Current Affairs of 14 March 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 मार्च 2017)

चालू घडामोडी (14 मार्च 2017)

मनोहर पर्रीकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री :

  • गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी 12 मार्च रोजी भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते मनोहर पर्रीकर यांची गोव्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आणि या पदाची शपथ घेतल्यानंतर 15 दिवसांच्या आत सभागृहात आपले बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली. तत्पूर्वी पर्रीकर यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापण्यासाठी बहुमत असल्याचा दावा केला होता.
  • राज्यपालांचे सचिव रुपेशकुमार ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रात म्हटले आहे की, पर्रीकर यांनी दावा सादर करताना भाजपाचे 13, मगोपाचे 3, गोवा फारवर्ड पार्टीचे 3 आणि अपक्ष 2 अशा 21 जणांची यादी राज्यपालांना सादर केली.
  • तसेच मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देतील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मार्च 2017)

स्विस ओपन स्पर्धेत सायना नेहवालला अग्रमानांकन :

  • भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला 14 मार्च पासून सुरू होणाऱ्या योनेक्स स्विस ओपन स्पर्धेत महिला गटातील अव्वल मानांकन प्राप्त झाले आहे.
  • सायना सध्या विश्व मानांकनात नवव्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत महिला गटात खेळणारी सायना जगातील पहिल्या दहा खेळाडूंमधील एकमेव स्पर्धक आहे. त्यामुळे तिला विजेतेपदाच्या दावेदार मानल्या
  • जात आहे.
  • तसेच याआधी, सायना नेहवाल ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीतपोहचली होती.
  • स्विस ओपनमध्ये इतर भारतीय खेळाडूंमध्ये पुरुष एकेरीत अजय जयराम याला तिसरे तर एच.एस. प्रनॉय याला पाचवे मानांकन प्राप्त झाले आहे. सध्या शानदार फॉर्ममध्ये असलेल्या समीर वर्मा याला 13 वे मानांकन प्राप्त झाले आहे.

ली चाँग वेईला इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद :

  • जागतिक क्रमवारीतील अव्वल बॅडमिंटनपटू आणि मलेशियाचा अग्रमानांकित ली चाँग वेई याने अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे चौथ्यांदा विजेतेपद पटकावले. त्याने 13 व्यांदा या स्पर्धेत खेळताना चौथ्या जेतेपदास गवसणी घातली आहे.
  • अत्यंत एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात वेई याने आपला दर्जा सिद्ध करताना चीनच्या शी युकी याचा 21-12, 21-10 असा फडशा पाडून सहजपणे विजेतेपदावर नाव कोरले.
  • विशेष म्हणजे, युकीने कारकिर्दीत पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, अनुभवी वेईसमोर त्याचा काहीच निभाव लागला नाही.
  • तसेच या स्पर्धेआधी वेई याने यंदाची ऑल इंग्लंड स्पर्धा आपल्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असेल, अशी घोषणा करून बॅडमिंटनविश्वाचे लक्ष वेधले होते.

पंजाबच्या कर्णधारपदी ग्लेन मॅक्‍सवेल :

  • ‘इंडियन प्रीमिअर लीग’च्या (आयपीएल) आगामी दहाव्या मोसमासाठी ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’ संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेलकडे सोपविण्यात आले आहे.
  • गेल्या मोसमात पंजाबच्या संघाने डेव्हिड मिलरकडे नेतृत्व सोपविले होते. सहा सामन्यांनंतर मिलरला वगळून मुरली विजयला कर्णधारपदी नियुक्त केले होते. यंदा पाच एप्रिलपासून ‘आयपीएल’ सुरू होत आहे.
  • दोन कर्णधार बदलूनही गेल्या मोसमात पंजाबच्या संघाला यश आले नव्हते. सलग दोन स्पर्धांमध्ये पंजाब शेवटच्या स्थानी राहिले. त्यामुळे यंदा पंजाबने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे.
  • वास्तविक पंजाबच्या संघात इऑन मॉर्गन आणि डॅरेन सॅमीसारखे आंतरराष्ट्रीय संघांचे अनुभवी कर्णधार आहेत; तरीही त्यांनी मॅक्‍सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला.

दिनविशेष :

  • जर्मन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ‘अल्बर्ट आईन्स्टाईन’ यांचा जन्म 14 मार्च 1910 मध्ये झाला.  
  • 14 मार्च 1931 मध्ये पहिला भारतीय बोलपट ‘आलमआरा’ नॉव्हेल्टी या सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
  • सन 1988 मध्ये जपानमध्ये समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 मार्च 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.