Current Affairs (चालू घडामोडी) of 16 April 2015 For MPSC Exams

Current Affairs On (16 April 2015) In English :

Sun Bahadur Thapa Of Nepal Died :

 • Sun Bahadur Thapa of Nepal ‘s  died after a brief illness.
 • He was 87 years old.
 • They were nearly five times Prime Minister of Nepal.
 • In 1963, he became prime minister five times during 2004.
 • This is the first Prime Minister Thapa in Nepal after the start of the Panchayat Raj system.

Netaji Subhash Chandra Bose And The Public Will Be Confidential Files :

 • Netaji Subhash Chandra Bose and the government the “confidential” files have to be public.
 • Cabinet Secretary has appointed a high-level committee under the chairmanship of the Centre.
 • The first meeting of this committee is going to be today.
 • “Official secrecy legislation” This committee has been set up to scrutiny.

Najam Sethi Is The Interim President Of The International Cricket Council :

 • Najam Sethi, president of the executive committee of the Pakistan Cricket Board is likely to become interim president of the International Cricket Council.
 • Bangladesh Mustafa Kemal had fallen vacant after the resignation of the chairman of the top of this month.
 • Former Pakistan Cricket Board chief Sethi. The maximum term of the Sethi was going to be president for one year from July.

Water On Mars May :

 • “NASA” the researchers said that aggravating of kyuriositi is more likely to absorb water by soil water spacecraft on Mars found on the Mars mission.
 • Calcium is found in the soil on Mars has found parakloraida discovered not only the ability to ice water in the soil.
 • And found a large amount of salt is a liquid substance found in soils began to search for the name of the substance parakloraida and calcium in the soil.
 • This takes the soil to absorb water from the atmosphere at the right time, the situation can be found in the night and in winter sunrise Canada will decide uranium to India five years.

Canada Will Decide Uranium To India Five Years :

 • Meanwhile, the ability of both countries signed 13 agreements in the field of development.
 • Prime Minister of Canada has signed a contract with Modi on Wednesday after a comprehensive discussion with Stephen Harper.
 • Americans will spend $ 254 million for three thousand metric tons of uranium, as well as Russia and India is currently supplied uranium kajhagastan.
 • The supply of uranium will be prescribed by the International anuurja vouchers security.
 • Nuclear fuel supply agreement with the Canadian company will kemiko Corp of India.

Intercontinental Missile Test Successful :

 • Pakistan on Wednesday successfully test fired Intercontinental.
 • With the help of the community and its traditional bearing 1300 km Can be brought to bear.
 • So many Indian cities are now in the phase of the Pakistani missile.
 • 9 March 3 Intercontinental and Pakistan Shaheen missile carrying beam was tested nuclear weapons and general bearing .
 • Its range is 2750 km.

Day Special :

 • April 16 – the day the railway
 • 1853 – India ‘s first railway station on the Mumbai railway track to start.

चालू घडामोडी (16 एप्रिल 2015) मराठी :

नेपाळच्या सूर्य बहादूर थापा निधन :

 • नेपाळच्या सूर्य बहादूर थापा यांचे अल्पशः आजाराने निधन झाले.
 • ते 87 वर्षांचे होते.
 • तब्बल पाचवेळा ते नेपाळच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते.
 • 1963 ते 2004 या दरम्यान पाचवेळा पंतप्रधान झाले.
 • थापा हे नेपाळमध्ये पंचायत राज व्यवस्था सुरू झाल्यानंतरचे पहिले पंतप्रधान होत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या गोपनीय फाइल्स होणार सार्वजनिक :

 • नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत सरकारदप्तरी असलेल्या “गोपनीय” फाइल्स सार्वजनिक करण्याबाबत येणार आहेत.
 • केंद्राने मंत्रिमंडळ सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे.
 • या समितीची पहिली बैठक आज होणार आहे.
 • “अधिकृत गुप्तता कायद्याची” छाननी करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

नजम सेठी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अंतरिम अध्यक्ष :

 • पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष नजम सेठी हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अंतरिम अध्यक्ष बनण्याची शक्यता आहे.
 • बांगलादेशचे मुस्तफा कमाल यांनी या महिन्याच्या सुरवातीला अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.
 • सेठी हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. कमाल यांच्या कार्यकालानंतर सेठी हे जुलैपासून एक वर्षासाठी अध्यक्ष होणार होते.

मंगळावर पाण्याची शक्यता :

 • “नासा”च्या क्‍युरिऑसिटी या मंगळ मोहिमेवर असलेल्या यानाला पाणी शोषून घेतलेली माती आढळल्याने मंगळावरील पाण्याची शक्‍यता अधिक बळावल्याची असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
 • मंगळावर सापडलेल्या मातीमध्ये कॅल्शिअम परक्‍लोराईड सापडले असून मात्र त्या मातीमध्ये पाण्याला बर्फ करण्याची क्षमता नसल्याचे आढळले आहे.
 • तसेच मातीत सापडलेल्या द्रव पदार्थात मोठ्या प्रमाणात मीठ आढळून आले तसेच मातीमध्ये कॅल्शिअम परक्‍लोराईड नावाच्या पदार्थाचा शोध लागला आहे.
 • योग्य वेळी ही माती वातावरणातील पाणी शोषून घेते, अशी परिस्थिती रात्री आणि हिवाळ्यामध्ये सूर्योदयानंतर आढळून येते.

भारताला कॅनडा यावर्षीपासूनच पाच वर्षे देणार युरेनियम :

 • भारताला कॅनडा यावर्षीपासूनच पाच वर्षे युरेनियम देणार आहे.
 • दरम्यान, कौशल्य विकास क्षेत्रात दोन्हीही देशांनी 13 करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
 • कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी बुधवारी मोदी यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर करारावर स्वाक्षरी झाली.
 • तीन हजार मेट्रीक टन युरेनियमसाठी 254 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे तसेच सध्या रशिया आणि कझागस्तानकडून भारताला युरेनिमयमचा पुरवठा होत आहे.
 • युरेनियमचा हा पुरवठा आंतरराष्ट्रीय अणुउर्जा संस्थेने ठरवून दिलेल्या सुरक्षा माणकांप्रमाणे केला जाईल.
 • या करारानुसार कॅनडाची कंपनी कॅमिको कॉर्प भारतातील अणुभट्ट्यांना इंधनाचा पुरवठा करील.

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी :

 • पाकिस्तानने बुधवारी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे.
 • त्याच्या मदतीने अण्वस्त्रे व पारंपरिक अस्त्रे ही 1300 कि.मी. पर्यंत वाहून नेली जाऊ शकतात.
 • त्यामुळे अनेक भारतीय शहरे आता पाकिस्तानी क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आली आहेत.
 • 9 मार्चला पाकिस्तानने शाहीन 3 या आंतरखंडीय तसेच अण्वस्त्रे व साधारण अस्त्रे वाहून नेणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती.
 • त्याचा पल्ला 2750 किलोमीटर आहे.

दिनविशेष :

 • 16 एप्रिलरेल्वे दिन
 • 1853 – भारताची पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे या लोहमार्गावर सुरू.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.