यातील नागरिकांची सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची मते, लाच मागण्याचे प्रमाण, भ्रष्टाचारविरोधी चळवळी आदी विविध स्वरूपाचे प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांवरून सर्वाधिक भ्रष्ट आणि कमीत कमी भ्रष्ट राज्यांची यादी तयार करण्यात आली आहे.
  • त्यामध्ये तामिळनाडू पहिल्या क्रमांकावर तर तेलंगण दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • सरकारी कामांसाठी तेलंगणमधील 73 टक्के नागरिकांना लाच द्यावी लागल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर पंजाब, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त असल्याचेही उघड झाले आहे.

झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी लालचंद राजपूत :

  • भारतीय संघाचे माजी खेळाडू लालचंद राजपूत यांची झिम्बाब्वेच्या हंगामी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.
  • जुलै महिन्यात ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-झिम्बाब्वे तिरंगी मालिकेपासून राजपूत आपल्या पदाचा कार्यभार स्विकारनार आहेत.
  • 2007 साली पहिल्या टी-20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे राजपूत व्यवस्थापक होते. यानंतर त्यांनी अफगाणिस्तानच्या संघाला प्रशिक्षण दिलं होतं.

बारामतीत पासपोर्ट सेवा केंद्र :

  • राज्यात बारामती आणि माढा यासह अमरावती, अकोला, चंद्र्रपूर येथे नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
  • परराष्ट्र मंत्रालयाने देशात दर 50 किलोमीटर अंतरावर पासपोर्ट सेवा केंद्र्र उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
  • तसेच नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा, यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ‘पासपोर्ट आपल्या दारी’ हा कार्यक्रम पोस्ट विभागाच्या मदतीने सुरू केला आहे.
  • महाराष्ट्रासह देशात 14 राज्यांमध्ये 38 नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

भारतात आधुनिकीकरणा एवजी पगारावरच जास्त संरक्षण खर्च :

  • अमेरिका आणि चीननंतर आता शस्त्रास्त्रांवर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांच्या रांगेत भारताचाही समावेश झाला आहे.
  • भारताने संरक्षण क्षेत्रामध्ये 2017 मध्ये 4.34 लाख कोटी खर्च केले आहेत. याआधीच्या तुलनेत हा खर्च 5.5 टक्के जास्त आहे.
  • स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
  • मात्र भारतातील खर्च क्षेत्राच्या आधुनिकीकरणावर कमी व पगार, पेन्शनवरच जास्त आहे.
  • जगभराचा विचार केल्यास या क्षेत्रातील खर्च 1.1 टक्क्यांनी वाढून 2017 मध्ये 118.25 लाख कोटींवर पोहोचला आहे.
  • वर्ष 2017 मध्ये सैन्यावर सर्वाधिक खर्च करण्याबाबत भारत, फ्रान्स, जर्मनीसारखे देश अव्वल ठरले आहेत.

चीनने द. चीन सागरात प्रथमच तैनात केले बॉम्बवर्षक विमान :

  • चीनने दक्षिण चीन सागरात प्रथमच एच-6 के बॉम्बवर्षक विमानांची तैनाती केली असल्याची माहिती चीनच्या हवाई दलाने दिली आहे.
  • एच-6 बॉम्बवर्षकासह त्यांच्या अनेक लढाऊ विमानांना आवश्यक सामग्रीसह दक्षिण चीन सागराच्या एका बेटावरून उड्डाण करणे व उतरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे हवाई दलाची ताकद वाढली आहे.
  • आता ते या क्षेत्रातील कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास पूर्णपणे सज्ज आहेत.

दिनविशेष :

  • 1891 मध्ये थॉमस एडीसन यांनी किनेटोस्कोप चे पहिला प्रोटोटाइप प्रदर्शित केले
  • क्यूबा देश 1902 मध्ये अमेरिकेपासून स्वातंत्र्य झाला.
  • चिआंग काई शेक चीन गणराज्यचे 1948 मध्ये पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 1850 मध्ये केसरी चे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला.
  • 1932 मध्ये लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2018)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.