Current Affairs of 15 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 मार्च 2017)

चालू घडामोडी (15 मार्च 2017)

राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी संजय बर्वे :

 • गृह विभागाने राज्य गुप्त वार्ता विभागाचे आयुक्त संजय बर्वे यांना महासंचालकपदी बढती दिली आहे.
 • गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक पद तसेच ठेवत राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी बर्वे यांची बदली केली आहे.
 • होमगार्डचे उपमहासमादेशक संजय पांडे यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशामुळे एसीबीची पोस्ट रिक्त ठेवून ‘सिक्युरिटी कार्पोरेशन’चे पद तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत करण्यात आले आहे.
 • गुप्त वार्ता विभागाचा अतिरिक्त पदभारही बर्वे यांच्याकडेच राहणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया हे सेवाज्येष्ठ असूनही तब्बल सव्वा वर्षे ‘होमगार्ड’मध्ये राहून निवृत्त व्हावे लागले.
 • तसेच ‘एसीबी’च्या प्रमुखपदी अन्य दुसऱ्या अधिकाऱ्यांची वर्णी लावता येणे शक्य नसल्यामुळे हे पद रिक्त ठेवून अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मार्च 2017)

जगप्रसिद्ध वेरूळ लेणीतील किरणोत्सवास प्रारंभ :

 • स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या असून यामध्ये बारा बौद्ध लेण्या आहेत. यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेण्या ह्या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीमधील मूर्तिवर सूर्य उत्तरायानला जात असताना सूर्यकिरणे येत असतात.
 • तसेच ही सूर्यकिरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर येण्यास सुरुवात झाली असून येत्या आठ दिवस हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना अनुभवता येईल अशाच प्रकारची सूर्यकिरणे हे मागच्या वर्षी 10 मार्च रोजी आली होती.
 • तर महाराष्ट्रातील बौद्ध लेण्यामधील हा शेवटचा चैत्य असून महायानास समर्पित आहे. यामध्ये वज्रयाणाची काही शिल्पे बघायला मिळतात यालाच सुतार की झोपडी किंवा विश्वकर्मा मंदिर म्हणतात तर गुजरात मधील विश्वकर्मा लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून नमन करतात याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात आहे.
 • गुहेत प्रवेश केल्याबरोबर समोरच भगवान बुद्ध बौधी (पिंपळाचे) वृक्षाखाली बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपानी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपानी पहावयास मिळतात.

ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्‍झिट’ विधेयक मंजूर :

 • ब्रिटनच्या संसदेत ‘ब्रेक्‍झिट विधेयक’ मंजूर झाले असून, यामुळे पंतप्रधान थेरेसा मे यांची युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठीची अधिकृत चर्चा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • बदलाची कोणतीही शिफारस मान्य न करता हे विधेयक 274 विरुद्ध 118 मतांनी मंजूर करण्यात आले. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे.
 • युरोपीय महासंघाच्या लिस्बन करारातील 50 व्या कलमानुसार, थेरेसा मे या आता कोणत्याही क्षणी महासंघातून बाहेर पडण्याबाबत चर्चा करून प्रक्रिया सुरू करू शकतात. मात्र, सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या महिनाअखेरीपर्यंत त्या चर्चा सुरू करणार नाहीत.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील 800वा कसोटी सामना :

 • 15 मार्च पासून 140 वर्षांपूर्वी 15 मार्च 1877 रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा ऑस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे.
 • भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील 800वा कसोटी सामना ठरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ ही लढत संस्मरणीय ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
 • ऑस्ट्रेलिया 800 कसोटी सामने खेळणारा जगातील दुसरा देश ठरणार आहे. इंग्लंडने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या नावावर 983 कसोटी सामन्यांची नोंद आहे.
 • रांचीमध्ये प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत असून, हा एक ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण आगामी एक दशकापेक्षा अधिक कालावधीत कुठला अन्य देश 800 कसोटी सामने खेळण्याची शक्यता नाही.
 • इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडीज (520) संघाचा क्रमांक आहे. 800च्या आकड्यापासून हा संघ बराच दूर आहे.
 • भारतीय संघाचा विचार करता 510 कसोटी सामने खेळणारा भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड (420), दक्षिण आफ्रिका (409), पाकिस्तान (407), श्रीलंका (257), झिम्बाब्वे (101), बांगलादेश (99) आणि आयसीसी विश्व इलेव्हन (1) यांचा क्रमांक लागतो.

दिनविशेष :

 • 15 मार्च हा आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन आहे. तसेच हा दिवस जागतिक अपंगत्व दिन म्हणून पाळला जातो.
 • मराठीतील पहिले पंचांग 15 मार्च 1831 मध्ये छापले गेले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.