Current Affairs of 2 July 2015 For MPSC Exams

Current Affairs 2 July 2015

चालू घडामोडी 2 जुलै 2015

पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी :

 • देशातील शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मोदी सरकारने घोषणा केलेल्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी देण्यातNarendr Modi आली.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
 • देशात लागवडीखाली असलेल्या 142 दशलक्ष हेक्‍टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्रावर सिंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मॉन्सूनवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, क्षमता असूनही जलसिंचनाच्या सोयीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात.
 • ही परिस्थिती बदलण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कृषी सिंचन योजनेची घोषणा केली होती. बुधवारी झालेल्या निर्णयानंतर आता ही योजना राबविण्यास सुरवात होणार आहे.
 • तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध पद्धतींद्वारे सिंचन क्षमता वाढविली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी 1 जुलै 2015

3 जुलैपासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी कार्यान्वित :

 • येत्या 3 जुलैपासून कोणताही क्रमांक कोणत्याही सेवापुरवठादाराकडे हस्तांतरिक करण्यासाठी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी कार्यान्वित होईल, असे एका ज्येष्ठ दूरसंचारMobile Portability अधिकाऱ्याने सांगितले.
 • त्यामुळे भारतातील मोबाईलधारकांना मोबाईल क्रमांक न बदलता कोणत्याही सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करता येणे शक्‍य होणार आहे.
 • पूर्ण नंबर पोर्टेबिलिटी सुरुवातीला 3 मे अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) तांत्रिक बदल करण्यासाठी आणखी काही कालावधीसाठी परवानगी मागितली होती.
 • यापूर्वी एखादा क्रमांक अन्य सेवापुरवठादाराकडे हस्तांतरित करण्यासाठी मर्यादा होत्या. मूळ सेवापुरवठादाराच्या सेवा ज्या परिक्षेत्रात उपलब्ध आहेत तेथेच मोबाईल क्रमांक अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरीत करता येणे शक्‍य होते.
 • मात्र, ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार कोणताही ग्राहक कोणत्याही सेवापुरवठादाराकडील कोणताही क्रमांक भारतातील कोणत्याही ठिकाणी अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करू शकेल.

‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा प्रारंभ :

 • ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेत सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून 18 लाख युवकांना रोजगार मिळेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
 • तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत देशाला पुढे नेणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
 • तसेच मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजने डिजिटल क्षेत्रात 2.50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
 • तर टाटा समूह 60 हजार तंत्रज्ञांची भरती करील, असे सायरस मिस्त्री यांनी जाहीर केले.
 • भारती एन्टरप्राईजेसने येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली.

प्रवाशांसाठी 138 नंबरची हेल्पलाइन सुरू :

 • रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी 138 नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
 • तसेच आपत्कालीन, स्वच्छता, खानपान तसेच कॅटरिंग, कोचमधील दुरुस्ती, बेडरोल इत्यादींसाठी असेल.
 • चौकशी तसेच तक्रार या हेल्पलाइनवर प्रवासी करू शकतात.
 • सध्या रेल्वेकडून सुरक्षेसाठी 182 आणि 139 ही हेल्पलाइन उपलब्ध आहे.

राष्ट्रपती दक्षिणेच्या दौऱ्यावर :

 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी 29 जून रोजी दहा दिवसांच्या दक्षिण भारत दौऱ्यावर रवाना झाले आहेत. Pranav Mukharji
 • सिकंदराबाद येथील ‘राष्ट्रपती निलयम’ येथे ते प्रामुख्याने मुक्कामास असतील.
 • एक जुलैला ते तिरुमला येथील श्री तिरुपती देवस्थानास भेट देणार आहेत.
 • तीन जुलै रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या ‘उनिकी’ या नव्या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुखर्जी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  हैदराबादमधील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथे हा समारंभ होणार आहे.

 • बोलारूम येथे असलेल्या ‘राष्ट्रपती निलयम’च्या प्रांगणातील नक्षत्र वाटिकेचे मुखर्जी यांच्या हस्ते सहा जुलै रोजी उद्घाटन होईल.
 • राष्ट्रपतींचा दक्षिण मुक्काम आठ जुलैला संपणार आहे.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2015)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.