Current Affairs of 10 July 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जुलै 2017)

चालू घडामोडी (10 जुलै 2017)

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुधा सिंगला सुवर्णपदक :

 • भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या 22 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या सुधा सिंग हिने सुवर्णपदक पटकावले. येथील कलिंगा स्टेडीयमवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात सुधाने 9 मिनिट 59.47 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली.
 • सुधाने 2009, 2011 आणि 2013 च्या स्पर्धेत रौप्यपदकावर समाधान मानले होते. परंतु यंदाच्या स्पर्धेत नुकतीच विवाहबध्द झालेल्या महाराष्ट्र कन्या ललिता बाबरने माघार घेतल्याने तिला सुवर्णपदकाची संधी होती.
 • तसेच याशिवाय बहारिनची विश्व आणि आशियाई विक्रमवीर रुथ जेबेट हीचे आव्हानही या स्पर्धेत नसल्याने सुधाचा सुवर्णपदकाचा मार्ग सोपा झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 जुलै 2017)

अहमदाबाद शहरला वर्ल्ड हेरिटेज सिटीचा दर्जा :

 • युनेस्कोने अहमदाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर म्हणून घोषित केले आहे.
 • पोलॅण्डच्या क्रोकोव शहरात झालेल्या युनेस्कोच्या 41व्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
 • अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह 20 देशांनी पाठिंबा दिला.
 • अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.
 • अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची 26 सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत.
 • तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत.

एनआरएआयच्या अध्यक्षपदी रानिंदरसिंग यांची फेरनिवड :

 • माजी आंतरराष्ट्रीय ट्रॅप नेमबाज रानिंदरसिंग यांची राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या (एनआरएआय) अध्यक्षपदी फेरनिवड झाली.
 • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांचे पुत्र असलेले 48 वर्षांचे रानिंदर यांनी मोहालीत झालेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी शामसिंग यादव यांचा 89-1 असा दारुण पराभव केला.
 • महासचिवपदी डी.व्ही. सीताराम राव यांची दुसऱ्यांदा एकमताने निवड झाली. सिनियर उपाध्यक्ष म्हणून ओडिशातील बिजदचे खा.के. एन. सिंगदेव हे एकमताने निवडून आले.
 • कोषाध्यक्षपदी करणकुमार निर्वाचित झाले. अध्यक्षांसह उपाध्यक्षपदाच्या आठ व सचिवांच्या सहा पदांसाठी निवडणूक पार पडली.
 • तसेच रानिंदर हे दिग्विजयसिंग यांच्या निधनानंतर संघटनेचे अध्यक्ष बनले होते.

दिनविशेष :

 • कोलकाता येथे 10 जुलै 1800 रोजी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करण्यात आली.
 • विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू सुनील गावसकर यांचा 10 जुलै 1949 मध्ये जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2017)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.