Current Affairs of 16 September 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2017)

चालू घडामोडी (16 सप्टेंबर 2017)

देशातील व्हीआयपी संस्कृतीत वाढ :

  • केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व्हीआयपी लोकांना विशेष सुरक्षा देण्याबाबत यूपीए सरकारपेक्षाही पुढे गेले आहे.
  • यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारने 350 लोकांना विशेष सुरक्षा (झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स श्रेणी) दिली होती. या संख्येत आता वाढ होऊन हा आकडा 475 च्या पुढे गेला आहे.
  • भाजप सरकारने अनेक साधुसंतांनाही विशेष सुरक्षा पुरवली आहे. यामध्ये योगगुरू रामदेव बाबा, माता अमृतानंदमयी, रामजन्म भूमी श्राइन बोर्डचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, वादग्रस्त खासदार साक्षी महाराजांचा समावेश आहे.
  • तसेच गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह जे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांनाही विशेष सुरक्षा देण्यात आली आहे.
  • विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: देशातील व्हीआयपी संस्कृती संपवण्याबाबत भाष्य केले होते. त्यांनी सरकारी गाड्यांवरील लाल, निळे, पिवळे दिवे काढून टाकण्यासाठी कायदा केला होता.

गणेशोत्सव स्पर्धेत नोएडाचे गणराज मंडळ प्रथम :

  • राजधानी दिल्ली व परिसरामध्ये दरवर्षी उत्साहाने साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये प्रथमच घेतलेल्या सजावट स्पर्धेत ग्रेटर नोएडामधील गणराज महाराष्ट्र मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला, तर गुरुग्रामच्या (गुडगाव) सार्वजनिक उत्सव समिती मंडळाला दुसरा क्रमांक मिळाला. तिसरा क्रमांक पश्चिम विहारमधील आनंदवन कल्चरल सोसायटीला मिळाला.
  • दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने आयोजित केलेल्या या स्पर्धेचा निकाल येथील प्रतिष्ठित इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव आणि मुख्य परीक्षक सच्चिदानंद जोशी यांनी 15 सप्टेंबर रोजी जाहीर केला.
  • प्रथम क्रमांकाला 51 हजार रुपये, व्दितीय 21 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 11 हजार रुपयांचे बक्षीस आहे. याशिवाय सात मंडळांना उत्तेजनार्थ बक्षिसेही जाहीर करण्यात आली.
  • तसेच लोकसत्ता या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक होते. लोकसत्ता हे दिल्लीतून प्रकाशित होणारे एकमेव मराठी दैनिक आहे.

मिस इंडिया सुपर टॅलेंटेड कौशिकी नाशिककर :

  • बंगळुरू येथे अलीकडेच झालेल्या ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट’ स्पर्धेत नागपूरची कौशिकी नाशिककर हिने बाजी मारली असून तिच्या यशामुळे शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नागपूरच्या सौंदर्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असलेला नावलौकिक आता कौतुकाचा विषय ठरत आहे.
  • बंगळुरू येथील दावणगिरीला जेनेसीस रिसोर्टमध्ये ‘मिस इंडिया सुपर टॅलेंट – सिझन 9’ ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये ‘मिस परफेक्‍ट’ या गटात कौशिकीने विजेतेपद पटकावले.
  • देशभरातील शेकडो सौंदर्यवतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. देशाच्या विविध भागांमध्ये जवळपास सहा ठिकाणी या स्पर्धेसाठी ऑडिशन्स घेण्यात आल्या. त्यापैकी 15 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
  • तसेच या पंधरा स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत झाली. यात सौंदर्य, कॅटवॉक, सामान्यज्ञान आदी गोष्टींची चाचणी घेण्यात आली. यासाठी चार दिवस सर्व स्पर्धकांकडून कसून तयारी करून घेण्यात आली. जिद्द, मेहनत, कौशल्य आणि सौंदर्याच्या जोरावर कौशिकीने हा खिताब पटकावला.

आता राज्यात दुधाळ जनावरांना युनिक कोड :

  • राज्य शासनाने प्रत्येक ठिकाणी आधार सक्तीचे केले आहे. आधार कार्डवर माणसाची एका क्लिकवर ओळख होते.
  • केंद्र शासनाने दुधाळ जनावरांनाही पशुसंजीवनी योजनेत आधार प्रमाणेच बारा अंकी युनिट कोड देण्यात येत आहे.
  • जिल्ह्यात 89 हजार 44 दुधाळ जनावरांतील 54 हजार 719 गाई व 34 हजार 325 म्हशींना टॅग (बिल्ला) लावला जात असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुधाकर शिरसाठ यांनी दिली.
  • पाळीव जनावरांना स्वताची ओळख मिळवून देण्याचे काम केंद्र शासनाच्या नॅशनल मिशन ऑफ बोव्हाईन प्राडक्टिव्हीटी या योजनेतंर्गत हे काम केले जात आहे.
  • विशेषत: दुधाळ जनावरांना युनिक आयडेंटीफिशन कोड असलेला फायबरचा टॅग(बिल्ला) लावला जात आहे. यातून शासनाला जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
  • तसेच धुळे जिल्ह्यात सुमारे पंधरा दिवसापासून दुधाळ गाई-म्हशींना टॅग लावले जात आहे.
  • जनावरांचे टॅगिग झाल्यानंतर सबंधीत गांवातील जनावरांच्या सर्व माहितीची मास्टर फाईल तयार करण्यात येणार आहे.
  • सबंधीत पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन विकास अधिकारी वा कर्मचा-यांना शासनाच्या वेबसाईटवर युजर फाईल तयार होईल. त्यात सर्व माहिती ऑनलाइन भरावी लागणार आहे.

विद्या प्रतिष्ठानला राष्ट्रीय पातळीवर व्दितीय क्रमांक :

  • बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला स्वच्छ महाविद्यालय म्हणून राष्ट्रीय पातळीवर व्दितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
  • सुमारे चाळीस हजार महाविद्यालयांमधून बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या महाविद्यालयास व्दितीय क्रमांक प्राप्त झाल्याने विद्या प्रतिष्ठानच्या नावलौकीकात या निमित्ताने भर पडली.
  • 14 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन महाविद्यालयाला गौरविण्यात आले.
  • विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवारमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी संस्थेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समितीने देशभरातील या 174 महाविद्यालयांची यादी तयार करुन अंतिम दहा महाविद्यालयांची निवड केली.
  • तसेच यातून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयास दुस-या क्रमांकाचे गुण मिळाल्याने त्यांना गौरविण्यात आले.

दिनविशेष :

  • 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो.
  • निसर्ग कवी, शेतकरी, आमदार अशी ओळख असलेले प्रख्यात “ना.धों. महानोर” (नामदेव धोंडो महानोर) यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.