Current Affairs (चालू घडामोडी) of 2 January 2015 For MPSC Exams
अ.क्र |
ठळक घडामोडी |
1. | नियोजन आयोग झाला ‘नीती आयोग’ |
2. | “हिम्मत”चे उद्घाटन |
3. | दहशतवादविरोधी मोहिमेच्या थेट प्रेक्षेपणावर बंदी |
4. | दिनविशेष |
नियोजन आयोग झाला ‘नीती आयोग’ :
- देशाच्या आर्थिक विकासात महत्वाची भूमिका निभावणार्या नियोजन आयोगाचे आता नीती आयोग असे नामकरण करण्यात आले आहे.
- नीती आयोगाच्या कार्यकारिणीमध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांचा समावेश असेल असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राज्याचा विकास होण्यास चालना मिळेल अशी अपेक्षा मोदी सरकारने व्यक्त केली आहे.
- नियोजन आयोगाची स्थापना 1950 च्या सुमारास झाली होती.
नीती आयोगाची रचना पुढीलप्रमाणे-
- अध्यक्ष– पंतप्रधान
- नियामक परिषद– सर्व राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशचे नायाब राज्यपाल.
- क्षेत्रिय परिषद– गरजेनुसार स्थापना, यात त्या भागातील राज्यांचे मुख्यमंत्री व नायाब राज्यपाल.
- पूर्णवेळ सदस्य– संख्या कालांतराने ठरेल.
- अर्धवेळ सदस्य– जास्तीत जास्त दोन, देशातील नामांकित विद्यापीठे आणि संशोधक संस्थांमधून आळीपाळीने निवड.
- पदसिद्ध सदस्य– जास्तीत जास्त चार केंद्रीय मंत्री पंतप्रधानांकडून नामनिर्देशन.
- विशेष निमंत्रित– ठराविक विषयाचे तज्ञ.
- उपाध्यक्ष– पंतप्रधानांकडून नेमणूक.
- मुख्य कार्यकारी अधिकारी– निश्चित काळासाठी पंतप्रधानांकडून नियुक्ती, सचिवाचा हुद्दा.
“हिम्मत”चे उद्घाटन :
- महिलांच्या सुरक्षतेसाठी दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या “हिम्मत” या मोबाइलचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले.
- संकटात असतांना या मोबाइलचा वापर करूनमहिलांना पोलिसांची मदत मिळणार आहे.
दहशतवादविरोधी मोहिमेच्या थेट प्रेक्षेपणावर बंदी :
- दहशतवादी हल्ल्याच्यावेळी सुरक्षा दलांच्या मोहिमेचे थेट प्रेक्षेपण करण्यास बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत.
- गृहमंत्रालयने माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून कॅबल टेलिव्हीजन नेटवर्क रूल्समध्ये दुरूस्ती करण्याची सूचना केली आहे.
दिनविशेष :
- 1881– लोकमान्य टिळकांनी ‘मराठा‘ हे नियतकालिक सुरू केले.
- 1942– दुसर्या महायुद्धात हेलीकॉप्टरचा प्रथम वापर झाला.
- 1985– फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन.
- 1959– रशियाने ‘ल्युना 1‘ हे यान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.