Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 15 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2016)

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2016)

स्मृती मानधनाची आयसीसी संघात निवड :

 • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या 2016 वर्षाच्या आपल्या महिला संघामध्ये भारताची शानदार फलंदाज स्मृती मानधनाची निवड झाली आहे.
 • 13 डिसेंबर रोजी आयसीसीने आपल्या महिला संघाची घोषणा केली. गेल्या 12 महिन्यांमध्ये चमकदार खेळ केलेल्या खेळाडूंची या संघात निवड करण्यात आली आहे.
 • वेस्ट इंडीजची शानदार खेळाडू स्टेफनी टेलरकडे या संघाची धुरा सोपविण्यात आली आहे.
 • 14 सप्टेंबर 2015 ते 20 सप्टेंबर 2016 दरम्यान केलेली कामगिरी लक्षात घेऊन या संघासाठी खेळाडूंची निवड केली आहे.
 • विशेष म्हणजे, या कालावधीदरम्यान महिला विश्वचषक टी-20 आणि आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धाही पार पाडली.

पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी :

 • भारताची ऑलिम्पिक रौप्य पदकविजेती स्टार शटलर पी.व्ही. सिंधू हिने दुबई वर्ल्ड सुपर सिरीज फायनल स्पर्धेत दिमाखदार विजयी सलामी देताना जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव केला. 
 • तसेच त्यावेळी, चीनच्या सुन यू हिने पहिल्याच दिवशी खळबळजनक विजय मिळविताना ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनला सलग दोन गेममध्ये पराभूत केले.
 • जागतिक क्रमवारीतील अव्वल आठ खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेची बाद फेरी गाठण्यासाठी सिंधूचा समावेश खडतर अशा ‘ब’ गटात आहे.
 • सिंधूने अकाने हिला 12-21, 21-8, 21-15 असे नमवून दिमाखात विजयी सलामी दिली.

ए.आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत :

 • बॉलीवूडमधील आघाडीचा संगीतकार ए.आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आहे.
 • पेले:द बर्थ ऑफ अ लिजंड मध्ये दिलेल्या संगीतासाठी रहमान यांना ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
 • तसेच याआधी 2009 साली स्लमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रहमान यांनी जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार पटकावला.
 • आता यंदाच्या 89 अॅकॅडमी पुरस्कारांच्या ओरिजनल स्कोअर गटात रहमान यांना नामांकन देण्यात आले आहे.  
 • पेले: द बर्थ ऑफ अ लिजंड या चित्रपटाबरोबरच रहमान यांच्या जिंगा या गीतालाही ऑस्करच्या शर्यतीत नामांकन मिळाले आहे.
 • आता ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम यादी 24 जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

रेक्‍स टिलेर्सन अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री :

 • अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्‍झॉन मोबिल या प्रभावी बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेक्‍स डब्ल्यू टिलेर्सन यांच्याकडे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदाची धुरा सोपविण्यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली आहे.
 • टिलेर्सन हेच अमेरिकेचे नवे परराष्ट्र मंत्री असतील, अशा आशयाचे संकेत ट्रम्प यांनी याआधी दिले होते.
 • अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रीपदासाठी टिलेर्न यांच्यासह ज्येष्ठ रिपब्लिकन नेते मिट रॉमनी, ट्रम्प यांचे निष्ठावंत सहकारी रुडॉल्फ डब्ल्यू जियुलिआनी यांच्यासह अन्य काही प्रभावी नेत्यांची नावेदेखील चर्चेत होती.
 • रशियाशी गेली दोन दशके व्यावसायिक संबंध असलेल्या टिलेर्सन यांना रशियाकडून 2013 मध्ये ‘ऑर्डर ऑफ फ्रेंडशिप’ पुरस्काराने गौरविण्यातही आले होते.
 • टिलेर्सन (वय 64वर्ष) यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवेदनशील चर्चांचा मोठा अनुभव आहे.

नरेंद्र मोदी फोर्ब्सच्या टॉप टेन शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत :

 • फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या जगातील शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दहाजणांमध्ये स्थान पटकावले आहे.
 • फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा पहिला क्रमांक पटकावला असून अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 • जगातील सर्वात शक्तिशाली अशा 74 लोकांच्या यादीत नरेंद्र मोदी यांनी नववे स्थान पटकावले आहे.
 • 130 कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात नरेंद्र मोदी प्रचंड लोकप्रिय असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World