Current Affairs of 19 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (19 मे 2016)
भारत वंशीय स्वाती दांडेकर एडीबीच्या संचालक :
- अमेरिकी सिनेटने भारतीय वंशाच्या मुत्सद्दी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नेमणूक केली आहे. हे पद राजदूताच्या दर्जाचे आहे.
- दांडेकर या रॉबर्ट ए. ओर यांची जागा घेतील. ओर हे 2010 पासून या पदावर कार्यरत होते.
- ओबामा यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आशियाई बँकेच्या सर्वोच्च अमेरिकी पदासाठी स्वाती दांडेकर यांची नेमणूक केली होती.
- 65 वर्षीय स्वाती दांडेकर 2003 ते 2009 या काळात आयोवा प्रतिनिधी सभेच्या सदस्य होत्या.
- तसेच 2009 ते 2011 या काळात त्या आयोवा सिनेटच्याही सदस्य होत्या.
Must Read (नक्की वाचा):
केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्था स्थापन होणार :
- प्रदूषणाची वाढती पातळी चिंताजनक आहे व प्रदूषणाचे मापन करण्याबाबत देशभरात एकाच संस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे.
- तसेच यामुळे सरकारने केंद्रीय प्रदूषण संशोधन संस्थेची स्थापना करण्याचा प्रस्ताव राज्यांसमोर ठेवला आहे.
- सरकार याबाबत गांभीर्याने विचार करत आहे असे वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी नमूद केले.
- दिल्लीत राज्यांच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांचे संमेलन झाले.
- अशी संमेलने दर 6 महिन्यांनी केंद्रीय व राज्य पातळ्यांवरही घेतली पाहिजेत, अशी सूचना करून जावडेकर यांनी सांगितले की, विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत देशात सातत्याने संशोधन होणे गरजेचे आहे.
- केंद्राने 6 प्रकारच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नव्या नियमावली मार्च 2016 मध्ये जारी केल्या असून, त्यांचे काटेकोर पालन राज्यांनी करावे, अशी सूचना त्यांनी केली.
- तसेच या नियमावलींनी राज्य सरकारांनी या संमेलनातच मान्यता दिल्याचे जाहीर केले.
- पंचमहाभूतांमधील संतुलन कायम राखणे व त्यांचे संरक्षण हे तर केंद्राचे मिशनच आहे.
पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी :
- पंतप्रधान उज्ज्वल योजनेची अंमलबजावणी करत एलईडी बल्बचे वाटप करण्यात आंध्रप्रदेश प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- गुजरातमध्ये या योजनेच्या उद्घाटनप्रसंगी सरकारने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
- जानेवारी 2015 मध्ये केंद्र सरकारने ही योजना सुरू केल्यावरनंतर आंध्रप्रदेशमध्ये 1.89 कोटी एलईडी बल्बचे वाटप झाले आहे, तर महाराष्ट्रात 1.62 कोटी बल्बचे वाटप करण्यात आले आहे.
- या दोन राज्यांनंतर उत्तर प्रदेश (1.01 कोटी), झारखंड (60.59 लाख), हिमाचल प्रदेश (59.52 लाख) यांचा क्रमांक लागतो.
- पंजाब या यादीत सर्वांत शेवटी असून, तेथे केवळ 2,544 बल्बचे वाटप झाले आहे.
मित्सुबिशीच्या अध्यक्षांचा राजीनामा :
- वाहन उत्पादन क्षेत्रातील मित्सुबिशी या कंपनीतील इंधनाच्या आकडेवारीमधील (फ्युएल डेटा स्कॅम) गैरव्यवहारप्रकरणी कंपनीचे अध्यक्ष तेत्सुरो आईकावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
- प्रोडक्ट डेव्हलपमेंट विभागातून आईकावा यांनी आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता.
- तसेच या संपूर्ण गैरव्यवहाराची सुरुवात याच विभागातून झाल्याने आईकावा यांनी राजीनामा दिल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
- मित्सुबिशी मधील काही कर्मचाऱ्यांनी सहा लाखांपेक्षा अधिक मोटारींच्या इंधनक्षमतेविषयी खोटी आकडेवारी ग्राहकांना सांगितली होती.
- कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना मोटारींच्या चार मॉडेल्सची इंधनक्षमता 5 ते 10 टक्क्यांनी वाढवून सांगितल्याचे कंपनीने मान्य केले आहे.
- मित्सुबिशीने तयार केलेल्या चार मॉडेल्सपैकी दोन मॉडेल्सची निसान मोटर्सच्या ब्रॅंडअंतर्गत विक्री करण्यात आली.
- शिवाय, कंपनीच्या आणखी मॉडेल्सचीदेखील खोटी आकडेवारी सांगण्यात आल्याची शक्यता चौकशीदरम्यान व्यक्त करण्यात आली आहे.
- सध्या आईकावा यांच्या जागी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओसामू मासुको हे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील.
- निस्सानशी हिस्साविक्री करार पूर्ण होईपर्यंत त्यांना दोन्ही पदांचा कारभार सांभाळावा लागेल.
- काही दिवसांपुर्वी दुसरी जपानी वाहन कंपनी निस्सान मोटर्सने मित्सुबिशीतील 34 टक्के हिस्सेदारीची खरेदी करण्याची घोषणा केली आहे.
पृथ्वी-2 क्षेपणास्राची यशस्वी चाचणी :
- लष्कराच्या वापरासाठी केल्या जाणाऱ्या परीक्षणाचा भाग म्हणून (दि.18) ओडिशाच्या चांदीपूर येथील एकात्म क्षेत्रात (आयटीआर) अण्वस्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पृथ्वी-2 या स्वदेशनिर्मित क्षेपणास्राची चाचणी यशस्वीरीत्या पार पडली.
- (दि.18) सकाळी 9.40 वाजतादरम्यान आयटीआरमधील संकुल-3 मध्ये मोबाइल लाँचरवर पृथ्वी-2 हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्र ठेवून चाचणी पार पाडण्यात आल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले.
- पहिली चाचणी यशस्वी पार पडताच लागोपाठ दुसरी चाचणी घेण्याची योजना तांत्रिक अडचणींमुळे सोडून द्यावी लागली.
- तसेच यापूर्वी चांदीपूर येथेच 12 ऑक्टोबर 2009 रोजी अशाच स्वरूपाच्या दोन्ही चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या होत्या.
- क्षेपणास्त्राची काही वैशिष्ट्ये –
- उंची- 9 मीटर, टप्पा एकच
- मारा करण्याची क्षमता – 350 किमी.
- अस्र क्षमता – 500 ते 1000 किलो.
- इंजिन- दोन, द्रवरूप इंधन.
- अत्याधुनिक यंत्रणा- अंतर्गत मार्गदर्शक प्रणालीमुळे अचूक वेध.
- 2003 मध्ये सशस्त्र दलात समावेश.
- डीआरडीओकडून विकसित केले गेलेले पहिले क्षेपणास्त्र
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा