Current Affairs of 15 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 मार्च 2018)
तत्काळ पासपोर्टसाठी आधार कार्ड सक्ती :
- बँक खाते सुरु करताना तसेच तत्काळ पासपोर्टसाठी आधार बंधनकारक असेल, असे स्पष्टीकरण युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) दिले आहे. आधार नसलेल्यांना ‘आधार‘साठी केलेल्या अर्जाचा क्रमांकही देता येणार आहे.
- आधार सक्तीच्या घटनात्मक वैधतेविरोधात दाखल झालेल्या विविध याचिकांचा निकाल लागेपर्यंत आधार जोडणीची सक्ती करता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने 13 मार्च रोजी दिला होता. यामुळे आधार जोडणीसाठी 31 मार्चपर्यंत देण्यात आलेली मुदत आपोआप बारगळली आहे. बँक खाते, मोबाइल क्रमांक आदी आधारशी संलग्न करण्याची मुदतच अनिश्चित काळासाठी वाढल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता.
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) स्पष्टीकरण दिले आहे. नवीन बँक खाते व तत्काळ पासपोर्टसाठी आधार बंधनकारक असेल.
Must Read (नक्की वाचा):
जर्मनीच्या चॅन्सेलरपदी मर्केल यांची निवड :
- जर्मनीच्या चॅन्सेलरपदी संसदेने 14 मार्च रोजी अँजेला मर्केल यांची चौथ्यांदा निवड केली. संसदेत खासदारांनी 364 विरुद्ध 315 मतांनी मर्केल यांची निवड केली.
- सन 2005 पासून त्या जर्मनीच्या चॅन्सेलर आहेत. 709 सदस्यांच्या संसदेत मर्केल यांच्या ख्रिस्तीयन डेमोक्रॅटिक युनियन, ख्रिस्तीयन सोशल युनियन आणि सोशल डेमोक्रॅटिक या पक्षांच्या आघाडीकडे 399 सदस्यांचे संख्याबळ आहे.
- मर्केल यांच्या मंत्रिमंडळात अर्थ, परराष्ट्र व अंतर्गत मंत्रालयासाठी नवे चेहरे देण्यात आले आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या संसदेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाल्याने नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे.
- सध्याची सत्तारूढ आघाडी 2021 पर्यंत कायम राहणार आहे. तोपर्यंत या पक्षांनी एकत्र काम करण्याचे ठरविले असल्याने राजकीय पेच निर्माण होणार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
लांब पल्ल्यांच्या रेल्वेत महिलांसाठी राखीव जागा :
- महिलांना विविध क्षेत्रात आरक्षण असताना आता रेल्वेमध्येही महिलांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. महिलांसाठी रेल्वेमध्ये ठराविक जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे नुकतेच रेल्वे मंत्रालयाने जाहीर केले आहे.
- वातानुकुलित डब्यात आणि स्लिपर कोचमध्ये महिलांसाठी काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. महिलांची सुरक्षितता आणि स्वातंत्र्य यासाठी हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामध्ये 6 जागा राखीव असतील असे रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. केवळ महिला एकत्रितपणे प्रवास करत असतील आणि त्यांनी एकावेळी तिकीट काढली असतील तर त्या महिला या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
- तसेच ही सुविधा मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी महिलांना वापरता येणार आहे. यामध्ये प्रत्येक स्लिपर कार कोचमध्ये 6 जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्यात. वातानुकुलित कोचमधील 3 जागा या वृद्ध महिला, गर्भवती महिला यांच्यासाठी राखीव ठेवाव्यात असे सांगण्यात आले आहे.
महान भौतिकशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग कालवश :
- महान शास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या 76 व्या वर्षी 14 मार्च रोजी केंब्रिजमधील राहत्या घरी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले.
- 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांची आई आणि वडील दोघेही उच्च शिक्षित होते. त्यांचे वडील डॉ. फ्रँक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक तर त्यांची आई वैद्यकीय संशोधन सचिव होती.
