Current Affairs of 20 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (20 मे 2016)

चालू घडामोडी (20 मे 2016)

प्रकल्प अहवाल निविदेला मंजुरी :

 • शहरातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी यासाठी तब्बल 18 वर्षांपूर्वी प्रस्तावित केलेल्या उच्च क्षमता द्रुतगती मार्गाचा (एचसीएमटीआर) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीच्या 90 लाख रुपये खर्चाच्या कामाला स्थायी समितीने (दि.17) बैठकीत मंजुरी दिली.
 • मुंबईस्थित स्तुप कन्सल्टंट या कंपनीला हे काम देण्यात आले आहे.
 • तसेच येत्या 4 महिन्यांत त्यांनी ते पूर्ण करायचे असून, त्यानंतर अनेक वर्षे रेंगाळलेल्या या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे.
 • एकूण 35 किलोमीटर अंतराचा हा मार्ग महापालिकेच्या 17 पेठांमधून जातो.
 • बोपोडी, औंध, भांबुर्डा, एरंडवणा, कोथरूड, हिंगणे, सदाशिव पेठ, पर्वती, वानवडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, धानोरी व कळस असा हा भाग आहे.
 • तसेच या रस्त्याच्या कामाला गती मिळावी यासाठी बागुल यांच्या प्रयत्नांमधून महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी त्यासाठी महापालिकेत स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मे 2016)

भारताकडे 1964 मध्ये होती अण्वस्त्र क्षमता :

 • आण्विक शस्त्र बनविण्याची भारताची क्षमता असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात म्हटल्याचे स्पष्ट झाले असून हा अहवाल 1964 मधील आहे.
 • ट्रॉम्बे येथील कॅनडाने पुरविलेल्या आण्विक भट्टीमधील इंधनामध्ये त्या काळत सातत्याने करण्यात येत बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेकडून अशा स्वरुपाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
 • भारताने ठरविल्यास आता ते अण्वस्त्रनिर्मिती करु शकतात.
 • अर्थात अण्वस्त्र कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशार्थ भारताकडून संशोधन केले जात असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीखाली येणाऱ्या संशोधन व गुप्तचर विभागाने 14 मे, 1964 रोजी सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटले होते.
 • तसेच या अहवालासहितच इतरही काही कागदपत्रे अमेरिकेकडून नुकतीच प्रसिद्ध (डीक्‍लासीफाय) करण्यात आली.
 • ट्रॉम्बेमधील आणिक इंधन दर सहा महिन्यानंतर बदलले जात असल्याची दखल घेत या अहवालामधून भारताच्या आण्विक महत्त्वाकांक्षेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
 • ‘सामान्य परिस्थिती’मध्ये आण्विक भट्यांमधील इंधन बदलण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी हा खूपची कमी असल्याचा इशारा या अहवालामधून देण्यात आला होता.

भारतीय शांतिरक्षकांना संयुक्त राष्ट्र पदक :

 • संयुक्त राष्ट्राच्या शांतिरक्षण अभियानात काम करताना मृत्युमुखी पडलेले चार भारतीय शांतिरक्षक व एका नागरिकासह अन्य 124 जणांना त्यांच्या साहस आणि बलिदानासाठी मरणोत्तर संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
 • आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवसाच्या निमित्ताने या नागरिकांना डॅग हॅमरस्कजोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 • भारतीय शांतिरक्षकात हेड कॉन्स्टेबल शुभकरण यादव, रायफलमॅन मनीष मलिक, अमल डेका, नायक राकेश कुमार यांचा सहभाग आहे. यांच्यासोबत गगन पंजाबी हेही मारले गेले होते.
 • संयुक्त राष्ट्र शांतिरक्षक दिवस दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो; मात्र यावर्षी तो 19 मे रोजी साजरा होईल.
 • संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून सर्व शहीद शांतिरक्षकांना पुष्पचक्र अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतील.

डॉ. शहांचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वी :

 • दुष्काळामुळे संपूर्ण महाराष्ट्र होरपळत आहे. पावसाळ्यातील पावसाचे बहुतांश पाणी नियोजनाअभावी वाहून जाते.
 • पावसाळा येण्यापूर्वीच योग्य नियोजन केले तर पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही.
 • तसेच येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यातील पावसाच्या पाण्याच्या वापरासाठी व पुनर्भरण करण्यासाठी येथील डॉ. हर्षद शहा यांनी स्वतःच्या नवजीवन हॉस्पिटलसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगबोअर पुनर्भरण यंत्रणा सज्ज केली आहे.
 • त्यामुळे कमी खर्चात पावसाळ्यात गाळलेले स्वच्छ पाणी मिळणार असून जमिनीतील पाणीपातळीही वाढणार आहे.
 • डॉ. शहा यांनी स्वतःच्या हॉस्पिटलच्या छतावरील पाणी पाइपद्वारे खाली घेतले.
 • पावसाळ्यात वापर नसेल त्या वेळी हे पाणी बोअरच्या ठिकाणी पुनर्भरण करण्यासाठी सोडले आहे.
 • त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यास निश्‍चितच मदत होणार आहे.

सातारा जिल्हात होणार ‘वॉटर बॅंक’ :

 • जलयुक्त शिवार आणि मागेल त्याला शेततळे योजनेतून जिल्ह्यात 824 शेततळी होत आहेत.
 • तसेच या शेततळ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात 1648 टीसीएम पाणीसाठा होणार आहे.
 • या ‘वॉटर बॅंके’च्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी बागायतीसह बारमाही शेती करू शकणार आहेत. याबरोबरच दुष्काळी तालुक्‍यांचाही पाणी प्रश्‍न सहज मिटणार आहे.
 • शेततळ्यांच्या माध्यमातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविणे हा एक उद्देश असून, या अडविलेल्या पाण्याचा उपयोग करून शेतकरी बागायती, तसेच कोरडवाहू शेतीत दोन वेळची पिके सहज घेऊ शकतो, तसेच शेततळ्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात पाणी जमिनीत मुरून त्यातून पाणीपातळीतही वाढ होण्यास मदत होणार आहे, तसेच या पाण्यात मत्स्यपालन, कोळंबी पालन करू शकतो.
 • तसेच त्यातून शेतीपूरक उत्पादनही घेऊ शकतो; पण सध्यातरी पावसाचे पाणी साठविण्यासाठी शेततळ्यांसारखे दुसरे माध्यम शेतकऱ्यांकडे नाही.
 • जलयुक्त शिवार अभियानात जिल्ह्यात 560 शेततळी घेण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी आतापर्यंत 120 शेततळी पूर्ण झाली आहेत.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.