Current Affairs of 4 July 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 जुलै 2016)
राज्यात होणार महाकाय पेट्रो प्रकल्प :
- नवरत्नांमध्ये गणल्या जाणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्या मिळून देशातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार असून, त्यासाठी कोकणात दोन-तीन ठिकाणी शोध सुरू आहे.
- इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सर्वात मोठ्या सरकारी तेल कंपन्या व इंजिनीअर्स इंडिया लि. ही आघाडीची सरकारी अभियांत्रिकी कंपनी मिळून हा महाकाय प्रकल्प उभारणार आहेत.
- खनिज तेलाचे शुद्धीकरण आणि अन्य अनुषंगिक पेट्रोजन्य पदार्थांचे उत्पादन असा मिळून हा एकत्रित प्रकल्प असेल.
- इंडियन ऑइलचे संचालक (रिफायनरीज) संजीव सिंग यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना ही माहिती दिली.
Must Read (नक्की वाचा):
आयसीआयसीआय बँक उघडणार 400 नव्या शाखा :
- देशातील दुसऱ्या क्रमांकाची आयसीआयसीआय बँक चालू आर्थिक वर्षात नव्या 400 शाखा उघडणार आह.
- तसेच देशात नवे एक हजार एटीएम बसविणार आहे, बँकेचा विस्तार करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत आहे.
- आयसीआयसीआयचे मुख्य संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी सांगितले की, बँकेच्या विस्तारासाठी शाखा आणि एटीएम यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- विशाल नेटवर्क असलेल्या बँकांना ग्राहकही पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
- जेव्हा एखादा ग्राहक बँकेशी आर्थिक व्यवहार करतो, तेव्हा घरापासून बँकेचे अंतर किती आहे याला महत्त्व दिले जाते, असेही पाहणीत स्पष्ट झाले आहे.
नोबेल विजेते इली विसेल यांचे निधन :
- यू लोकांच्या नरसंहारातून (होलोकॉस्ट) बचावलेले आणि पुढे नोबेल पारितोषिकाचे मानकरी होण्याचा मान मिळविणारे प्रसिद्ध लेखक इली विसेल (वय 87) यांचे (दि.2) निधन झाले.
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ज्यू लोकांच्या नरसंहारासाठी तयार करण्यात आलेल्या छावण्यांमधून सहीसलामत बचावलेले प्रसिद्ध लेखक विसेल होलोकॉस्टची शिकार ठरलेल्या लाखो ज्यू नागरिकांचा आवाज बनले होते.
- विचारवंत, फर्डे वक्ते, नाटककार आणि प्राध्यापक असलेल्या विसेल यांनी जुलुमांचे शिकार झालेल्यांचा आवाज कायम जिवंत ठेवला.
- विसेल यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- विसेल यांनी आपला नोबेल पुरस्कार नाझींच्या जुलुमातून बचावलेल्यांना अर्पण केला होता.
- विसेल यांना जगभरातील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
केंद्र शासनाकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांना प्रारंभ :
- केंद्र शासनाने नावीन्यपूर्ण उपक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अटल इनोव्हेशन मिशनला प्रारंभ केला आहे.
- तसेच त्याअंतर्गत शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ची स्थापना करण्यात येणार आहे.
- विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी या लॅबोरेटरीजची स्थापना करण्यात येणार आहे.
- 500 अटल टिंकेरिंग लेबोरेटरीज स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे.
- सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळेमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज’ची स्थापना करणार आहेत.
जगातील सर्वात मोठी अवकाश दुर्बीण चीनमध्ये स्थापन :
- जगातील सर्वांत मोठी रेडिओ दुर्बीण चीनने तयार केली आहे. तिच्या शेवटच्या भागाची जोडणी (दि.3) झाली.
- ‘फाईव्ह-हंड्रेड-मीटर अर्पेचर स्फेरिकल टेलिस्कोप-फास्ट,’ असे तिचे नाव आहे.
- गुईझोवूच्या दक्षिण-पश्चिम प्रांतातील पहाड कापून तिला जागा करण्यात आली आहे.
- तसेच या दुर्बिणीच्या प्रकल्पामध्ये विश्वाचा उगम कसा झाला आणि पृथ्वीच्या पलीकडील विश्वाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठीचा जो शोध आहे त्याला बळ देऊन संशोधन करण्याची क्षमता आहे, असे चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसअंतर्गत असलेल्या नॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्वेशनचे उपप्रमुख झेंग शिओनियन यांनी (दि.3) सांगितले.
- चायनीज अकादमी ऑफ सायन्सेनने दुर्बिणीची उभारणी केली आहे.
- दुर्बीण तयार व्हायला पाच वर्षे लागली असून, सप्टेंबरपासून ती काम करू लागेल.
- 30 फुटबॉलच्या मैदानांएवढा तिचा आकार आहे,180 दशलक्ष डॉलर या दुर्बिणीला खर्च आला आहे.
राज्यात एकाच दिवशी 2 कोटी वृक्षांची लागवड :
- राज्यात एकाच दिवशी दोन कोटी 81 लाख 38 हजार 634 वृक्षांची लागवड करून महाविक्रम करण्यात आला.
- तसेच या विक्रमाच्या नोंदीसाठी ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रतिनिधी राज्यभरातील निवडक वृक्षारोपण झालेल्या स्थळांना भेट देत आहेत.
- ‘सेल्फी विथ ट्री’ स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तीन हजारांपेक्षा अधिक लोकांनी छायाचित्रे पाठविली आहेत.
- हवामानातील बदलाची तीव्रता कमी करण्याच्या उद्देशाने राज्यातील नागरिकांनी ‘दोन कोटी वृक्ष लागवड’ मोहिमेला उत्तम प्रतिसाद दिला.
- वनविभागाला एक कोटी 51 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले होते. ते पूर्ण करीत दोन कोटी 11 लाख 61 हजार 499 रोपे लावण्यात आली.
- इतर विभागांना 50 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असताना त्यांनी 61 लाख 9 हजार 137 रोपे लावीत नवीन विक्रमाची नोंद केली.
- दिनविशेष :
- 1776 : अमेरिकेने स्वतःला इंग्लंडपासून स्वतंत्र जाहीर केले.
- 1934 : मादाम मेरी क्युरी स्मृतिदीन.
- 1977 : मराठा प्रकाशक परिषदेची स्थापना झाली.
- 1991 : पृथ्वी क्षेपणास्त्राची चौथी चाचणी यशस्वी झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा