Current Affairs of 13 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (13 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (13 एप्रिल 2018)

बोईंग, महिंद्रा आणि एचएएल करणार ‘फायटर’ची निर्मिती :

    • भारतीय वायुसेनेचे बळ वाढवण्यासाठी आता बोईंग ही जगप्रसिद्ध कंपनी महिंद्रा आणि एचएएल अर्थात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्यांसोबत घेऊन फायटर प्लेनची निर्मिती करणार आहे.
    • या कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार ताशी 2 हजार किमी वेगाने आकाशावर राज्य करणाऱ्या लढाऊ विमानांची निर्मिती भारतासाठी करण्यात येणार आहे.
    • बोइंग इंडिया, महिंद्रा डिफेन्स सिस्टम्स आणि एचएएल या तिन्ही कंपन्या F/A-18 सुपर हॉर्नेट फायटर प्लेनची निर्मिती करणार आहेत.
    • भारतीय वायु दलाची ताकद वाढवण्यासाठी तसेच मेक इन इंडिया ही मोहीम पुढे नेण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
    • या तीन कंपन्यांमध्ये जे MoU झाले त्यानुसार 110 फायटर प्लेन्सची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    • सुपर फायटर एअरक्राफ्टच्या निर्मितीचा खर्च कमी असणार आहे. तसेच कोणत्याही लढाऊ विमानापेक्षा या विमानाची ऑपरेटिंग कॉस्ट प्रति तास कमी खर्च असणारी आहे.

    • F/A -18 सुपर हॉर्नेटमुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार आहे. या विमानाचा ताशी वेग 1915 किमी असा तर रेंज 33 हजार 330 किमी असणार आहे.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2018)

बांगलादेशने हटवलं सरकारी नोक-यांमधील आरक्षण :

    • बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सरकारी नोक-यांमधील आरक्षण हटवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

    • विशेष गटांसाठी सरकारी नोक-यांमध्ये असलेल्या आरक्षण योजनेविरोधात हजारो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं होतं.

  • बांगलादेश सरकारच्या आरक्षण योजनेनुसार, सार्वजनिक विभागातील 56 टक्के नोक-या स्वातंत्र्यसैनिकांची मुलं, महिला, पारंपारिक अल्पसंख्यांक, अपंग आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी राखीव होते.

थाळीफेकमध्ये सीमाला रौप्य आणि नवजीतला कांस्यपदक :

    • थाळीफेक प्रकारातील दोन पदकांसह भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील अ‍ॅथलेटिक्सच्या पदकांचे खाते उघडले आहे.
    • सीमा पुनिया आणि नवजीत कौर ढिल्लन यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावले आहेत.
    • सीमाने कारकीर्दीतील सलग चौथ्या राष्ट्रकुल स्पर्धेत पदकाची किमया साधताना पहिल्याच प्रयत्नात 61.41 मीटर ही कामगिरी नोंदवली, तर नवजीतने अखेरच्या प्रयत्नात 57.43 मीटर अंतरावर थाळी फेकली.

    • माजी विश्वविजेत्या डॅनी स्टीव्हन्सने (ऑस्ट्रेलिया) 68.26 मी. थाळीफेक करीत स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले आहे.

    • 34 वर्षीय सीमाने राष्ट्रकुलमध्ये प्रत्येक प्रयत्नात यश मिळवले आहे.

    • 2006 मध्ये मेलबर्नला तिने रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर 2010 मध्ये रौप्य आणि 2014 मध्ये कांस्यपदक पटकावले होते.

तेजस्विनी सावंतची सुवर्णपदकाची कमाई :

    • नेमबाज तेजस्विनी सावंतनं अचूक निशाणा साधत भारताला स्पर्धेतलं पंधरावं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.

    • तेजस्विनीनं तिच्या अनुभवाच्या जोरावर 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात अव्वल स्थान पटकावलं आहे.

    • तेजस्विनीनं 50 मीटर रायफल प्रकारात 618.9 गुणांची कमाई करत रौप्यपदक पटकावलं होतं.

    • तसेच स्कॉटलंडची सेओनेड मकिनटोश तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. तिला 444.6 गुणांची कमाई करता आली.

  • याशिवाय 2010 साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीनं 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात रौप्य, तर 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स आणि 50 मीटर रायफल प्रोन (पेअर्स) प्रकारात कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती.

दिनविशेष :

    • 1699 मध्ये गुरु गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरु पंथ तयार केले.
    • छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापूर) यांच्यात 1731 मध्ये राज्याच्या सीमेवरून असलेला वाद वारणेचा तह होऊन मिटला.

    • हंगेरी देश 1849 मध्ये प्रजासत्ताक बनला.

    • 1999 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड, यात 379 लोक ठार तर 1200 जखमी झाले.

  • 1960 मध्ये अमेरिकाने ट्रान्झिट 1-बी हा जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीयुक्त उपग्रह प्रक्षेपित केला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.