Current Affairs of 1 November 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 नोव्हेंबर 2015)

जीडीपी 11.5 अब्ज रुपयांचा वाटा :

  • या वर्षी झालेल्या आठव्या आयपीएल स्पर्धेने भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी) 11.5 अब्ज रुपयांचा वाटा उचलला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.
  • भारताच्या अर्थव्यवस्थेतील आयपीएलच्या उत्पन्नाचा प्रभाव किती याचे सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने ‘केपीएमजी’या क्रीडा सल्लागार समूहाची नियुक्ती केली होती.
  • आठव्या आयपीएल स्पर्धेत आठ संघ 44 दिवसांत देशातील 12 शहरांमधील 13 केंद्रांवर एकूण 60 सामने खेळले.
  • आठव्या मोसमातील स्पर्धेत एकूण 193 क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला.
  • आयपीएलच्या सामन्यातून अंदाजे 26.5 अरब रुपयांची आर्थिल उलाढाल झाली असल्याचे या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

ग्रामीण भारतामध्ये 100 ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार :

  • देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये 100 ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत.
  • तसेच बीएसएनएनकडून बँडविड्थ विकत घेण्यासाठी फेसबुक दरवर्षी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
  • वायफाय उपलब्ध करून देण्यासाठी लागणा-या सामग्रीसाठीही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे वृत्त बीएसएनलच्या अधिका-यांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
  • फेसबुकने 100 गावांची निवड केलेली असून प्रत्येक गावासाठी वर्षाला 5 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
  • आत्तापर्यंत चाचणीसाठी दक्षिण व पश्चिम भारतातल्या 25 गावांची निवड करण्यात आली आहे.
  • येत्या दोन वर्षात ही संख्या वाढवण्यात येणार आहे.
  • ग्राहकांना पहिल्या अर्ध्या तासासाठी वाय फाय मोफत मिळेल आणि एकाचवेळी साधारणपणे 2000 ग्राहक ही सुविधा वापरू शकतिल असे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले.
  • बीएसएनलने स्वत: आत्तापर्यंत 450 वाय फाय हॉटस्पॉट उभारले असून मार्च 2016 पर्यंत ही संख्या 2,500 करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
  • डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणानुसार वाय फायला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बीएसएनलच्या अधिका-यांनी सांगितले आहे.

देशातील किमान 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतले :

  • देशातील किमान 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतले आहे, असे एका नव्या पाहणीत दिसून आले आहे.
  • युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) या संस्थेने लोकांना आधारकार्ड देण्याचे काम केले आहे.
  • आताच्या आकडेवारीनुसार 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतली आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे.
  • आता मुलांनाही आधारकार्ड नोंदणीत समाविष्ट केले जाणार असून यूआयडीएआय पहिले आधारकार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी देण्यात आले.
  • त्यानंतर आजपर्यंत पाच वर्षांत 92.68 कोटी आधारकार्ड देण्यात आली आहेत व त्या योजनेच्या संकेतस्थळानुसार 92.86 कोटी आधारकार्ड देण्यात आली आहेत.

सरे विद्यापीठाचे संशोधन :

  • दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असून त्याचे भौगोलिक स्थान, कमी कार्यक्षमतेच्या ऊर्जास्रोतांचा वापर व प्रतिकूल हवामान हे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
  • या संशोधनात भारतीय वैज्ञानिकांचाही समावेश आहे.
  • सरे विद्यापीठाने याबाबत केलेल्या संशोधनानुसार दिल्लीचे हवामान, वीज वापराची संस्कृती, वाढती शहरी लोकसंख्या यामुळे सूक्ष्म कणांच्या रूपातील प्रदूषके वाढली असून ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरत आहेत.
  • विषारी हवाप्रदूषकांचे मिश्रण दिल्लीतील हवेत असल्याने ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.
  • दिल्लीत हवा प्रदूषणाने जास्त लोक मृत्यू पावतात, असे सरे विद्यापीठाचे डॉ. प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.
  • वाहनांचा वाढता वापर, औद्योगिक प्रदूषण व वाढती लोकसंख्या ही त्याची कारणे असली तरी तेथील हवेत प्रदूषण करणाऱ्या घटकांचे वेगळेच मिश्रण आहे.
  • जगात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात दिल्ली हे एक असून तेथील लोकसंख्या 25.8 दशलक्ष आहे व ती वाढत आहे.
  • तेथील वाहनांची संख्या 2010 मध्ये 47 लाख होती ती 2030 मध्ये 26 दशलक्ष होईल.
  • ऊर्जेचा वापर 2001 ते 2011 दरम्यान 57 टक्के वाढला आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्यावर्षीच्या मे महिन्यातील अहवालानुसार दिल्ली हे जगात सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
  • तेथे पीएम 2.5 कणांचे प्रमाण 153 मायक्रोग्रॅम तर पीएम 10 कणांचे प्रमाण 286 मायक्रोग्रॅम आहे.
  • हे प्रमाण जागतिक प्रमाणित पातळीपेक्षा खूपच जास्त आहे.

दिनविशेष :

  • मेक्सिको मृतक दिन
  • अल्जीरिया राष्ट्र दिन
  • अँटिगा आणि बार्बुडा स्वातंत्र्य दिन
  • केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा राज्य स्थापना दिन
  • जागतिक वनस्पतीभक्षक दिन
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.