Current Affairs of 17 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2017)

आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलाचा पगार 15 टक्के कापला जाणार :

 • सरकारी कर्मचारी असूनही तुम्ही जर घरात असलेल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारलीत तर तुमचा पगार 15 टक्के कापला जाणार आहे.
 • आसाम विधानसभेने या संदर्भातले विधेयक नुकतेच मंजूर केले आहे. मुलाच्या खात्यातून कापलेला पगार हा आई-वडिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
 • ‘प्रणाम’ (पॅरेन्ट रिस्पॉन्सबिलिटी अँड नॉर्म्स फॉर अकाऊंटबिलिटी अँड मॉनिटरींग) असे या विधेयकाचे नाव आहे.
 • ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची जबाबदारी नाकारून त्यांना वृद्धाश्रमात धाडले आहे असे आई-वडील हे लेखी तक्रार करु शकतात.
 • सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या समितीकडे ही तक्रार पीडित आई-वडिलांनी करायची आहे. त्यानंतर 90 दिवसात आई-वडिलांची जबाबदारी नाकारणाऱ्या मुलावर कारवाई केली जाईल, असेही आश्वासन आसाम सरकारतर्फे देण्यात आले आहे.

आता ड्रायव्हिंग लायसन्सही ‘आधार’शी लिंक करणार :

 • लवकरच वाहन चालक परवाना आधार कार्डला जोडण्यात येणार आहे. यासाठीची तयारी सरकारकडून सुरु करण्यात.
 • याआधी मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड आधार कार्डला जोडणे बंधनकारक करण्यात आले. यानंतर आता वाहन चालक परवानादेखील आधार कार्डला जोडण्यात येणार आहे.
 • मनी लॉन्ड्रिंग रोखण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला.
 • आता वाहन चालक परवाना आणि आधार कार्ड जोडले गेल्यास बोगस परवाने रोखण्यात मदत होईल. आधार कार्ड ही व्यक्तीची वैयक्तिक नव्हे, तर डिजिटल ओळख आहे.

‘शनि’जवळ नासाचे कॅसिनी अंतराळयान नष्ट :

 • अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थे (NASA)चे कॅसिनी अंतराळयान 20 वर्षांच्या शानदार प्रवासानंतर झाले.
 • कॅसिनी अंतराळयानाचा नासाशी संपर्क तुटला होता. हे यान त्यावेळी शनि ग्रहाच्या अतिशय जवळ दाखल झाले होते. हे यान एकाद्या पेटत्या उल्केप्रमाणे जळून नष्ट झाले.
 • कॅसिनी हे अंतराळयान 1997 मध्ये नासाने अंतराळात पाठवले होते. हे यान नष्ट झाल्यानंतर 83 मिनिटांनी याची सूचना नासाला मिळाली.
 • शनि ग्रहाच्या कक्षेत दाखल होणारे कॅसिनी हे आतापर्यंतचे एकमेव अंतराळयान होते.
 • शनि ग्रह आणि त्याच्याभोवती असलेल्या कंकणाकृती वलयाचे दृश्य या यानामुळे अतिशय जवळून पाहता आले. कॅसिनी यानाने गुरुवारी शनि ग्रहाचा शेवटचा फोटो पाठवला होता.
 • कॅसिनी अंतराळयान ज्यावेळी नष्ट झाले तेव्हा या यानाचा वेग प्रतितास 1,22,000 किलोमीटर इतका होता.
 • शनि ग्रहाच्या कक्षेत 13 वर्ष राहिल्यानंतर या यानाचे इंधन संपत आले होते. यानंतर मोहीमेच्या अखेरच्या टप्प्यासाठी नासाने ग्रँड फिनाले, असे नाव दिले होते.

आणखी सात भाषांत अनुवाद करणार गुगल ट्रान्सलेट अ‍ॅप :

 • सर्च इंजिन गुगलने अनुवादाच्या अ‍ॅपमध्ये आणखी सात भारतीय भाषांचा समावेश केला आहे.
 • गुगल ट्रान्सलेटमध्ये आता मराठी, बंगाली व उर्दूसह सात आणखी भाषा असतील.
 • ज्या भारतीय भाषांसाठी गुगल ट्रान्सलेट अ‍ॅपची सेवा सुरू केली आहे, त्यात बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तामिळ, तेलुगु व उर्दू या भाषांचा समावेश आहे.
 • अ‍ॅण्ड्रॉइड व आयओएस स्मार्टफोनमध्ये या अ‍ॅपचा उपयोग करता येईल. ही सुविधा आॅफलाइनही असणार आहे.
 • म्हणजेच इंटरनेट नसतानाही या फिचरचा उपयोग केला जाऊ शकतो.
 • मात्र, हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे.
 • या अ‍ॅपद्वारे एखाद्या भाषेतील छापील मजकुराचाही अनुवाद करता येईल. यासाठी कॅमेरा त्या मजकुराच्या प्रतिमेवर ठेवावा लागेल.
 • त्याचा अनुवाद फोनच्या स्क्रीनवर पाहता येईल. उदाहरणार्थ, रस्त्यांवरील इंग्रजीतील बोर्डाचा मजकूर या अ‍ॅपच्या माध्यमातून हिंदी व अन्य भाषेत दिसू लागेल.

भारतामध्ये ‘शून्या’चा वापर तिस-या शतकापासून, नवे संशोधन :

 • अंकगणिताला पूर्णत्व देणारे ‘शून्य’ ही भारताने दिलेली देणगी आहे.
 • भारतात ‘शून्या’चा वापर मानले गेले त्याहून सुमारे पाचशे वर्षे आधी म्हणजे तिस-या किंवा चौथ्या इसवी शतकात झाला असावा, असे संशोधनावरून स्पष्ट झाले आहे.
 • सत्तर भूर्जपत्रांवर लिहिलेले ‘भाखशाली हस्तलिखित’ हा ‘शून्या’चा वापर दर्शविणारा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.
 • पेशावरजवळच्या भाखशाली गावातील शेतात खोदमाक करताना सन 1881 मध्ये हे हस्तलिखित मिळाले म्हणून ते ‘भाखशाली हस्तलिखित’ म्हणून ओळखले जाते.
 • नव्या संशोधनानुसार ‘भाखशाली हस्तलिखित’हे आता त्याहूनही प्राचीन ठरले आहे.

दिनविशेष :

 • भारतात राष्ट्रीय श्रम दिवस व विश्वकर्मा जयंती.
 • 1950 : नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान जन्मदिवस

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.