Current Affairs (चालू घडामोडी) of 1 January 2015 For MPSC Exams

 

अ.क्र
ठळक घडामोडी
1. नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत प्रदर्शित
2. बँक खात्यात अनुदान
3. केंद्र सरकारची नवी योजना
4. कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार
5. न्यायाधीशांच्या नियुक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची मंजूरी
6. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या
7. दिनविशेष

 

नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत प्रदर्शित :

 • नव्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या मसुद्याची प्रत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने संकेतस्थळावर प्रदर्शित केली आहे.
 • या धोरणाबाबत या मंत्रालयाने संबंधितांकडून सुचना, भाष्य आणि दृष्टिकोन मागवले आहे.

बँक खात्यात अनुदान :

 • घरगुती गॅस ग्राहकांना 1 जानेवारीपासून त्यांच्या बँक खात्यात सिलिंडरवरील अनुदान जमा होणार आहे.
 • त्यातून ग्राहक बाजारभावानुसार सिलेंडर घेवू शकतील.
 • बँक खात्यात थेट अनुदान जमा होण्याच्या योजनेचे सदस्य होताच ग्राहकाच्या बँक खात्यात 568 रुपये जमा होतील.

केंद्र सरकारची नवी योजना :

 • औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांत सर्व प्रकारच्या नोकर्‍यांमध्ये किमान वेतन 15 हजार रुपये करण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
 • राष्ट्रीय किमान वेतन कायदा 1948 अन्वये किमान 45 आर्थिक कामांसाठी किमान वेतन ठरवून देण्याची तरतूद आहे.
 • राज्यांनाही ती लागू आहे पण राज्ये एकूण 16 हजार आर्थिक विभागात किमान वेतन ठरवू शकतात.
 • आता सरकारच्या नव्या प्रस्तावानुसार कुठल्याही क्षेत्रात काम करणार्‍या लोकांचे किमान वेतन 15 हजार रुपये म्हणजे दुपटीहून जास्त होणार आहे.

कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार :

 • कर्करोगावर रुग्णानुसार वेगळे उपचार करण्याची सोय आता उपलब्ध होणार असून त्यात भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांचा मोठा सहभाग आहे.
 • त्यांनी तरुणांच्या कर्करोग पेशी प्रयोगशाळेत वाढवण्याचा अभिनव मार्ग शोधला असून त्यामुळे उपचार शोधून काढणे सोपे झाले आहे.
 • मशिगन विद्यापीठाने हे तंत्र विकसित केले असून पृर्वीच्या पद्धतीपेक्षा तीन पट प्रभावी आहे.

न्यायाधीशांच्या नियुक्ती विधेयकावर राष्ट्रपतींची मंजूरी :

 • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायाधीशांच्या नियुक्ती करण्याच्या पद्धतीत मूलभूत बदल करणारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्त्या आयोग विधेयकावर स्वाक्षरी केली.
 • हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ऑगस्टमध्येच मंजूर केले होते फक्त राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी बाकी होती.
 • आता 24 उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयांमधील न्यायमूर्तीची नेमणूक राष्ट्रीय न्यायिक नियुक्त आयोगामार्फत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • यापूर्वीची या नियुक्त्यांसाठी अस्तीत्वात असलेली कॉलेजियम अर्थात निवड मंडळ पद्धत रद्दबातल ठरली आहे.
 • या नेमणुका न्यायिक आयोगामार्फत करण्यात याव्यात, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या :

 • बँक ऑफ इंडिया कर्मचारी संचालक पी.कोटीश्र्चरण यांची इंडियन ओव्हरसीस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • पंजाब बँकेचे कर्मचारी संचालक किशोर कुमार सांसी यांची विजया बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संचालक अनिमेश चौहान यांची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी संचालक पी.श्रीनिवास यांची युंनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्ती झाली आहे.
 • वरील सर्व नियुक्ती रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या अध्यक्षतेखालील नियुक्ती मंडळाच्या शिफारशिनुसार झाल्या आहेत.

दिनविशेष :

 • ख्रिस्ती नववर्षारंभ 2015 ह्या नवीन ख्रिस्ती सालाची सुरवात.
 • 1862 इंडियन पीनल कोड अमलात आले.
 • 1892 एक गांधीवादी कार्यकर्ता हरिभाई देसाई यांचा जन्म.
 • 1923 चित्तरंजन दास आणि पंडित नेहरू यांनी ‘स्वराज्य पार्टी’ची स्थापना केली.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World