Current Affairs of 13 August 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2016)

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2016)

जीएसटी विधेयक लागू करणारे पहिले राज्य आसाम :

  • आसाम विधानसभेने (दि.12) एकमताने वस्तू-सेवाकर विधेयक (जीएसटी) मंजूर केले.
  • केंद्र शासनानंतर जीएसटी विधेयक मंजूर करणारे आसाम देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • अनेक वर्षांपासून रखडलेले जीएसटी विधेयक मागच्या आठवडयात राज्यसभा आणि लोकसभेत मंजूर झाले.
  • संसदेच्या मान्यतेनंतर 29 पैकी अर्ध्या राज्यांची मंजुरी मिळाली की जीएसटीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • काँग्रेस आणि एआययूडीएफच्या आमदारांनी आसाम विधानसभेत विधेयकाला पाठिंबा दिला.
  • जीएसटीचा आसामवर काय परिणाम होईल त्यावर चर्चेची मागणी केली होती मात्र सभापतींनी त्यांची मागणी फेटाळून लावली.
  • राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिले जाते.
  • जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2016)

मायकल फेल्प्सचा भीमपराक्रम :

  • ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अ‍ॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सचा पराभव करणे कठीणच झाले आहे.
  • एकीकडे भारत एका पदकाची आशा करत असताना मायकल फ्लेप्स मात्रने वैयक्तिक चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
  • 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारत मायकल फेल्प्सने अजून एक सुवर्णपदक जिंकलं आहे.
  • फेल्प्सच्या कारकीर्दीतले 22 सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे.
  • मायकल फ्लेप्सने सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारली आहे.
  • एकाच खेळात सलग चौथ्यांदा जिंकण्याचा विक्रम करणारा मायकल फ्लेप्स तिसरा खेळाडू ठरला आहे.
  • मायकल फेल्प्सने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 26 पदके आपल्या नावे केली आहेत.
  • तसेच या पदकांत 22 गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे.  
  • 22 सुवर्णपदकांसह 26 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे.

स्वातंत्र्यदिनी एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना आदरांजली :

  • कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांचा भारताच्या सत्तराव्या स्वातंत्र्य दिनी ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या मैफलीने सन्मान करण्यात येणार आहे.
  • सुब्बलक्ष्मी यांना त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली वाहण्यात येणार असून त्यानिमित्त भारताच्या संयुक्त राष्ट्रातील स्थायी दूतावासाने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
  • चेन्नईस्थित शंकरा नेत्रालय या संस्थेच्या सहयोगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • तसेच 1966 मध्ये सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण देण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते.
  • एम.एस. सुब्बलक्ष्मी यांच्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाच्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी लाभणारे रेहमान हे दुसरे भारतीय संगीतकार आहेत.

सानिया-बोपण्णा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत :

  • रिओ ऑलिंपिकमध्ये चौथ्या मानांकित भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी मिश्र दुहेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
  • सानिया आणि बोपण्णा यांनी ग्रेट ब्रिटनच्या अँडी मरेहेदर वॉट्सनवर 6-4, 6-4 असा विजय मिळविला.
  • टेनिसमध्ये भारताचे एकमेव आव्हान शिल्लक राहिलेल्या या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. या जोडीने 64 मिनिटे चाललेल्या या सामन्यात मरे आणि वॉट्सनच्या जोडीवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.
  • भारताला रौप्य पदकापर्यंत जाण्यासाठी आणखी एक विजय आवश्यक आहे.
  • भारताच्या या जोडीचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यास त्यांना ब्राँझपदकासाठी सामना खेळावा लागणार आहे.
  • ऑलिंपिक स्पर्धांत टेनिसमध्ये भारताला आतापर्यंत फक्त एक पदक जिंकता आलेले आहे.
  • 1996 अटलांटा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये लिअँडर पेसने ब्राँझपदक मिळविले होते.

सचिन मोरे यांची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद :

  • मूळचे परळी खोऱ्यातील अंबवडे येथील संगीत विशारद सचिन मोरे यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले.
  • त्यांनी विरार (मुंबई) येथे यंग स्टार संस्थेतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त आयोजित सलग 43 तासांच्या शास्त्रीय संगीत मैफलीत गायन सादर केले.
  • तसेच या उपक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
  • या कार्यक्रमात राज्यातील 36 कलाकार सहभागी झाले होते.
  • मोरे यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. (संगीत) शिक्षण घेतले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताच्या विविध राज्य स्पर्धेत पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या आहेत.

दिनविशेष :

  • 1795 : अहिल्याबाई होळकर स्मृतीदिन.    
  • 1890 : त्र्यंबक बापूजी ठोंबरे तथा बालकवी, मराठी कवी यांचा जन्म.
  • 1898 : आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, मराठी साहित्यिक यांचा जन्म.
  • 1943 : रिझर्व्ह बॅंकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुंखांची नियुक्ती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 ऑगस्ट 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.