Current Affairs of 15 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 एप्रिल 2016)

चालू घडामोडी (15 एप्रिल 2016)

आता बँकिंग क्षेत्रात नवी क्रांती होणार :

 • भारतात राजीव गांधींच्या कारकीर्दीत गावोगावी एसटीडी, पीसीओ सुरू झाले तेव्हा सर्वांना अप्रूप वाटले, कारण याद्वारे साऱ्या जगाशी प्रथमच सारा भारत जोडला गेला होता.
 • आता देशाच्या बँकिंग क्षेत्रातही क्रांती होऊ घातली आहे, कारण देशातल्या अडीच लाख ग्रामपंचायतीत कॉमन सर्व्हिस सेंटर्स (सीएससी) द्वारा बँकिंग सुविधा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
 • देशात सध्या 1 लाख 60 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत.
 • तसेच तिथे पासपोर्टचे फॉर्म, फी, विम्याचे हप्ते, विविध प्रकारची बिले भरण्याबरोबरच रोजगारासाठी अर्ज करणे, आधार कार्ड तयार करणे इत्यादी कामे सध्या चालतात.
 • ग्रामीण भागात अवघे 7 हजार कॉमन सर्व्हिस सेंटर्स असे आहेत की, जे बँकिंग सुविधाही पुरवतात.
 • येत्या 3 महिन्यांत या कॉमन सर्व्हिस सेंटर्सद्वारा देशातल्या किमान 60 हजार ग्रामपंचायतींत बँकिंग सुविधा सुरू होणार आहे.
 • देशात 6 लाखांहून अधिक खेडी व अडीच लाख ग्रामपंचायती आहेत.
 • सध्या केवळ 35 हजार खेडी बँकिंग सेवांशी थेट जोडली गेली आहेत, यासाठीच केंद्राने सीएससीच्या कामकाज विस्ताराची योजना व्यापक प्रमाणात अमलात आणण्याचे ठरवले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 एप्रिल 2016)

विदेशी मनिऑर्डरच्या बाबतीत भारत प्रथम स्थानी :

 • 2015 मध्ये विदेशातून मनिऑर्डरद्वारे पैसे प्राप्त करण्याच्या बाबतीत भारत जगात पहिल्या स्थानी राहिला.
 • जागतिक बँकेने ‘मायग्रेशन अँड डेव्हलपमेंट ब्रीफ’ नावाने अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • तसेच त्यात म्हटले आहे की, 2009 नंतर विदेशातून भारतात येणाऱ्या पैशांत प्रथमच घट झाली आहे.
 • 2015 मध्ये भारताला विदेशातून 69 अब्ज डॉलरच्या मनिऑर्डर मिळाल्या.
 • 2014 मध्ये हा आकडा 70 अब्ज डॉलर होता. याचाच अर्थ मनिऑर्डरमध्ये 2.1 टक्क्यांची घट झाली आहे.
 • विकसनशील देशांना मिळणाऱ्या मनिऑर्डरमध्ये 0.4 टक्के वाढ झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजला डॉ. आंबेडकरांचे नाव :

 • ‘गोंदिया जिल्हावासीयांना दिलेला शब्द पाळत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले.’
 • एवढेच नाही, तर 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे कॉलेजला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचेही वचन सर्वांसमक्ष पूर्ण केले.
 • तसेच हे नाव बदलण्याची हिंमत कोणी करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिला.

चित्रपट महोत्सवासाठी नामांकने जाहीर :

 • राज्य सरकारच्या वतीने उत्कृष्ट मराठी चित्रपटांना दरवर्षी दादासाहेब फाळके जयंतीनिमित्त 30 एप्रिलला देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठीची नामांकने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी (दि.14) घोषित केली.
 • उत्कृष्ट चित्रपटांसाठी 10, वैयक्तिक पुरस्कारांसाठी 3 नामांकने आणि तांत्रिक पुरस्कार घोषित करण्यात येतात.
 • 30 एप्रिलला होणाऱ्या सोहळ्यात नामांकनांमधून अंतिम विजेत्यांना पुरस्कार दिले जातील.
 • तसेच हा सोहळा बोरिवली येथे जनरल अरुण कुमार वैद्य मैदानावर होणार आहे, मुंबई उपनगरांत प्रथमच हा सोहळा होत आहे.
 • 53 व्या मराठी चित्रपट महोत्सवासाठी यंदा 73 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
 • तसेच त्यातून उत्कृष्ट चित्रपटासाठी अंतिम फेरीकरता कट्यार काळजात घुसली, दि सायलेन्स, दगडी चाळ, बायोस्कोप, डबलसीट, नटसम्राट, हलाल, रिंगण, रंगा पतंगा आणि हायवे या 10 चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत.
 • अंतिम फेरीनंतर या चित्रपटांतून प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कारासाठी, तसेच सामाजिक प्रश्‍न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट व ग्रामीण प्रश्‍न हाताळणारा उत्कृष्ट चित्रपट निवडण्यात येईल.

मुंबईत पुन्हा लागू होणार ‘क्लीन अप मार्शल्स’ योजना :

 • मुंबईकरांना शिस्त लावण्यासाठी क्लीन अप मार्शल योजना पुनरुज्जीवित करण्यात येणार आहे़ चार वर्षांनंतर ही मोहीम पुन्हा एकदा मुंबईत राबविण्यात येत आहे़.
 • सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या, लघुशंका करणाऱ्या, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 2007 मध्ये क्लीन अप मार्शल्सची नियुक्ती करण्यात आली होती.
 • खासगी सुरक्षा कंपनीला दंड करण्याचे अधिकार या मार्शल्सला देण्यात आल्याने त्यांची मुजोरी वाढली़ अनेक ठिकाणी मार्शल्सनी दमदाटीने वसुली सुरू केल्याच्या तक्रारी येऊ लागल्या़ तीन वेळा गुंडाळलेली ही योजना 2012 मध्ये कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ होता.  
 • परंतु मार्शल्सशिवाय मुंबईचे परिसर स्वच्छ ठेवणे शक्य नाही, असा साक्षात्कार पालिकेला झाला आहे़ त्यामुळे नव्याने मार्शल्सची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत (दि.14) मंजूर करण्यात आला़.

युनोतही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी :

 • संयुक्त राष्ट्रसंघाने (युनो) प्रथमच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
 • आंबेडकर हे वंचितांसाठीचे ‘वैश्विक प्रतीक’ असून त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी युनो भारतासोबत काम करण्यास बांधील आहे.
 • आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त युनोतील भारतीय मंडळाने (मिशन) प्रथमच येथे विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते.
 • कल्पना सरोज फाऊंडेशन आणि फाऊंडेशन ऑफ ह्यूमन होरिझोन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 • आंबेडकरांचे विचार 60 वर्षांपूर्वी जेवढे समकालीन होते तेवढेच ते आजही आहेत यावर जोर देताना न्यूझीलंडच्या माजी पंतप्रधान क्लार्क म्हणाल्या की, वंचितांचे सबलीकरण, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, तसेच कामगार कायद्यात सुधारणा आणि सर्वांसाठी शिक्षणाला चालना देण्यासाठी आंबेडकरांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे ते भारत आणि इतर देशातील वंचितांसाठी आदर्श प्रतीक ठरले आहेत.

दिनविशेष :

 • 1469 : गुरू नानक, शीख धर्माचे संस्थापक यांचा जन्म.
 • 1932 : सुरेश भट, कवी व मराठी गझलकार यांचा जन्म.
 • 1994 : भारताने गॅट करारास मान्यता दिली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 एप्रिल 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.