Current Affairs of 17 March 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (17 मार्च 2016)
लोकसभेत ‘आधार’ विधेयक मंजूर :
- राज्यसभेने सुचविलेल्या पाच सुधारणा आणि घाईगडबडीत निर्णय न घेण्याची विरोधकांची विनंती फेटाळून (दि.16) लोकसभेत आधार विधेयक मंजूर करण्यात आले.
- वरिष्ठ सभागृहाने सुचविलेल्या पाच सुधारणा फेटाळून लोकसभेत आधार विधेयक 2016 आवाजी मतदानाने मंजूर केले, त्यानंतर लोकसभेचे कामकाज 25 एप्रिलपर्यंत तहकूब केल्याची घोषणा करण्यात आली.
- राज्यसभेने सुचविलेल्या सुधारणांसह अथवा सुधारणांविना लोकसभेत धन विधेयक मंजूर झाले की ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्याचे मानले जाते.
- राज्यसभेने सुधारणा सुचवून ते विधेयक तातडीने लोकसभेकडे पाठविण्यात आल्यानंतर तातडीने ते लोकसभेत मांडण्यात आले.
- लाभार्थीना योजनांचा थेट लाभ व्हावा यासाठी आधार विधेयक हे महत्त्वाचे साधन असल्याचे सरकारचे मत आहे.
- केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले.
- आधारचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेत त्याबाबतचा कायदा करता येणार नाही, हा विरोधकांचा आक्षेपही जेटली यांनी फेटाळला.
Must Read (नक्की वाचा):
सर अँड्रय़ू वाइल्स यांना ‘आबेल’ पुरस्कार :
- ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर अँड्रय़ू वाइल्स यांनी तीनशे वर्षे गूढ बनून राहिलेला एक कूटप्रश्न सोडवला असून त्यांना त्यासाठी गणितातील नोबेल मानला जाणारा आबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- हा पुरस्कार 5 लाख पौंडाचा आहे, नॉर्वे विज्ञान व साहित्य अकादमीच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
- 1994 मध्ये वाइल्स यांनी फेरमॅटच्या शेवटच्या सिद्धांताचे पुरावे दिले असून तो सिद्ध केला आहे.
- फ्रेंच गणितज्ञ पिअर डी फेरमॅट यांनी 1637 मध्ये ‘एक्सएन प्लस वायएन इज इक्वल टू झेडएन’ हे समीकरण मांडले होते, त्यात एनची किंमत 2 पेक्षा जास्त होती.
- तसेच हे समीकरण वाइल्स यांनी सिद्ध करून दाखवले.
- 2002 पासून आबेल पुरस्कार निल्स हेन्रीक आबेल यांच्या नावाने दिला जातो.
चीनची नवीन पंचवार्षिक योजना :
- आर्थिक मंदीला लगाम लावण्यासाठी चीनच्या संसदेने (दि.16) नवीन पंचवार्षिक योजनेला मंजुरी दिली.
- तसेच त्यात आर्थिक आणि सामाजिक विकासाचा आराखडा निश्चित करण्यात आला आहे, त्यात वार्षिक 6.5 टक्के आर्थिक वृद्धीचे ‘लक्ष्य’ ठेवण्यात आले आहे.
- चीनने 2020 पर्यंत एका संपन्न समाजाची निर्मिती करण्यासाठी एक उद्दिष्ट निश्चित केले आहे.
- तसेच त्यानुसार 2021 मध्ये चीनची कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)च्या 100 व्या वर्षानिमित्त सकल घरेलू उत्पादन आणि प्रतिव्यक्ती उत्पन्न 2010 च्या स्तरापेक्षा दुप्पट करण्याचे ‘लक्ष्य’ निश्चित करण्यात आले आहे.
- पुढील पाच वर्षांत मध्यम उच्च वृद्धी कायम ठेवणे हे पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.
- या योजनेनुसार चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार 90 हजार अब्ज युआन (13,800 अब्ज डॉलर) पार करण्याची शक्यता आहे.
सर्व पोलीस ठाणे माहिती ग्रीडशी जोडणार :
- गुन्हे आणि गुन्ह्यांसंबंधीची आकडेवारी गोळा करणे शक्य व्हावे यासाठी देशभरातील सर्व पोलीस ठाणे एका माहिती ग्रीडशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
- या प्रणालीचे ‘गुन्हा आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (सीसीटीएनएस) प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले आहे.
- तसेच ही माहिती ग्रीड संचालित करण्यासाठी संबंधित राज्यांच्या सिस्टिम इंटिग्रेटर्सची मदत घेण्यात येईल.
- राज्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना हँड होल्डिंग प्रशिक्षण प्रदान करतील.
- केंद्र सरकार चालू वित्त वर्षापर्यंत सीसीटीएनएस प्रकल्पाचा संपूर्ण खर्च सहन करेल.
- तसेच या प्रकल्पाद्वारे राज्यांच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये संगणक, हार्डवेअर/सॉफ्टवेअर, नेटवर्किंग क्षमता निर्माण करण्यात येईल.
ज्येष्ठ शहनाईवादक अली अहमद हुसेन खान यांचे निधन :
- प्रख्यात शहनाईवादक उस्ताद अली अहमद हुसेन खान यांचे (दि.16) येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.
- भारतरत्न बिस्मिल्ला खान यांच्यानंतरचे प्रख्यात शहनाईवादक म्हणून अली अहमद हुसेन खान यांचा लौकिक होता.
- बनारस शहनाई संगीत घराण्याशी संबंधित असलेले अली खान यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2009 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
- बनारसमध्ये शहनाईवादकांच्या घराण्यात जन्मलेले अली खान यांचे शास्त्रीय आणि निमशास्त्रीय संगीतावर प्रभुत्व होते.
- पश्चिम बंगाल सरकारने 2012 मध्ये त्यांचा बंगभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.
मादाम तुसाँच्या म्युझियममध्ये नरेंद्र मोदींचा पुतळा उभारणार :
- मादाम तुसाँच्या वॅक्स स्टॅच्यू किंवा मेणाच्या पुतळ्यांच्या म्युझियममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दाखल होणार आहे.
- पुढील महिन्यात लंडन, सिंगापूर, हाँगकाँग व बँकॉकमधल्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये मोदींचा पुतळा बसवण्यात येणार आहे.
- जागतिक राजकारणातलं बडं प्रस्थ असं वर्णन म्युझियमने मोदींचं केलं आहे.
- मादाम तुसाँच्या कलाकारांचं कौशल्य, व्यावसायिकपणा आणि कामावरील निष्ठा मनाला भिडल्याचे मोदींनी म्हटले आहे.
- मोदींची ओळख बनलेल्या कुर्त्यामध्येच त्यांनी या पुतळ्यासाठी पोज दिली आहे.
- पारपंरिक नमस्ते करताना मोदी या पुतळ्यामध्ये दिसणार आहेत.
- टाइम मॅगेझिनच्या टॉप टेन पर्सन्समध्ये मोदी असून जागतिक बाजारात ते अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व असल्याचेही म्युझियमने म्हटले आहे.
दिनविशेष :
- 1944 : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना.
- आयर्लंड सेंट पॅट्रिक दिन
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा