Current Affairs of 2 November 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 नोव्हेंबर 2015)
रिपब्लिक ऑफ झाकीस्तान या “माझा राष्ट्र”ची निर्मिती :
- उटामधील जमिनीच्या चार एकरांच्या जागेत न्यूयॉर्कमधील एका व्यक्तीने त्याच्या स्वत:च्या रिपब्लिक ऑफ झाकीस्तान या “माझा राष्ट्र”ची निर्मिती केली आहे.
- त्याने एक राष्ट्रीय ध्वजही बनविला असून, जमिनीच्या सुरक्षेसाठी एक रोबो पहारेकरीही तैनात आहे, तसेच अधिकृत पासपोर्टसही आहे.
- झॅक लॅंडस्बर्ग याने सुमारे दशकापूर्वी नॉर्थवेस्टर्न बॉक्स एल्डर कौंटीत ऑनलाइन जमीन खरेदी केली होती.
Must Read (नक्की वाचा):
इंटरनेट स्वातंत्र्यासाठी चांगली कामगिरी :
- जगभरात इंटरनेट सेन्सॉरशिप आणि वेब जगतातील माहितीवरील सर्व्हेलन्स वाढलेला असतानाच भारतात मात्र इंटरनेट स्वातंत्र्यामध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे.
- “फ्रीडम हाऊस” या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने इंटरनेट स्वातंत्र्यासाठी चांगली कामगिरी केल्याचा दाखला अहवालातून देण्यात आला आहे.
- जगभरात इंटरनेट सेन्सॉरशिप वाढत असतानाच भारतात मात्र इंटरनेट स्वातंत्र्यात दोन टक्क्यांची वाढ झाल्याचा अहवालाचा निष्कर्ष आहे.
- सध्या भारतातील इंटरनेट स्वातंत्र्यासाठी देण्यात आलेले गुण 38 वरून 40 वर पोहोचले आहेत.
- मात्र, जिथे 42 वर्षांपूर्वी भारताचे मूल्यांकन 0 होते, त्या तुलनेत ही प्रगती समाधानकारक असल्याचे अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.
- अमेरिका आणि चीनपाठोपाठ सर्वाधिक इंटरनेट असणारा देश म्हणून भारताने आपली जागतिक क्रमवारी तिसऱ्या स्थानावर कायम ठेवली आहे.
- इंटरनेट स्वातंत्र्यात नियामक पद्धतीचे नियोजन, ऑनलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि डिजिटल ऍक्सेससाठी सकारात्मक निर्णय, यामुळेच हे शक्य झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष ब्रिजमोहन मुंजाळ यांचे निधन :
- उद्योगपती आणि हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष ब्रिजमोहन मुंजाळ (वय 92) यांचे आज दिल्लीत रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले.
- बी. एम. मुंजाळ यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील टोबा टेकसिंग या जिल्ह्यात झाला होता.
- त्यांनी ‘हीरो सायकल’ची स्थापना केली.
- 1986 मध्ये सायकलचे जगातील सर्वाधिक उत्पादन करणारी कंपनी म्हणून हीरो सायकलची नोंद गिनेस बुकात झाली होती.
- होंडाबरोबर 1984 मध्ये सुरू केलेली भागीदारी काही वर्षांपूर्वी संपुष्टात आल्यानंतर त्यांनी हीरो मोटोकॉर्प लिमिटेडची स्थापना केली होती.
- सानिया, मार्टिना डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजयी :
- भारताच्या सानिया मिर्झाने स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्या साथीने डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकाविले.
- सानिया आणि मार्टिनाच्या अव्वल जोडीने अंतिम फेरीत गार्बिनी मुगुरुझा आणि कार्ला सुआरेझ नवारो या स्पेनच्या जोडीवर 6-0,6-3 अशी सरळ सेट्समध्ये मात केली.
- सानिया आणि मार्टिनाने सलग 22 सामने जिंकण्याचा विक्रमही नोंदविला.
सोळाव्या वर्षापासूनच नागरिकांना मतदानाचा हक्क :
- देशातील 16 ते 17 वयातील लोकसंख्येकडून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच नागरिकांना मतदानाचा हक्क देण्याची मागणी कामगार नेते बिल शॉर्टन यांनी केली आहे.
