Current Affairs (चालू घडामोडी) of 17 April 2015 For MPSC Exams
Current Affairs On (17 April 2015) In English :
“Agni-3” Missile Test Successful :
- “Agni-3” or on the island was a successful test of artificial nuclear flow indigenous missile Wheeler.
- The missile hit the ground on the ground, the range is more than three thousand kilometers.
- 55 minutes past nine in the morning, “fire-3” of the test was.
- Army Strategic Forces commond was tested.
- “Agni-3” was the third test or missile.
Visakhapatnam Or Destroyer Commissioned INS :
- Visakhapatnam, India’s INS Mumbai will be on April 20 at the Destroyer launching dock Modification.
- That may not appear on the radar of the Navy destroyer is the first consisting of 15 – B project.
- Since woman launched this year Navy major Admiral R. yuddhanaukece. The Dhawan Dhawan ‘s wife menu will hands traditions.
- Agreement to create a new category in 2011 was four destroyers.
- The missile destroyer has been installed, and a variety of sensors.
- Features –
- The ability to hit targets on the shore and the sea, the angel of the distance “vhartikali loncda missile” system
- Multipurpose radar systems that advance notice of danger. Such as very low destroyer in the world
- 163 m: length
- 17.4 m: height
- 4: Gas pressure
- 30 Knots: speed
- 300: Staff-Officer
Saina Nehwal International Rankings Again In The First Place:
- Indian badminton player Saina Nehwal she has won first place in the international rankings.
- The list is published on Thursday, has been ranked down two suerui Li of China.
- India Open Grand Prix Gold in World number win Saina Nehwal became the first Indian woman to get first place.
- Then the Malaysian Open Super Series after they were second.
Pandit Suresh Talwalkar And Dina Award:
- Deenanath Mangeshkar was announced that the award ofFoundation Thursday.
- “This year Deenanath Mangeshkar Award” Pandit Suresh Talwalkar has been released on Wednesday.
Day Special :
- 1953 – India’s First Independence came into existence.
- 1811 – Best Marathi sacciform Yashwant Date of Ramakrishna died.
- 1975 – India’s second President, Dr. Sarvopalli Radhakrishnan died.
Must Read (नक्की वाचा):
चालू घडामोडी (17 एप्रिल 2015) मराठी :
“अग्नी-3” क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- “अग्नी-3” या स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची व्हिलर बेटावर यशस्वी चाचणी करण्यात आली.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राचा पल्ला तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त आहे.
- सकाळी नऊ वाजून 55 मिनिटांनी “अग्नी-3″ची चाचणी करण्यात आली.
- लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडतर्फे ही चाचणी झाली.
- “अग्नी-3” या क्षेपणास्त्राची ही तिसरी चाचणी होती.
आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेचे जलावतरण :
- भारताच्या आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेचे जलावतरण मुंबई येथील माझगाव डॉक 20 एप्रिलला होणार आहे.
- नौदलाच्या 15-बी या प्रकल्पाअंतर्गत तयार होणारी ही पहिलीच दिसू न शकणारी रडारवर विनाशिका आहे.
- युद्धनौकेचे जलावतरण महिलेकडून होत असल्याने यंदा नौदलप्रमुख ऍडमिरल आर. के. धवन यांच्या पत्नी मीनू धवन यांच्याहस्ते परंपरेप्रमाणे होणार आहे.
- नव्या वर्गातील चार विनाशिका तयार करण्याचा करार 2011 मध्ये झाला होता.
- या विनाशिकेवर विविध क्षेपणास्त्र आणि सेन्सर बसविण्यात आले आहेत.
- वैशिष्ट्ये –
- किनाऱ्यावरील आणि समुद्रावर दूत अंतरावरील लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता असलेली “व्हर्टिकली लॉंच्ड मिसाईल” यंत्रणा
- धोक्याची आगाऊ सूचना देणारी बहुउद्देशीय रडार यंत्रणा. जगात अशा प्रकारच्या फार कमी विनाशिका
- 163 मीटर : लांबी
- 17.4 मीटर : उंची
- 4 : गॅस टर्बाईन्स
- 30 नॉट्स : वेग
- 300 : कर्मचारी-अधिकारी
आंतरराष्ट्रीय क्रमवारीत साईना नेहवाल पुन्हा प्रथम स्थानी :
- भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवाल हिने पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रमवारी प्रथम स्थान पटकाविले आहे.
- गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार चीनच्या ली शुएरुई ही दोन क्रमांकांनी खाली गेली आहे.
- इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्डमध्ये विजय मिळवून साईना ही जागतिक क्रमावारीत प्रथम स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली.
- त्यानंतर मलेशियन ओपन सुपर सीरिजनंतर ती दुसऱ्या क्रमांकावर गेली होती.
पंडित सुरेश तळवलकर यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर :
- मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या प्रतिष्ठानातर्फे देण्यात येणार्या पुरस्कारांची गुरवारी घोषणा करण्यात आली.
- यंदाचा “मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” पंडित सुरेश तळवलकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
दिनविशेष :
- 1953 – स्वातंत्र्य भारताची पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- 1811 – श्रेष्ठ मराठी कोशाकार यशवंत रामकृष्ण दाते यांचे निधन.
- 1975 – भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वोपल्ली राधाकृष्णन यांचे निधन.