Current Affairs of 14 June 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 जून 2017)
टाटा मोटर्सच्या वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ :
- भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ते कार्यकारी समितीचे सदस्यही असतील.
- रवींद्र पिसारोडी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आठवडयाभराने गिरीश वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
- टाटा मोटर्स एका महत्वाच्या परिवर्तनाच्या टप्प्यावर असताना पीसारोडी यांची एक्झिट आणि गिरीश वाघ यांची नियुक्ती झाली आहे.
- अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्यासाठी कंपनीमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून, 1400 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे तर, अनेकांच्या जबाबदा-या बदलण्यात आल्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
राजू नायक यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्कार प्रदान :
- आचार्य अत्रे हे पत्रकारितेतील उतुंग व्यक्तिमत्व होते. आजही पत्रकारिता सुरु करताना पत्रकार त्यांचा आदर्श पुढे ठेवला जातो. त्यांचाच घेतलेला वसा आम्ही खाली ठेवणार नाही, असे प्रतिपादन ‘लोकमत’च्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांनी केले.
- आचार्य अत्रे यांच्या 48 व्या स्मृतिदिनानिमित्त सासवड येथे अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या वतीने नायक यांना आचार्य अत्रे पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना नायक बोलत होते.
- तसेच या कार्यक्रमात कवी अनिल कांबळे याना आचार्य अत्रे साहित्यिक पुरस्कार व बंडा जोशी यांना आचार्य अत्रे कलाकार पुरस्काराने गौरविण्यात आले. अत्रे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
800 शहरांमध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू होणार :
- येत्या दोन वर्षांत 800 शहरांमध्ये पासपोर्ट सुविधा केंद्र सुरू होणार आहे. जिल्हा मुख्यालयाच्या मुख्य पोस्ट ऑफिस (जीपीओ) मध्ये ती असतील, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांनी दिली.
- अर्थमंत्री अरुण जेटलींनी अर्थसंकल्पात या आशयाची घोषणा केली होती. त्याला अनुसरून यावर्षी 150 टपाल कार्यालयांत ही केंद्रे सुरू होत आहेत, असे नमूद करून राज्यमंत्री सिंग म्हणाले की दोन वर्षांत ही संख्या 800 वर जाईल.
- सध्या पासपोर्ट मिळवण्यासाठी दूर अंतरावरच्या पासपोर्ट कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात आता ते टळेल. दुर्गम भागातल्या लोकांनाही फार तर जिल्हा मुख्यालयापर्यंतच यावे लागेल.
- पासपोर्टचे अर्ज स्वीकारण्यापासून त्याच्या कायदेशीर छाननीनंतर नागरीकांना तिथेच पासपोर्ट देण्याचे काम ही केंद्रे करणार आहेत. पासपोर्ट मंजूर करण्याचे काम यापुढे परराष्ट्र व्यवहार व डाक विभाग करणार आहे.
आयसीसी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये कोहली प्रथम स्थानावर :
- चॅम्पियन्स ट्रॉफीत साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
- दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए.बी. डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांना मागे टाकत कोहली अव्वल स्थानावर पोहोचला.
- तसेच या रॅंकिंगमध्ये विराट कोहलीच्या नावे 862 अंक आहेत, तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या वॉर्नरच्या नावावर 861 गुण आहेत. एबीडीच्या नावावर 847 गुण आहेत.
- टीम रॅकिंगमध्ये द. आफ्रिका पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानार तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
दिनविशेष :
- 14 जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून पाळला जातो.
- रक्तगटांचे संशोधक ‘कार्ल लॅण्डस्टेनर’ यांचा जन्म 14 जून 1868 मध्ये झाला.
- 14 जून 1896 मध्ये महर्षी धोंडे केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम’ ही संस्था स्थापन केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा