Current Affairs of 16 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2016)

भाजपा युवा मोर्चा अध्यक्षपदी पूनम महाजन :

 • भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि मुंबईतील खासदार पूनम महाजन यांची भाजपाच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडे युवा मोर्चाचे अध्यक्षपद होते. मात्र, आता त्यांच्या जागी पूनम यांची निवड करण्यात आली आहे.
 • भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी 15 डिसेंबर रोजी भाजपाच्या विविध संघटनांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब केले. यामध्ये विनोद सोनकर यांची भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या अध्यक्षपदी, तर रामविचार नेतम यांची अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी दारा सिंह चौहान यांची नियुक्ती करण्यात आली.
 • तसेच, भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पुनम महाजन आणि खासदार वीरेंद्र सिंह मस्त यांची भाजपाच्या किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नॅशनल जिओग्राफीक स्पर्धेत भारतीयांना प्रथम क्रमांक :

 • नॅशनल जिओग्राफीकतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या ‘नेचर फोटोग्राफर ऑफ द इअर’ या छायाचित्रांच्या स्पर्धेत दोघा भारतीयांनी स्थान मिळविले आहे.
 • ‘ऍनिमल पोट्रेट’ प्रकारात महाराष्ट्राच्या वरुण अदित्यच्या छायाचित्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • तसेच ‘लॅंडस्केप’ प्रकारात प्रसेनजीत यादवच्या छायाचित्राला पारितोषिक मिळाले आहे.
 • ‘ड्रॅगिंग यू डीप इनटू द वूड्स’ असे नाव देताना वरुणने एका 20 सेंटिमीटर लांबीच्या हिरव्या सापाचे अप्रतिम छायाचित्र काढले आहे. याच छायाचित्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

नवीन नोटांचे डिझाईन भारतातच तयार होणार :

 • भारतात प्रथमच नवीन नोटांचे डिझाईन करण्यात आले आहे.
 • पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई वाढवण्यात आली असून, लवकरच सुट्ट्या पैशांची समस्या सुटेल, असे आर्थिक कामकाज सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.
 • शक्तिकांत दास यांनी सांगितले, की 30 डिसेंबरपर्यंत 50 टक्के चलन बाजारात उपलब्ध असेल. नोटा छपाईचा वेगही वाढवण्यात आला असून, 2 ते 3 आठवड्यात परिस्थिती सामान्य होईल.
 • नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारच्या कडक बंदोबस्तामुळे बेकायदेशीररित्या जमवण्यात आलेल्या नवीन नोटांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 • काळा पैसाधारकांच्या विरोधात अर्थ मंत्रालयाने कडक भूमिका घेतली आहे.
 • करचुकवेगिरी आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गांवर मद्यविक्रीस सक्तबंदी :

 • 1 एप्रिलपासून राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 15 डिसेंबर रोजी दिले.
 • महामार्गांवर मद्यविक्रीची दुकाने 1 एप्रिलपासून दिसावयास नकोत असे बजावताना न्यायालयाने महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांच्या परवान्यांचे यानंतर नूतनीकरण केले जाणार नाही, असेही स्पष्ट केले.
 • ‘अराईव्ह सेफ’ या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले.
 • सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी एस ठाकूर, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश एल एन राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला.
 • महामार्गांवर सहज मिळणारे मद्य हेच मद्यप्राशन करुन गाडी चालविण्यामागील मुख्य कारण असल्याची भूमिका या संस्थेकडून घेण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.

अवकाशातील सर्वात गोलाकार तारा केप्लर :

 • अवकाशातील सर्वात वाटोळा म्हणजे गोलाकार पदार्थ शोधून काढण्यात यश आले असून, तो पृथ्वीपासून पाच हजार प्रकाशवर्षे दूर असलेला एक तारा आहे, असा दावा खगोलवैज्ञानिकांनी केला.
 • मॅक्स प्लांक सौर संशोधन विभागातील लॉरेंट गिझॉन यांच्यासह जर्मनीच्या गॉटिंगेन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केप्लर 11145213 हा तारा शोधून काढला असून तो खूपच वाटोळा असल्याचे म्हटले आहे.
 • वाटोळेपण अ‍ॅस्टरोसिस्मॉलॉजी म्हणजे ताऱ्यांच्या स्पंदनशास्त्राच्या मदतीने अचूक मापण्यात आले. त्याचे विषुववृत्त व ध्रुवीय त्रिज्या यात 3 किलोमीटरचा फरक आहे. त्याची एकूण त्रिज्या 1.5 दशलक्ष किलोमीटर असून त्या तुलनेत हा फरक फार कमी आहे, त्यामुळे खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून तो तारा खूपच वाटोळा म्हणजे गोलाकार आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.