Current Affairs of 12 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (12 एप्रिल 2018)

चालू घडामोडी (12 एप्रिल 2018)

इस्त्रोच्या IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने IRNSS-1I या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण केले आहे.
  • संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचा IRNSS-1I चा उपग्रह PSLV-C41 प्रक्षेपकाद्वारे अवकाशात झेपावला आहे.
  • आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अवकाश तळावरून हा उपग्रह अवकाशात झेपावला. तर PSLV चे हे 43 वे उड्डाण आहे.
  • तसेच दिशादर्शनच्या सात उपग्रहांची एक साखळी आहे. IRNSS-1I अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल IRNSS-1I उपग्रह IRNSS-1A या दिशादर्शक उपग्रहाची जागा घेणार आहे.

    IRNSS-1A या दिशादर्शक उपग्रहात बिघाड झाल्याने हा उपग्रह पाठवण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे मच्छीमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळेल. तर मच्छिमारांना दिशादर्शक असा हा उपग्रह ठरणार आहे.

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 एप्रिल 2018)

गुगलचे स्मार्ट स्पीकर्स भारतात दाखल :

  • मनोरंजनासोबत ज्ञान आणि माहितीचा साठा ओतणाऱ्या दोन ‘स्मार्ट स्पीकर्स’चे गुगलने भारतात अनावरण केले आहे.
  • त्यापैकी गुगल होमची किंमत 9,999 रुपये आणि गुगल होम मिनीची किंमत 4,499 रुपये आहे.
  • तसेच या स्पीकर्सद्वारे माहिती मिळविता येणार आहे, तर घरातील इतर गॅजेट्सवर नियंत्रण करता येणे शक्य असेल. त्यासाठी देण्यात येणाऱ्या अ‍ॅण्ड्रॉइड सहायकावरून त्याला आज्ञा देता येणार आहे.

आता ‘पासवर्ड’ इतिहासजमा होणार :

  • गुगलसह इतर वेबसाइटवरील ई-मेल व विविध खात्यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे हे सर्वासाठीच कठीण काम असते. मात्र, यापुढे तुमचा चेहराच तुमचा ‘पासवर्ड’ असणार आहे.
  • लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच ई-मेल व इतर खाते आपोआप उघडणार आहे. त्यामुळे पासवर्ड ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे.
  • तसेच आयफोनमध्ये असलेली फेसआयडी ऑथेंटिकेशनची सुविधा आता संगणक आणि लॅपटॉपमध्ये देण्यात येणार आहे.
  • या तंत्रज्ञानामुळे युजर्सना पासवर्डशिवाय अकाऊंटमध्ये लॉग-इन करता येणार आहे.
  • फिडो अलायन्स आणि डब्ल्यू थ्रीसी या संकेतस्थळांनी नवीन वेब ऑथेंटिकेशन स्टॅण्डर्ड इन्क्रिप्टेड हे तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे पासवर्ड, फिंगरप्रिंट सेंसर, कॅमेरा आणि यूटीबी बटनशिवाय केवळ चेहरा समोर नेताच अकाऊंट उघडता येणार आहे.
  • मोझिला फायरफॉक्समध्ये या तंत्राचा समावेश करण्यात आला असून गुगल क्रोम आणि मायक्रोसॉफ्टसुद्धा ही सुविधा युजर्सना देणार आहेत.

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचा मान जपानच्या नोनाका यांना :

  • जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून जपानचे 112 वर्षीय मसाझो नोनाका यांना मान्यता देण्यात आली आहे.
  • नोनाका यांचा जन्म 25 जुलै 1905 मध्ये झाला होता.
  • नोनाका हे सर्वात वयोवृद्ध असल्याचे प्रमाणपत्र गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने त्यांना दिले आहे.
  • तसेच स्पेनची वयोवृद्ध व्यक्ती फ्रान्सिस्को न्यूनेझ ओलिव्हरा यांचे वयाच्या 113 व्या वर्षी निधन झाले होते, त्यानंतर ही नवीन नोंद करण्यात आली आहे.
  • 2017 मध्ये जमेकातील व्हायोलेट ब्राऊन यांचा वयाच्या 117 व्या वर्षी मृत्यू झाला होता.
  • जपान हा देश दीर्घायुषी लोकांसाठी प्रसिद्ध असून तेथील जेरोमॉन किमोरा यांचे 2013 मध्ये वयाच्या 116 व्या वर्षी निधन झाले होते.
  • तसेच जपानमध्ये शंभरी ओलांडलेले किमान 68,000 लोक आहेत, असे सरकारी आकडेवारीतून दिसून आले आहे.

राहुल आवारेला राष्ट्रकुलचं सुवर्णपदक :

  • ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेने भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे.
  • 57 किलो वजनी गटात राहुलने कॅनडाचा प्रतिस्पर्धी स्टिव्हन ताकाशाहीवर मात करत भारताच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली आहे.
  • याव्यतिरीक्त 53 किलो वजनी गटात भारताच्या बबिता कुमारी फोगटने रौप्यपदकाची कमाई केली आहे.

किदम्बी श्रीकांतने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत मिळवलं पहिलं स्थान :

  • बॅडमिंटनमधील भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांत याने जागतिक क्रमवारी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • पुरुषांच्या यादीत अव्वल स्थान मिळवणारा श्रीकांत हा पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला आहे.
  • वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (BWF) या क्रमवारीची यादी जाहीर केली.
  • सायना नेहवालनमागोमाग आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये प्रशंसनीय कामगिरी करत भारताचं प्रतिनिधीत्व करणारा श्रीकांत दुसरा खेळाडू ठरला आहे.
  • पुरुष एकेरी गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर येणाऱ्या श्रीकांतने विश्वविजेत्या विक्टर अॅक्सेल्सेनला मागे टाकत 76,895 गुणांची कमाई केली आहे.
  • तर या यादीमध्ये 11 व्या स्थानावरही भारताच्या एचएस प्रणॉयने झेप घेतली आहे.

जुलैमध्ये सूर्यावर पहिली स्वारी :

  • माणसाने सूर्यावर स्वारी करण्याची कल्पना आता प्रत्यक्षात साकारणार आहे. पार्कर सोलार प्रोब हे नासाचे अंतराळयान 31 जुलै रोजी सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे.
  • हे अंतराळयान हवाई दलाच्या विमानातून फ्लोरिडा येथे नेण्यात आले असून तिथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात येत आहेत.
  • डेल्टा आयव्ही अग्निबाणाच्या सहाय्याने पार्कर सोलार प्रोब अवकाशात प्रक्षेपित करण्यात येईल. ते सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे.
  • आजवर तिथपर्यंत मानवनिर्मित एकही गोष्ट पोहोचू शकलेली नाही.

दिनविशेष :

  • 1606 मध्ये ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली.
  • रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिले अंतराळवीर असून त्यांनी 1961 मध्ये 108 मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
  • झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन 2009 मध्ये सोडून दिले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 एप्रिल 2018)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.