- देशातील 18 ते 24 वयोगटातील सुमारे चार लाखांपेक्षा अधिक लोकांनी अद्यापही मतदानासाठी नाव नोंदवली नसल्याची माहितीही त्यांनी दिली.
- तसेच मतदानासाठीचे वय 16 करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली.
इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा :
- केंद्र सरकारच्या युवक कार्य आणि क्रीडा विभागाच्या वतीने नुकताच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाचा सर्वोच्च इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
- यामध्ये महराष्ट्राच्या डॉ. राजेश करपे, सीमा गावडे व विनायक राजगुरु यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
- 19 नोव्हेंबरला राष्ट्रपती भवनातील दरबार सभागृहामध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात येईल.
- दरवर्षी केंद्र सरकारच्या वतीने एनएसएसच्या या सर्वोच्च पुरस्काराची घोषणा होते.
- उत्कृष्ट विद्यापीठ, कार्यक्रम अधिकारी किंवा समन्वयक आणि विद्यार्थी अशा तीन विभागांमध्ये हा पुरस्कार दिला जातो.
- यंदा महाराष्ट्राने कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी गटात पुरस्कार पटकावला आहे.
‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी :
- ‘आयएनएस कोची’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरून रविवारी पहिल्यांदाच सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- ब्रह्मोस एअरोस्पेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘कोलकाता श्रेणी’ तील दुसरी युद्धनौका ‘आयएनएस कोची’ वरून ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- ब्रह्मोस हे जगातील सर्वांत वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे आणि रविवारी घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने आपल्या क्षमतेनुरूप 290 कि. मी. अंतरावरील लक्ष्य अचूकपणे भेदले.
भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रँड :
- ‘ब्रँड फायनान्स’ या संस्थेने केलेल्या ताज्या मूल्यांकनानुसार भारत हा जगातील सातव्या क्रमांकाचा ब्रँड बनला आहे.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत भारताने आपल्या देश म्हणून असलेल्या ब्रँडच्या मूल्यात (ब्रँड व्हॅल्यू) 32 टक्क्य़ांची भर घातली असून या यादीत एक वरची पायरी मिळवली आहे.
- भारताचे ब्रँड मूल्य 2.1 अब्ज डॉलर इतके आहे.
- ब्रँड फायनान्स ही संस्था दरवर्षी काही निकषांनुसार जगातील 100 मोठय़ा देशांचे मूल्यांकन करून त्यांना क्रमांक देते.
- त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, देशातील सर्व ब्रँड्सच्या विक्रीचे पुढील पाच वर्षांतील अंदाज अशा निकषांचा त्यात समावेश असतो.
- यंदाच्या यादीत अमेरिकेने आपले पहिले स्थान कायम राखले आहे.
- पहिले सात देश : अमेरिका, चीन, जर्मनी, ब्रिटन, जपान, फ्रान्स, भारत
क्ष किरण बाहेर टाकणाऱ्या तप्त वायूंचे निरीक्षण :
- कन्या तारकासमूहातील क्ष किरण बाहेर टाकणाऱ्या तप्त वायूंचे निरीक्षण केले असता विश्वात पृथ्वीवर जीवसृष्टीसाठी जेवढय़ा प्रमाणात जैवघटक मूलद्रव्ये उपलब्ध आहेत तेवढेच विश्वात इतरत्रही उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- तारे, ग्रह व जीवसृष्टी तयार करण्यासाठी लागणारी मूलद्रव्ये विश्वाच्या लाखो प्रकाशवर्षांच्या भागात समान वितरित झाालेली आहेत, ही बाब 10 अब्ज वर्षांपूर्वी घडली आहे.
- कन्या तारकासमूह 5,4 कोटी प्रकाश वर्षे दूर असून त्यातून प्रखर क्ष किरण बाहेर पडतात.
- या तारकासमूहात दोन हजार दीर्घिका असून त्यांच्यामधील जागा ही तप्त क्ष किरणांनी भरलेली आहे.
- जपानच्या सुझाकू क्ष किरण उपग्रहाच्या मदतीने जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी या संस्थेचे खगौल भौतिक शास्त्रज्ञ श्रीमती ऑरोरा सिमियानस्कू यांनी हे निरीक्षण सागामहिरा येथे केले.
- या तारकासमूहाचे बाहू केंद्रापासून 50 लाख प्रकाशवर्षे इतक्या अंतरापर्यंत पसरलेले आहेत.
- वेगवेगळे नवतारे वेगवेगळी रसायने तयार करतात. त्याचा गाभा कोसळल्यानंतर नवताऱ्यातील मूलद्रव्ये पसरतात.
- त्यात ऑक्सिजन ते सिलिकॉनपर्यंतच्या मूलद्रव्यांचा समावेश असतो. बटू स्फोटांमध्ये लोह व निकेल अशी जड मूलद्रव्ये बाहेर पडतात.
- जेव्हा अतिनवताऱ्यातील रासायनिक मूलद्रव्ये विखरतात व आंतरतारकीय अवकाशात पसरतात तेव्हा ते ताऱ्यांच्या असंख्य पिढय़ांमध्ये समाविष्ट होत असतात.
- यापूर्वी कावली इन्स्टिटय़ूट फॉर पार्टिकल अॅस्ट्रोफिजिक्स अँड कॉस्मॉलॉजी या स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या संस्थेतील नोरबर्ट वेर्नर यांनी सुझाका उपग्रहाची माहिती वापरून ययाती तारकासमूहाचा अभ्यास केला असता त्यांना लोहाचे समान वितरण दिसले पण ज्या अतिनवताऱ्यांचे केंद्र कोसळले आहे अशांच्या बाबतीत हलक्या मूलद्रव्यांचे वितरण कसे झाले आहे हे समजलेले नाही.
- कन्या तारकासमूहातील निरीक्षणात काही हरवलेले दुवे सापडले असून सिमियॉनेस्कू व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोह, मॅग्नेशियम, सिलीकॉन व सल्फर दीर्घिकेमध्ये पसरलेले पहिल्यांदा दिसून आले आहे.
- मूलद्रव्यांचे गुणोत्तर प्रमाण संपूर्ण तारकासमूहाच्या आकारमानात समान दिसते. सूर्य व इतर दीíघकांतील ताऱ्यांची रचनाही तशीच समान आढळून आली आहे.
- या अभ्यासातून असे दिसून आले की, विश्वात रासायनिक मूलद्रव्ये पसरलेली असून त्यात फारसा फरक नाही.
- सारख्याच प्रकारच्या अतिनवताऱ्यांमध्ये मूलद्रव्ये सारखीच असतात.
- सूर्यमालेच्या निर्मितीत जी द्रव्ये होती तीच विश्वात आहेत. पृथ्वीवर सजीवसृष्टीस आवश्यक असलेली जी मूलद्रव्ये आहेत ती सर्वसाधारणपणे विश्वात सारखीच पसरलेली आहेत असे सिमियॉनेस्कू यांचे मत आहे.
- अॅस्ट्रॉफिजिकल जर्नल लेटर्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
अभिनव योजना सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले :
- देशातील प्रत्येक राज्याने दरवर्षी एका राज्याची निवड करून आपली संस्कृती आणि भाषा यांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न करावा, अशी अभिनव योजना सुरू करण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे.
- सदर योजनेला ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ असे नाव देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्याची घोषणा केली.
- देशातील सांस्कृतिक दरी सांधण्यासाठी आणि विविध राज्यांमध्ये राहणाऱ्या जनतेमध्ये सुसंवाद साधण्यासाठी सदर योजना लवकरच सुरू केली जाणार आहे.
- या योजनेसाठी एक समिती तयार करण्यात आली असून ती या योजनेचे स्वरूप तयार करीत आहे.
दिनविशेष :
- 1947 : कॅलिफोर्नियात स्प्रूस गूसचे एकमेव उड्डाण
- 1953 : पाकिस्तानने आपले नाव बदलून पाकिस्तानचे इस्लामी प्रजासत्ताक असे केले
- 2000 : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (चित्रीत) पहिले रहिवासी पोचले