- आई-वडील दोघेही शिक्षित असल्याने घरातच त्यांना संशोधनाचे धडे मिळाले. त्यामुळे त्यांनी विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात उत्तम यश संपादन करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात पीएचडीचे शिक्षण घेतले.
- तसेच त्यांनी आत्तापर्यंत विविध विषयात यश संपादन केले. त्यांचे विचार आजही सर्वांच्या मनात असून, सर्वांना प्रेरणा देत आहेत.
भारतीय वायुदलाला लाभणार लढाऊ विमानांचे बळ :
- भारतीय वायुदलाच्या ताफ्यात 324 तेजस लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. वायुदलाच्या ताफ्यात आत्तापर्यंत 123 तेजस लढाऊ विमाने दाखल झाली आहेत. या लढाऊ विमानांची किंमत 75 हजार कोटी रुपये आहे अशी माहितीही समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायू दलाने 201 तेजस-मार्क टू विमानांचा ताफ्यात समावेश करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.
- नव्याने सहभागी होणाऱ्या तेजस विमानांची रडार क्षमता, इंजिन क्षमता आणि शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता मागील विमानांपेक्षा जास्त चांगल्या दर्जाची आहे. सध्याच्या घडीला तेजस विमान 350 ते 400 किलोमीटरच्या परिसरात एक तासापर्यंत सक्रिय राहू शकते आणि 3 टन हत्यारे वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे.
- तसेच या विमानाच्या तुलनेत इतर सिंगल इंजिन विमानांचा विचार केला तर स्वीडनचे ग्रिपन-ई आणि अमेरिकेचे एफ-16 हे जास्त क्षमतेने काम करत आहेत.
- सध्याच्या तेजस विमानाच्या दुप्पट परिसरात ही लढाऊ विमाने जाऊ शकतात. तसेच या विमानांची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता तेजस विमानापेक्षा जास्त आहे.
क्षयमुक्त भारत, हे यंदाच्या वर्षीचे घोषवाक्य :
- डॉट्स उपचारपद्धतीचा वापर करून गेल्या 17 वर्षांत 14 हजार 209 रुग्ण क्षयमुक्त झाले आहेत. क्षयमुक्त भारत, हे यंदाच्या वर्षीचे घोषवाक्य आहे. 2025 पर्यंत संपूर्ण भारत क्षयमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
- क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने विविध उपक्रम सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत 7 जानेवारी 2002 पासून डॉट्स उपचारपद्धती अमलात आणली. या उपचारपद्धतीचा फायदा चांगला झाला. कर्मचाऱ्याच्या समोर रुग्णाला औषधोपचार घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते, असे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले.
- क्षयरोगाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार महिन्यातून केवळ चार वेळा गोळ्या देत होते. त्या गोळ्या रुग्णाच्या हातात देऊन, प्रत्यक्ष रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर खाण्याची सक्ती केली जात असे. या पद्धतीमुळे क्षयरोग नियंत्रणात राहण्याऐवजी वाढण्याचा धोका बळावला. हे पाहता, केंद्राने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत क्षयरोगावरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या डॉट्स गोळ्या आता दररोज देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या क्षयरोग विभागातून दररोज डॉट्सच्या गोळ्या देण्यात येत आहेत.
- क्षयरोगाचे अचूक निदान अर्ध्या तासात होऊ शकते, अशी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे क्षयरोगावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो. क्षयमुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
दिनविशेष :
- सन 1564 मध्ये मुघल सम्राट अकबर याने हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला.
- जगप्रसिद्ध टोरांटो विद्यापीठाची स्थापना 15 मार्च 1827 मध्ये झाली.
- मुंबई येथे गणपत कृष्णाजी यांनी मराठीतील पहिले छापील पंचांग 15 मार्च 1831 रोजी विक्रीला सुरु झाले.
- ‘पेपर क्लिप’चे शोधक जॉन वालेर यांचा जन्म सन 1866 मध्ये 15 मार्च रोजी झाला.
- 15 मार्च 1919 रोजी हैद्राबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा