Current Affairs of 12 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 जानेवारी 2016)

चालू घडामोडी (12 जानेवारी 2016)

सीओईपीच्या विद्यार्थ्यांची ‘स्वयम’भरारी :

  • सागरी आणि जमिनीवरील सुरक्षा भक्कम करण्यासाठी पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला संपूर्ण भारतीय बनावटीचा ‘स्वयम’ हा एक किलो वजनाचा उपग्रह एप्रिलमध्ये श्रीहरीकोटा येथून 29 एप्रिल रोजी अवकाशात झेपावणार आहे.
  • ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थेने’ (इस्रो) त्यासाठी हिरवा कंदील दाखविला असून, त्याचे लवकरच ‘काउंटडाउन’ सुरू होईल.
  • अभियांत्रिकीच्या एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम’ हा देशातील पहिला उपग्रह आहे.
  • अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षात असलेल्या वेगवेगळ्या शाखांमधील 200 विद्यार्थ्यांनी यात योगदान दिले आहे.
  • तसेच जून 2014 मध्ये ‘स्वयम’ पूर्ण तयार झाला.
  • बंगळूर येथील ‘इंडियन सॅटेलाइट ऍप्लिकेशन सेंटर’ येथे जुलै 2014 रोजी पाठविण्यात आला.
  • तेव्हापासून दर तीन महिन्यांनी ‘सीओईपी’चे विद्यार्थी या केंद्रावर जाऊन त्यातील तांत्रिक गोष्टीची पूर्तता करत होते.

इंटरपोलची मदत मागणार :

  • हवाई तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची ओळख पटविण्यासाठी ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस बजावण्याची आवश्‍यकता असून, त्यासाठी इंटरपोलची मदत घेणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने  जाहीर केले.
  • गृहमंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर केली. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे (एनआयए) पथक हवाई तळ आणि तळाबाहेरील साक्षीदारांची तपासणी करत असल्याचेही गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने सांगितले.

साखर कारखान्यांचे परवाने निलंबित :

  • एफआरपीची थकबाकी न देणाऱ्या राज्यातील 12 साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे सारख आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) म्हणून गत हंगामात शेतकऱ्यांना 19 हजार 120 कोटी रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी डिसेंबरअखेरपर्यंत 18 हजार 800 कोटी रुपये देण्यात आले. मात्र अजूनही 328 कोटींची थकबाकी आहे.
  • परवाने रद्द करण्यात आल्यानंतरही त्यांनी गाळप सुरू ठेवल्यास त्यांच्यावर दंड आकारण्यात येईल.

प्रख्यात गायक डेव्हिड बोवी यांचे निधन :

  • ‘ब्लॅकस्टार’, ‘द राईज अँड फॉल ऑफ झिगी स्टारडस्ट’ अशा विविध संगीत कलाकृतींमधून स्वत:चे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलेले प्रख्यात गायक डेव्हिड बोवी यांचे कर्करोगाने निधन झाले.
  • बोवी (वय 69) यांचे निधन झाल्याची घोषणा त्यांचे पूत्र व प्रसिद्ध दिग्दर्शक डंकन जोन्स यांनी केली.
  • लंडन येथे 8 जानेवारी 1947 मध्ये जन्मलेल्या बोवी यांचे मूळ नाव डेव्हिड जोन्स असे होते.
  • बोवी यांनी 2006 मध्ये न्यूयॉर्क येथे अखेरचा सार्वजनिक कार्यक्रम केला होता.  
  • ‘द मॅन हू फेल ऑन द अर्थ’ या 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधील त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली.

उनामध्ये उभारणार ऊर्जानिर्मिती प्रकल्प :

  • गुजरातच्या गीर-सोमनाथ जिल्ह्यातील उना येथे चार हजार मेगावॉट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला वीस हजार कोटी रुपये खर्च येईल.
  • खासगी क्षेत्रातील हा दुसरा प्रकल्प राज्य सरकार आणि केंद्रीय विद्युत आयोगाच्या सहकार्याने उभारला जाणार असून, तो आयात कोळशावर चालेल.
  • या प्रकल्पातून तयार होणारी 40 ते 50 टक्के वीज गुजरातला मिळणार असून, उर्वरित वीज अन्य राज्यांना मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • राज्यातील पहिला खासगी वीज प्रकल्प कच्छमधील मुंद्रा येथे टाटा पॉवर कंपनीने उभारला असून, चार हजार मेगावॉटचा हा प्रकल्प कार्यान्वितही झाला आहे.

‘फ्लिपकार्ट’च्या ‘सीईओ’पदी बिनी बन्सल :

  • ऑनलाइन खरेदी-विक्री क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या व्यवस्थापनात मोठे बदल केले असून, कंपनीचे सहसंस्थापक बिनी बन्सल आता कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून काम पाहणार आहेत.
  • फ्लिपकार्टचे विद्यमान सीईओ सचिन बन्सल कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारतील.
  • बिनी बन्सल यांच्याकडे आता फ्लिपकार्टच्या आर्थिक, कायदेशीर, कॉर्पोरेट विकास व मानव संसाधन विभागांसह ई-कार्ट, एरियाज-कॉमर्स व मिंत्रासारख्या उपकंपन्यांच्या कारभाराची जबाबदारी हस्तांतरित होणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात फ्रांसचे सैन्यही परेड करणार :

  • भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परराष्ट्राचे सैन्य भाग घेत आहे.
  • 26 जानेवारीला राजपथावर भारतीय सैन्यासोबतच यावर्षी फ्रांसचे सैन्यही परेड करणार आहे.
  • फ्रांसचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहणार आहेत. गेल्यावर्षी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा प्रमुख पाहुणे होते.
  • फ्रांस आर्मीची एक तुकडी राजस्थानमध्ये भारताबरोबर संयुक्त युद्धसराव करण्यासाठी आली आहे. 8 ते 16 जानेवारी दरम्यान हा युद्धसराव चालणार आहे.

दिनविशेष :

  • राष्ट्रीय युवा दिन
  • झांझिबार क्रांती दिन : टांझानिया.
  • 1598 : जिजाबाई शहाजी भोसले (बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड येथे जन्म).
  • 1863 : स्वामी विवेकानंद यांचा जन्म.   

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.