Current Affairs of 15 June 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (15 जून 2017)
मनोहर चिंतामण कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्कार :
- महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा बालगंधर्व पुरस्कार ज्येष्ठ नाट्यव्यवस्थापक मनोहर चिंतामण कुलकर्णी (अण्णा) यांना जाहीर झाला आहे.
- तसेच विठ्ठल हुलावळे (नेपथ्यकार), यश रूईकर (पुरूषोत्तम करंडक विजेते), चंद्रशेखर देशपांडे (ऑर्गनवादक), अस्मिता चिंचाळकर (अभिनेत्री व गायिका) आणि दत्तात्रय शिंदे (सेटिंग) यांना बालगंधर्व विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
- बालगंधर्व पुरस्काराची निवड करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यामध्ये या पुरस्कारांची निवड करण्यात आली. या निवड समितीत अनुराधा राजहंस, डॉ. सतीश देसाई, शुभांगी दामले, उस्ताद फैय्याज हुसेन खान यांचा समावेश होता.
Must Read (नक्की वाचा):
आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संतोष जाधव :
- करमाळा येथील श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बागल गटाचे संतोष जाधव-पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
- दि. 14 जून रोजी या कारखान्याच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रातंधिकारी मारूती बोरकर यांनी काम पाहिले.
- तसेच या कारखान्याची निवडणूक बागल गट, पाटील गट, जगताप गट व शिंदे गट अशी चौरंगी झाली होती. यात राष्ट्रवादीच्या बागल गटाचे सर्व 21 संचालक विजयी झाले होते.
पुण्याच्या उपमहापौरपदी सिद्धार्थ धेंडे यांची निवड :
- पुणे महानगरपालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपकडून सिध्दार्थ धेडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून लता राजगुरु हे होते.
- मात्र निवडणुकीवेळी लता राजगुरू यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होत सिध्दार्थ धेंडे विजयी झाले.
- उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे महिनाभरापूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे उपमहापौरपद हे रिक्त झाले होते. तर या पार्श्वभूमीवर महापालिकेत उपमहापौरपदाची निवडणूक घेण्यात आली.
- तसेच या निवडणुकीला महापौर मुक्ता टिळक, अतिरिक्त आयुक्त शितल उगले, पीठासीन आधिकारी लहुराज माळी आणि सर्व पक्षीय गटनेते उपस्थित होते.
ज्युनियर राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र चॅम्पियन :
- डेहराडून येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय ज्युनिअर पिकलबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाने वर्चस्व राखताना सांघिक विजेतेपदाला गवसणी घातली.
- तसेच, ज्युनिअर स्पर्धेसोबतच आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या फेडरेशनक कप पिकलबॉल स्पर्धेत मात्र राजस्थानने बाजी मारली.
- निर्णायक सामन्यांमध्ये केलेल्या चुकांमुळे महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
- डेहराडून येथील परेड मैदानावर झालेल्या या स्पर्धेत ज्यूनिअर गटात महाराष्ट्राने जबरदस्त खेळ केला.
- महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात कृष्णा मंत्रीने यश पाटीलचा 11-1, 11-4 असा धुव्वा उडवून सुवर्ण पदक पटकावले.
- मुलींच्या गटात मात्र राजस्थानच्या गीतम शर्माने बाजी मारत यजमान उत्तराखंडच्या खुशी थोपाचे आव्हान 11-1, 11-0 असे परतावले.
दिनविशेष :
- आय.बी.एम.च्या पूर्वज कंपनी टॅब्युलेटिंग कम्प्युटिंग रेकोर्डिंग कंपनीची 15 जून 1911 मध्ये स्थापना झाली.
- मराठी समाजसेवक ‘अण्णा हजारे’ यांचा जन्म 15 जून 1938 मध्ये झाला.
- 15 जून 1931 हा ‘संदेश’कार अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा स्मृतीदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा