Current Affairs of 16 April 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (16 एप्रिल 2016)
भारत अन्य देशांना ‘व्याघ्रसाह्य’ करणार :
- जगातील सर्वाधिक व्याघ्रसंपत्ती असणारा देश म्हणून मिरविणाऱ्या भारताने आता वाघ नामशेष होत आलेल्या वा ते बिलकूल नसलेल्या कंबोडियादी देशांनाही वाघ पुरविण्याची सहर्ष तयारी दाखविली आहे.
- केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तिसऱ्या आशिया व्याघ्र मंत्री परिषदेच्या समारोप कार्यक्रमात तशा शक्यतेचा उच्चार केला.
- परदेशात धाडल्यावर मातृभूमीपासून दुरावलेल्या या वाघांना क्वचित प्रसंगी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ अशी भावना व्याकूळ करू नये या दृष्टीनेही मदतीची तयारी भारताने दाखविली आहे.
- चीन व रशियासह तेरा देशांच्या वन तसेच कृषिमंत्र्यांच्या या परिषदेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारताने या व्याघ्र परिषदेत व्याघ्रसंपत्ती अन्य जणांना देण्याची तयारी दाखवून, नवा पायंडा पाडल्याची प्रतिक्रिया उपस्थित प्रतिनिधींमध्ये व्यक्त झाली.
- जगाच्या एकूण क्षेत्रफळापैकी केवळ अडीच टक्के भूभाग व एकुणांतील 17 टक्के लोकसंख्या असलेल्या भारतात जगातील सर्वाधिक म्हणजे जवळपास अडीच हजार पट्टेदार वाघ आहेत.
- केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांत वाघांचे जतन, संवर्धन व त्यांच्या शिकाऱ्यांबाबत ‘झीरो टॉलरन्स’ची कठोर भूमिका घेतल्याचे जावडेकर यांनी अधोरेखित केले.
Must Read (नक्की वाचा):
जगातील श्रीमंत देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर :
- जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांच्या यादीत भारताला तिसरा क्रमांक मिळाला असून चीनला प्रथम तर अमेरिकेला दुसरे स्थान मिळाले आहे.
- राष्ट्रीय देशांतर्गत उत्पनाच्या (जीडीपी) आधारे जगातील श्रीमंत देशांचा क्रम ठरविण्यात आला आहे.
- जगातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या या यादीत मागील आर्थिक वर्षातील जीडीपीनुसार चीन (20.85 लाख कोटी डॉलर), अमेरिका (18.56 लाख कोटी डॉलर) तर त्यानंतर भारताचा (8.64 लाख कोटी डॉलर) क्रमांक आहे.
- फोर्ब्स मासिकाच्या एका अहवालानुसार, भारतात मागील पंधरा वर्षांच्या कालावधीत लक्षाधीशांच्या संख्येत 400 टक्क्यांची वाढ झाली आहे.
- तसेच देशातील एकूण संपत्तीमध्ये 211 टक्क्यांची वाढ झाली आहे.
चेन्नईमध्ये उभारला रजनीकांतचा पुतळा :
- चित्रपटांतून आपल्या अफलातून भूमिकांमुळे रसिकांमध्ये लोकप्रिय असलेला सुपरस्टार रजनीकांतचा 600 किलोग्रॅम चॉकलेटचा पुतळा तयार करण्यात आला आहे.
- रजनीकांतला नुकतेच पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- तसेच या पार्श्वभूमीवर चाहत्यांनी एकत्र एकत्र येत चेन्नईमध्ये हा पुतळा तयार केला आहे, झुका नावाच्या कॉफी शॉपमध्ये हा पुतळा तयार करण्यात आला आहे.
- या पुतळ्यामध्ये दाखविण्यात आलेला रजनीकांतचा पेहराव काबली या त्याच्या आगामी चित्रपटातील व्यक्तिरेखेचा आहे.
शस्त्रक्रियेमध्ये जे.जे. रुग्णालय जगात सर्वोत्तम :
- अत्यंत गुंतागुंतीचा असलेला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजारावर जे.जे. रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाने वेगळ्या पद्धतीने केलेल्या ‘एन्डोस्कोपीक शस्त्रक्रियेच्या तंत्रा’ला जगातील सर्वोत्कृष्ट शस्त्रक्रियेचा सन्मान मिळाला आहे.
- ‘सोसायटी ऑफ अमेरिकन गॅस्ट्रोइंटेस्टायनल अॅण्ड एंडोस्कोपीक सर्जन्स’च्या (सेजस) एन्डोस्कोपिक सर्जनच्या परिषदेत सादर केलेल्या या शस्त्रक्रियेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आणि दोन हजार डॉलरचे पारितोषिक जाहीर झाले आहे.
- तसेच गेल्या वर्षी मार्च महिन्यात बिहारच्या भागलपूर येथील बंबमकुमार मंडल या 27 वर्षीय तरुणाला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- त्यावेळी या तरुणाला काँजिनायटल डायफ्रॅग्मॅटिक हार्निया आजार झाल्याचे निदान करण्यात आले आणि त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
- ‘जेजे’त झालेली ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया जगातील दुसरी शस्त्रक्रिया ठरली आहे.
अझलान शाह हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत दाखल :
- न्यूझीलंडकडून पराभूत होताच समीकरण बिघडल्यानंतर भारतीय संघाने 25व्या अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेत मलेशियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
- पाच वेळेचा चॅम्पियन भारत संघाला स्पर्धेत अद्याप सातत्यपूर्ण कामगिरी करू शकला नव्हता पण मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत मलेशियाचा 6-1 अशा फरकाने पराभव करून विजय मिळवला.
- अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे.
- ऑस्ट्रेलिया संघ सलग पाच विजयांसह 15 गुण घेऊन अंतिम फेरीत दाखल झालेला आहे.
- राऊंड रॉबिन सामन्यात मलेशियाचा पराभव केल्यामुळे गुणतालिकेत भारताने माजी विजेता न्युझीलंडला मागे टाकत गुणतालिकेत आपले स्थान मजबुत केले.
100 मेगावॅटच्या सौर ऊर्जाप्रकल्पाचा करार :
- ऑरेंज रिन्युएबल या सिंगापूरस्थित कंपनीने सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत 100 मेगावॅटचा वीज खरेदी करार केला आहे.
- तसेच हा प्रकल्प जवाहरलाल नेहरू नॅशनल सोलर मिशन अंतर्गत महाराष्ट्रात उभारण्यात येणार आहे.
- एसईसीआयने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे आवाहन करत ऑनलाइन लिलाव केला होता, ज्यामध्ये ऑरेंज रिन्युएबल पात्र ठरली आहे.
- तसेच या करारानुसार ऑरेंज रिन्युएबलकडून 25 वर्षे 4.43 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी करण्यात येईल.
- नॅशनल सोलर मिशन अंतर्गतची उद्दिष्ट्ये वाढवण्यात आली असून 2021- 22 पर्यंत सौरऊर्जेच्या माध्यमातून 20 गिगावॅट निर्मितीचे लक्ष्य होते, जे वाढवून 100 गिगावॅट करण्यात आले आहे.
- भारत सौरऊर्जेला प्रचंड महत्त्व देत असून त्यामुळे या क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांसाठी भारत एक आकर्षण ठरत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
दिनविशेष :
- 1848 : कंडुकुरी वीरेसलिंगम, आंध्र प्रदेशमधील समाजसुधारक यांचा जन्म.
- 1853 : भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावण्यास सुरुवात झाली.
- 1867 : विल्बर राईट, अमेरिकन विमानसंशोधक यांचा जन्म.
- 1889 : चार्ली चॅप्लिन, अभिनेता, दिग्दर्शक आणि संगीतकार यांचा जन्म.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा