Current Affairs of 17 March 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 मार्च 2018)
राज्यात प्लॅस्टिक, थर्माकोलच्या उत्पादनांवर बंदी :
- राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोलपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत केली.
- तसेच उल्लंघन करणाऱ्यांना 25 हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
- राज्यात वर्षाला दहा हजार 955 टन प्लॅस्टिकचा वापर केला जात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मंत्रिमंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती निवेदन करताना कदम यांनी दिली.
- यावर बंदी –
- प्लॅस्टिकपासून तयार करण्यात येणाऱ्या पिशव्या; तसेच पॅलिस्टायरिन (थर्माकोल), प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या डिस्पोजेबल वस्तू-ताट, कप, प्लेट्, ग्लास, काटे-चमचे, वाटी, स्ट्रॉ, कटलरी, नॉन ओव्हन पॉलिप्रॉपिलेन बॅग, स्प्रेड शीट्स, प्लॅस्टिक पाऊच, सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक वेष्टनाचा वापर, उत्पादन, साठवणूक, वितरण, घाऊक आणि किरकोळ विक्री, आयात आणि वाहतूक करण्यास राज्यात बंदी असणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
राज्यातील आयटीआयमध्ये जागा वाढणार :
- पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्रात दरवर्षी किमान एक ते दीड लाख प्रशिक्षित कामगारांचा तुटवडा भासत असल्याने उत्पादनक्षमतेवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत कुशल मनुष्यबळ विकासाला प्राधान्य देण्यासाठी राज्य शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेश क्षमता 70 हजारांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यामुळे बहुतेक जिल्ह्यांत सरासरी एक ते दीड हजारांवर जागा वाढणार आहेत. यातून तेवढेच कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे भविष्यात औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाची उणीव भरून निघण्यास मदत होईल.
- पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक आस्थापना व दरवर्षी लागणारे कुशल मनुष्यबळ –
कोल्हापूर 3 हजार 200 – 40 हजार
सांगली 2 हजार 200 – 20 हजार
कऱ्हाड 1 हजार 200 – 10 हजार
पुणे 8 हजार 500 – 70 हजार
दलेर मेहंदीला दोन वर्ष तुरुंगवासाची शिक्षा :
- पतियाळा न्यायालयाने 2003 सालच्या मानव तस्करी प्रकरणात प्रसिद्ध पंजाबी पॉप गायक दलेर मेहंदीला दोषी ठरवून दोनवर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
- दलेर मेहंदी आणि त्याचा भाऊ शमशेर सिंग यांच्यावर बेकायदरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप होता. दलेर आणि त्याचा भाऊ सामान्य नागरिकांना आपल्या ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून परदेशात पाठवायचे. अवैधरित्या अशी मानव तस्करी करण्यासाठी ते घसघशीत रक्कमही आकारायचे. दरम्यान दलेर मेहंदीला जामिनही मिळाला आहे.
- मेहंदी बंधु 1998 आणि 1999 साली दोन ट्रुप घेऊन परदेशात गेले होते. त्यावेळी ट्रुपचे सदस्य असल्याचे दाखवून ते बेकायदरित्या दहा जणांना अमेरिकेत घेऊन गेले. बशिक्ष सिंग यांच्या तक्रारीवरुन पतियाळा पोलिसांनी 2003 साली दलेर आणि त्याचा भाऊ शमशेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर या दोन भावांविरोधात घोटाळयाच्या अनेक तक्रारी समोर आल्या.
रांगोळीतुन डिजिटल बनोचा संदेश :
- भारताला जगात महासत्ता म्हणून नेतृत्व करायचे असेल तर डिजिटल इंडिया शिवाय पर्याय नाही, असा संदेश संस्कारभारतीच्या डोंबिवली समितीच्या रांगोळी कलाकारांनी नववर्षाच्या स्वागतासाठी श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली येथे काढण्यात आलेल्या महारांगोळीतून दिला आहे.
- गेली 35 वर्षांपासून साहित्य व ललितकला संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या संस्कार भारतीने ‘डिजिटल बनो’ मार्फत जगाशी जोडणाऱ्या सर्वच सोशल साईटवरील चिन्हांसोबतच पारंपरिक चिन्हांचा देखील समावेश या रांगोळीत केलेला आहे.
- सुमारे 200 किलो रांगोळी, 150 किलो रंग, 30 रांगोळी कलाकार आणि अखंड 8 तासांच्या परिश्रमातून साकारण्यात आलेली ही महारांगोळी 15×55 फूटांची आहे. समाजात नसूनही Socially Connect असणाऱ्या सर्वांना ‘डिजिटल बनो, भारत को महासत्ता बनाओ’ चे आवाहन करण्यात आले आहे.
आखाडा परिषदेकडून भोंदू बाबांची तिसरी यादी जाहीर :
- अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची तिसरी यादी 16 मार्च रोजी जाहीर केली. या यादीत दोन प्रसिद्ध नावांचा समावेश आहे.
- यामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी तर कल्कि फाऊंडेशनचे संस्थापक आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या नावाचा समावेश आहे.
- आखाडा परिषदेने स्वामी चक्रपाणी आणि आचार्य कृष्णम यांच्या यादीतील नावाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे दोन्ही बाबा कुठल्याही संन्याशी परंपरेतून आलेले नाहीत.
- तसेच आखाडा परिषदेच्या या बैठकीत कुंभमेळ्यासंबंधी देखील काही प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत.
दिनविशेष :
- 17 मार्च 1882 हा दिवस आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक ‘विष्णूशास्त्री चिपळूणकर’ यांचा स्मृतीदिन आहे.
- भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांचा जन्म 17 मार्च 1909 रोजी झाला.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र विश्वास यांचा जन्म 17 मार्च 1927 रोजी झाला.
- 17 मार्च 1969 रोजी ‘गोल्ड मायर’ ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
- मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला 17 मार्च 1997 मध्ये सुरवात झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा