Current Affairs of 14 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (14 डिसेंबर 2017)
बँकेशी ‘आधार’ लिंक करण्यास मुदतवाढ :
- देशातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ लिंक करणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करण्यासाठी यापूर्वी 31 डिसेंबरपर्यंत डेडलाईन देण्यात आली. मात्र, आता ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे. याची पुढील तारीख लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
- केंद्र सरकारने 13 डिसेंबर रोजी प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग अॅक्ट, 2002 च्या कायद्यात बदल केल्याने आधार किंवा पॅन क्रमांक सरकारने दिलेल्या तारखेत बँक खात्याशी जोडण्यात यावे, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता ही डेडलाईन वाढवण्यात आली आहे. याबाबत 14 डिसेंबर पासून सुनावणी होणार आहे. आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडणे बंधनकारक करण्यात येऊ नये, यासाठी न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिकांवर पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु होणार आहे.
- दरम्यान, यापूर्वी मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी फेब्रुवारीची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर मोबाईलधारकांच्या सोयीसाठी 1 जानेवारीपासून घरबसल्या मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):
दिग्दर्शक, अभिनेते नीरज व्होरा कालवश :
- ‘खिलाडी 420’, ‘फिर हेराफेरी’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे, तर ‘विरासत’, ‘रंगीला’, ‘मन’ या चित्रपटांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज व्होरा यांचे 14 डिसेंबर रोजी सकाळी मुंबईत निधन झाले.
- सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सध्याचे कर्णधार रोहित शर्माचे विक्रमी व्दिशतक :
- मालिकेतील पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्याचा भारतीय फलंदाजांचा ‘राग’ श्रीलंकेच्या गोलंदाजीवर निघाला आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने तब्बल 392 धावांचा डोंगर उभा केला.
- पहिल्या सामन्यात भेदक कामगिरी केलेल्या श्रीलंकेच्या गोलंदाजांना पदव्युत्तर देत कर्णधार रोहित शर्माने कारकिर्दीतील तिसरे व्दिशतक झळकाविण्याचा पराक्रम केला. रोहितने सलामीला येत नाबाद 208 धावा केल्या. या आव्हानासमोर श्रीलंकेला 50 षटकांत 251 धावांपर्यंतच मजल मारता आली. 141 धावांनी मिळविलेल्या या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी साधली.
जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांसाठी भरघोस प्रतिसाद :
- जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संस्थांच्या निर्मितीसाठी नरेंद्र मोदी सरकारने आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये देशातील 100हून अधिक नामवंत शैक्षणिक संस्थांनी 13 डिसेंबर रोजी सहभाग नोंदविला.
- यापैकी 20 संस्थांना निवडण्यात येणार असून त्यांना पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्येकी तब्बल एक हजार कोटी रुपयांचे विशेष अनुदान दिले जाणार आहे. शिवाय संपूर्ण स्वायत्तताही दिली जाणार आहे. मात्र अट फक्त एकच असेल, ती म्हणजे जगातील पहिल्या 100 संस्थांच्या प्रतिष्ठित यादीमध्ये स्थान पटकावण्याची आहे.
- सहभागी झालेल्या 100 संस्थांमध्ये महाराष्ट्रातील 10हून अधिक संस्थांचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिली. त्यानुसार ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नालॉजी’ (आयआयटी), मुंबई यापासून ते पुण्यातील एमआयटी या खासगी शिक्षण संस्थांचा समावेश आहे.
- तसेच यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनीही सहभाग नोंदविल्याचे समजते. एकूण 20 संस्था निवडल्या जाणार आहेत. त्यापैकी 10 सरकारी व निमसरकारी संस्था असतील, तर 10 खासगी शैक्षणिक संस्थांचा समावेश असेल.
पंचवीस वर्षांनी डेमोक्रॅटिक पक्षास यश :
- गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच अमेरिकेतील अलाबामा राज्यातून सिनेटची जागा जिंकताना डेमोक्रॅटिक पक्षाचे डग जोन्स यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे समर्थन असलेले उमेदवार रॉय मूर यांचा पराभव केला.
- मूर यांच्यावर किशोरवयीन मुलामुलींशी लैंगिक गैरवर्तन केल्याचे आरोप होते. मूर यांचा पराभव हा ट्रम्प यांना मोठा धक्का आहे. ट्रम्प यांनी मूर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपानंतर अनेक रिपब्लिकनांनी मूर यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले होते. ट्रम्प यांनी सार्वजनिक वक्तव्ये व ट्विटच्या माध्यमातून मूर यांना पाठिंबा दिला होता.
- अलाबामाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोन्स यांना 49.92 तर मूर यांना 48-39 टक्के मते पडली आहेत. अलाबामाचा मी आभारी आहे असे जोन्स यांनी म्हटले आहे.
- नवीन सिनेटर जोन्स यांचा शपथविधी पुढील वर्षी होणार आहे. अलाबामा या रिपब्लिकनांच्या बालेकिल्ल्यात डेमोक्रॅटिक पक्षाने सिनेटची जागा जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. जोन्स यांचा अनपेक्षित विजय हा सिनेटमध्ये रिपब्लिकनांची आघाडी कमी करणारा असून आता 51-49 असे बलाबल आहे.
दिनविशेष :
- सन 1819 मध्ये 14 डिसेंबर रोजी अलाबामा हे अमेरिकेचे 22 वे राज्य म्हणून घोषित.
- योगाचार्य ‘बी.के.एस. अय्यंगार’ यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 मध्ये झाला.
- 14 डिसेंबर सन 1941 मध्ये (दुसरे महायुद्ध) जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
- टांझानियाचा 14 डिसेंबर 1961 मध्ये संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
Must Read (नक्की वाचा):
आजच्या चालू घडामोडींचा व्हिडिओ
<iframe width=”350″ height=”250″ src=”https://www.youtube.com/embed/fqTd2vmiORA?autoplay=1″ frameborder=”0″ gesture=”media” allow=”encrypted-media” allowfullscreen></iframe>
{/source}