Current Affairs of 17 October 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2017)

चालू घडामोडी (17 ऑक्टोबर 2017)

भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचणार :

 • येत्या काही महिन्यांमध्ये जगभरातील मोबाईल वापरकर्त्यांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे.
 • भारतही याला अपवाद नसून त्यामुळे या क्षेत्रात भारत अमेरिकेला मागे टाकणार आहे.
 • 2018 मध्ये भारतातील मोबाईल वापकर्त्यांची संख्या तब्बल 53 कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज अमेरिकास्थित झेनिथ या एजन्सीने व्यक्त केला आहे.
 • या यादीत चीन भारतापेक्षा पुढे आहे.
 • 2018 मध्येही चीन आघाडी कायम राखेल आणि तेथील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या 1.3 अब्ज असेल, असा अंदाज झेनिथने वर्तवला आहे.
 • यामध्ये अमेरिका 29 कोटी मोबाईल वापरकर्त्यांसह तिसऱ्या क्रमांकावर असेल.
 • पुढील वर्षभरात जगातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या वेगाने वाढणार असल्याचे ‘झेनिथ’ने म्हटले.

जनधन बँक खाती उघडल्यामुळे तंबाखू आणि दारु सेवनात घट :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी जनधन योजनेतंर्गत उघडण्यात आलेली बँकखाती विरोधकांच्या टीकेचा विषय असला तरी या सगळ्यातील एक सकारात्मक पैलू नुकताच समोर आला. ही बँक खाती उघडण्यात आल्यामुळे विशेषत: ग्रामीण भागात दारू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात घट झाली आहे.
 • ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या इकॉनॉमिक रिसर्च विंगच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली.
 • जनधन, आधार आणि मोबाईल (JAM) हे तीन घटकांच्या समन्वयामुळे सरकारला अनुदानाची रक्कम अधिक योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवता येत आहे.
 • त्यामुळे ग्रामीण भागात दारू आणि तंबाखू यासारख्या अपायकारक पदार्थांच्या सेवनाचे प्रमाणही कमी झाले आहे.
 • महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यांमधील लोकांच्या जीवनशैलीतही लक्षणीय फरक पडला.
 • या अहवालानुसार ऑक्टोबर 2016 पासून हे बदल दिसायला सुरूवात झाली.

गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध :

 • दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे.
 • दोन न्युट्रॉन ता-यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात.
 • या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे.
 • या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांचेही महत्वपुर्ण योगदान आहे.
 • दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ 13 कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे.
 • यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून खुप दुर अंतरावर होत्या.
 • ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे.
 • ता-यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला.
 • या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे.
 • यामुळे दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे.

 

स्वदेशी बनावटीचे पाणबुडीभेदी जहाज नौदलात दाखल :

 • आयएनएस किल्तानमुळे भारताची संरक्षण व्यवस्था अधिक सुदृढ झाली आहे.
 • याशिवाय, या लढाऊ जहाजाची बांधणी पूर्णत: भारतात करण्यात आली आहे.
 • यामुळे या जहाजाचा नौदलातील समावेश हा “मेक इन इंडिया” या योजनेमधील यशाचाही क्षण आहे.
 • भारताच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज (सोमवार) “आयएनएस किल्तान” या स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीभेदी लढाऊ जहाजाचा औपचारिकरित्या भारतीय नौदलात समावेश करण्यात आला.
 • “प्रोजेक्‍ट 28” या नौदलाच्या प्रकल्पांतर्गत बांधणी करण्यात आलेल्या कार्मोता प्रकारातील (क्‍लास) चार लढाऊ जहाजांपैकी “आयएनएस किल्तान” हे तिसरे लढाऊ जहाज आहे.
 • या जहाजावर स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्रे बसविण्यात आली असून; हवाई व “सोनार” सर्वेक्षण प्रणालींचाही या जहाजावर अंतर्भाव करण्यात आला आहे.
 • लक्षद्वीप आणि मिनिकॉय या बेटसमूहांमध्ये वसलेल्या व व्यूहात्मकदृष्टया महत्त्वपूर्ण असलेल्या आमिनिदिवी बेटांमधील एका बेटावरुन या जहाजाचे नाव ठेवण्यात आले आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.