Current Affairs of 2 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (2 जुलै 2016)
टीआयएफआरच्या संचालकपदी के. सुब्रह्मण्यम :
- टाटा मूलभूत संशोधन केंद्र (टीआयएफआर) संचलित होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या संचालकपदी प्रोफेसर के. सुब्रह्मण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम यांनी (1 जुलै) संचालकपदाची सूत्रे हाती घेतली.
- आयआयटी मुंबईमधून प्रोफेसर सुब्रह्मण्यम यांनी 1992 साली तत्त्वज्ञानात पीएच.डी. केलेली आहे.
- आयआयटी मद्रास येथून त्यांनी एरोनॉटिकल अभियांत्रिकी शाखेत पदवीही संपादन केली आहे; शिवाय हेमचंद्र चिंतामणी प्रधान यांच्यासोबत त्यांनी गणिती क्षेत्रात योगदान दिलेले आहे.
- मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांनादेखील त्यांनी मार्गदर्शन केले होते.
- शालेय स्तरावर गणित, विज्ञान विषयात विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी साहित्यनिर्मितीदेखील केलेली आहे.
Must Read (नक्की वाचा):
पोर्तुगाल युरो करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत :
- ‘पेनल्टी शूटआऊट’मध्ये पोलंडवर 5-3 अशी मात करून पोर्तुगालने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.
- दोन्ही संघांमध्ये नियोजित वेळेत 1-1 अशी बरोबरी झाली होती.
- रुई पॅट्रिसिओने मोक्याच्या क्षणी पोलंडची एक संधी निष्फळ ठरविल्याने पोर्तुगालला हा विजय साकारता आला.
- रिकार्डो क्युआरेस्माने निर्णायक गोल करत आपल्या संघाला उपांत्य फेरीत दाखल केले.
- तसेच गेल्या पाच युरो करंडक स्पर्धांमध्ये पोर्तुगालने चार वेळा उपांत्य फेरी गाठली आहे, त्यांचा सामना बेल्जियम किंवा वेल्सशी होईल.
‘मन की बात’ चे प्रक्षेपण आता बांगलादेशात :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे प्रक्षेपण लवकरच बांगलादेशातही केले जाणार आहे.
- बांगलादेशी रेडिओ चॅनेल स्थानिक भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करणार आहेत.
- भारत-बांगलादेश या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असणार आहे.
- भारतातील ऑल इंडिया रेडिओ ने बांगलादेशमधील आकाशवाणी रेडिओ चॅनेलशी चर्चा केली आहे.
- मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम बांगलादेशमधील नागरिक स्थानिक भाषेमध्ये ऐकायला मिळणार आहेत.
राज्यातील 562 शाळा अनुदानास पात्र :
- राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर सुरू असलेल्या अनेक शाळांपैकी 562 खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र करण्याबाबतचे आदेश शासनाने (दि. 1) दिले आहेत.
- 562 शाळांमध्ये 404 माध्यमिक, तर 158 प्राथमिक शाळांचा समावेश आहे. त्याचबरोबर 322 वर्ग-तुकड्यांनाही अनुदानास पात्र घोषित केले आहे.
- शासनाने कायम विनाअनुदानित शाळांना परवानगी दिल्यानंतर त्यांचा ‘कायम’ शब्द 20 जुलै 2009 रोजी काढला होता.
- तसेच त्यानंतर 15 नोव्हेंबर 2011 व 16 जुलै 2013 या शासन निर्णयान्वये अनुदान सूत्र लागू करण्यासाठी मूल्यांकनाचे निकष निश्चित केले होते.
- ऑनलाइन मूल्यांकन झालेल्या शाळांचे प्रस्ताव शिक्षण आयुक्तांनी शासनाकडे अनुदानास पात्र करण्यासाठी पाठविले होते.
- शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा आदेश काढून या शाळा अनुदानास पात्र असल्याचे घोषित केले आहे.
भारताकडून पुन्हा क्षेपणास्त्राची चाचणी :
- भारताने (दि. 1) इस्राईलच्या साथीत संयुक्तपणे विकसित केलेल्या जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या नव्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
- ओडिशा किनारपट्टीजवळील संरक्षण तळावरून प्रक्षेपण करण्यात आलेल्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 70 किलोमीटर आहे.
- संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) एका अधिकाऱ्याने चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितले.
- तसेच त्याबरोबर डीआरडीओने दोन दिवसांत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या सलग तीन चाचण्यांची ऐतिहासिक कामगिरी बजावली.
- डीआरडीओच्या हैदराबादस्थित प्रयोगशाळेने हे क्षेपणास्त्र इस्राईल एअरोस्पेस इंडस्ट्रीजच्या साथीत विकसित केले आहे.
दिनविशेष :
- 1850 : थोर शास्त्रज्ञ चार्लस डार्वीन यांनी उत्क्रांतीवादाचा सिध्दांत जाहीरपणे सर्वांपुढे मांडला.
- 2001 : अॅबिकोर स्वयंचलित हृदयाचे सर्वप्रथम आरोपण.
- 2002 : स्टीव फॉसेट हा उष्णहवेच्या फुग्याद्वारे पृथ्वीप्रदक्षिणा करणारा सर्वप्रथम व्यक्ती झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा