Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 11 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 जुलै 2017)

चालू घडामोडी (11 जुलै 2017)

पनवेलच्या महापौरपदी कविता चौतमोल यांची निवड :

 • पनवेल शहर महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमोल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, तर उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची घोषणा पीठासन अधिकाऱ्यांनी केली.
 • पनवेल महापालिकेच्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या विशेष महासभेत ही घोषणा करण्यात आली.
 • शेकापच्या महापौरपदाच्या उमेदवार हेमलता गोवारी व उपमहापौरपदाचे उमेदवार रवींद्र भगत यांनी उमेदवारी मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
 • तसेच रायगडचे जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जुलै 2017)

ब्रिटिश कौन्सिल इंडियाचे ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार :

 • मुंबईत शिक्षण, पर्यटन आणि कला क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी ब्रिटिश कौन्सिल इंडियाने ‘मुंबई फर्स्ट’ या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे. या कराराअंतर्गत दोन संस्थांकडून विविध क्षेत्रांत विकासासाठी प्रकल्प व उपक्रम राबविले जाणार आहेत.
 • शैक्षणिक क्षेत्रात अध्यापन कौशल्याच्या संवर्धनावर तसेच महानगर क्षेत्रातील स्वस्त खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यावर भर दिला जाईल.
 • अध्यापन कौशल्य व मिळणारे शिक्षण यांत सुधारणा करण्यासाठी कौशल्य विकास आणि भाषा प्रावीण्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले जातील. हे कार्यक्रम प्रत्यक्ष व डिजिटल अशा दोन्ही स्वरूपांत चालवले जातील, त्यामध्ये सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचा समावेश केला जाईल, अशी माहिती ब्रिटिश कौन्सिलकडून देण्यात आली आहे.
 • भारतात येणाऱ्या पर्यटकांची मुंबई महानगर क्षेत्र हीच पहिली पसंत ठरावी, यासाठी क्षेत्रातील रचनात्मक आणि सांस्कृतिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे हा या कराराचा एक महत्त्वाचा भाग आहे.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर कालवश :

 • ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे 10 जुलै रोजी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.
 • मंगेश तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते.
 • शेवटच्या दिवसांमध्येही त्यांहे व्यंगचित्र काढणे सुरूच होते. 1954 मध्ये त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले होते.
 • विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते.
 • तसेच तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे. त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे.
 • व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.

अलिबाग नगरपालिकेकडून सर्वेक्षण सुरू :

 • पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बेघरांना घर मिळावे यासाठी अलिबाग नगरपालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे.
 • तसेच योजनेची नागरिकांना माहिती मिळावी यासाठी प्रभागांमध्ये बैठका घेण्यात येत आहेत.
 • नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, यासाठी तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन नगरसेवक उमेश पवार यांनी केले.
 • नगरसेवक उमेश पवार यांनी यामध्ये पुढाकार घेत प्रथम सभा बोलावून नागरिकांना योजनेची माहिती दिली.
 • तांत्रिक सल्लागार म्हणून सरकारने चेतन सोनार यांची नेमणूक केली आहे. त्यांची टीम शहरामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहे, तसेच योजना समजावून सांगून नागरिकांच्या शंकांचेही निरसन त्यांच्यामार्फत केले जात आहे.
 • राज्यातील 17 ठिकाणचे काम त्यांना देण्यात आलेले आहे. सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा विकास आराखडा सरकारला सादर केला जाणार आहे. तो मंजूर झाल्यावर योजना मूर्तरूप घेणार आहे.

दिनविशेष :

 • 11 जुलै हा दिवस (संयुक्त राष्ट्रे) जागतिक लोकसंख्या दिन आहे.
 • 18 महिने बंद असलेली लाहोर-दिल्ली बस 11 जुलै 2003 रोजी पुनः सुरू झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 जुलै 2017)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World