Current Affairs of 13 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (13 जानेवारी 2016)

13 फेब्रुवारीला पोटनिवडणूक :

 • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि पंजाबसह एकूण आठ राज्यांमधील विधानसभेच्या 12 जागांसाठी येत्या 13 फेब्रुवारी रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.
 • निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
 • पोटनिवडणुका होणाऱ्या मतदारसंघात महाराष्ट्रातील पालघर मतदारसंघाचा समावेश आहे.

परीकथेचा जनक पेरॉटला आदरांजली :

 • इंग्रजीत ‘वन्स अपॉन ए टाइम’ अशी गोष्टीची सुरवात असेल, तर ती नक्कीच एखादी परीकथा असल्याचे लक्षात येते.
 • ‘सिंड्रेला’, ‘पुस इन बूट’, ‘लिटिल रेज राइडिंग हूड’, ‘स्लिपिंग ब्यूटी’ या कथा अजूनही बालवाचकांच्या मनावर गारुड घालतात.
 • या कथांचा निर्माता फ्रेंच लेखक चार्ल्स पेरॉट त्याची 388 वी जयंती आहे. त्यानिमित्त ‘गुगल’ने त्याच्या परीकथेतील पात्रे ‘डुडल’वर टाकून त्याला आदरांजली वाहिली आहे.

पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा पुरस्कार पटकावला :

 • सध्या जागतिक फुटबॉलमध्ये आपला एकहाती दबदबा राखलेला अर्जंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने पाचव्यांदा ‘फिफा’चा मानाचा ‘बालोन डी ओर’ पुरस्कार पटकावला.
 • यासह फुटबॉल जगतावरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले.
 • झुरिकमध्ये झालेल्या वार्षिक ‘फिफा’ बालोन डी ओर पुरस्कार सोहळ्यात मेस्सीला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

‘स्टँड अप इंडिया’ योजनेस डॉ. आंबेडकरांचे नाव :

 • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षांनिमित्त ‘दलित कॅपिटॅलिझम’चे नवे पर्व देशात सुरू करण्याची तयारी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सुरू केली आहे.
 • एससी, एसटी व महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्टॅण्ड अप इंडिया’ योजनेचे ‘डॉ. बी. आर. आंबेडकर क्रेडिट स्कीम’ असे नामकरण करण्यावर अर्थ मंत्रालयात गांभीर्याने विचार सुरू आहे.
 • दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’चे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ‘स्टॅण्ड अप इंडिया योजना’चे नाव बदलण्याची मागणी केली.
 • ही मागणी मान्य झाल्यास आर्थिक सबलीकरणाच्या योजनेस पहिल्यांदाच डॉ. आंबेडकरांचे नाव दिले जाईल.

धावण्याच्या अंतरात केली घट :

 • पोलिसांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी अंतर्गत धावण्याचे अंतर तिपटीने कमी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • पुरुष उमेदवारांसाठी 5 कि.मी.वरून 1,600 मीटर, तर महिलांसाठी 3 कि.मी.वरून 800 मीटर इतके अंतर कमी केले आहे.
 • गेल्या वर्षी पोलीस भरतीच्या वेळी धावताना चार युवकांचा मृत्यू झाला होता. त्याची गंभीर दखल घेत शासनाने गेल्या आठवड्यात हा निर्णय घेतला.

बैलगाडी शर्यतीवर बंदीच :

 • महाराष्ट्रासह अन्य राज्यांत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील तसेच तामिळनाडूतील ‘जल्लिकट्टू’ या बैलाच्या खेळावरील बंदी उठविणाऱ्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेस स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला चपराक लगावली आहे.
 • विशेष म्हणजे पर्यावरण खात्याच्या निर्णयास सरकारच्याच पशु कल्याण मंडळाने (अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड) प्राणिमित्र संघटनांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब, हरयाणा व केरळमधील बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायम राहणार आहे.

लोकसेवा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती :

 • अखिल भारतीय सेवांमध्ये राज्यातील यशाचा टक्का वाढविण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेसाठी गुणवत्ताधारित विशेष शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
 • यामुळे पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन भागांत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीसह उमेदवारास 10 हजार रुपयांचा दरमहा निर्वाह भत्ता मिळणार आहे.
 • दिल्लीतील नामांकित संस्थांमध्ये आयएएसच्या पूर्वतयारीसाठी शिक्षण मिळावे यासाठी हा भत्ता असेल. त्यासाठी 23.46 कोटींच्या खर्चासही मान्यता दिली.
 • महाराष्ट्राचा रहिवासी व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल 10 लाखांपर्यंत असणाऱ्यास याचा लाभ घेता येईल, तसेच तो मागील तीन वर्षांमध्ये किमान एक वेळा यूपीएससीची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखत फेरीपर्यंत पोहोचून यशस्वी न झालेला असणे आवश्यक असेल.

जनरल मोटर्सच्या अध्यक्षपदी पहिल्या महिला मेरी बॅरा :

 • अमेरिकेतील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनी जनरल मोटर्स (जीएम)च्या पहिल्या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी मेरी बॅरा यांची कंपनीच्या अध्यक्षपदीही निवड झाली आहे.
 • कंपनीच्या इतिहासात एखाद्या महिलेच्या रूपात प्रथमच हा दुहेरी पदमानाचा मुकुट विराजमान झाला आहे.
 • कर्मचारी ते संचालक या पदावर पोहोचलेल्या 54 वर्षीय मेरी या कंपनीतील एकमेव व्यक्ती आहेत.
 • कंपनीच्या संचालक मंडळातील 12 सदस्यांपैकी सध्याचे अध्यक्ष थेओडोर सोल्सो यांच्याकडून त्या पदभार स्वीकारतील.
 • मेरी बॅरा या जानेवारी 2014 मध्ये जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनल्या होत्या. एखाद्या वाहन कंपनीच्या सीईओ असणाऱ्या त्या पहिल्या महिला त्या वेळी ठरल्या होत्या.

मराठी उद्योगभूषण पुरस्कारांचे वितरण :

 • मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्र मंडळाच्या 35 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहा उद्योजकांना ‘मराठी उद्योगभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
 • एम-इंडिकेटर या लोकप्रिय मोबाइल अ‍ॅपची निर्मिती करणारे सचिन टेके, मौज प्रकाशनगृहाचे माधवराव भागवत, वास्तुविशारद शशिकांत देशमुख, विनकोट प्रा.लि.चे प्रदीप ताम्हाणे, अभिनेते व निर्माते प्रशांत दामले आणि हॉटेल आस्वादचे श्रीकृष्ण सरजोशी यां सहा उद्योजकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

दिनविशेष :

 • 1610 : गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
 • 1957 : हिराकूड धरणाचे उदघाटन झाले.
 • विज्ञानाचे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ विल्यम वेन यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.