Current Affairs of 11 January 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (11 जानेवारी 2017)
माहिती अधिकार ऑनलाइन सुरु होणार :
- राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना 26 जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट ऑनलाइन कार्यप्रणालीचा वापर करावा लागणार आहे.
- राज्य सरकारने तसे निर्देश सर्व स्थानिक प्रशासन, जिल्हापरिषदा व पोलिस यंत्रणांना दिले असुन त्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्थादेखील केली आहे.
- तसेच यामुळे अर्जदारांना घरबसल्या माहिती अर्ज करुन माहिती मिळविता येणार आहे. संबंधित कार्यालयांना देखील निश्चित मुदतीतच अर्जदारांना माहिती द्यावी लागणार आहे.
- देशात डिजिटल युगाची सुरुवात झाल्याने राज्य सरकारने नागरीसेवा ऑनलाइन कार्यप्रणालीद्वारे देण्याला सुरुवात केली आहे. त्यातील काही सुरु झाल्या असुन काही सुरु केल्या जात आहेत.
- महत्वाच्या आरटीआयला (माहिती अधिकार) ऑनलाइनच्या कक्षेत आणले जात आहे. त्याची सुरुवात 26 जानेवारीपासुन राज्यभर केली जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘ला ला लॅंड’ या चित्रपटाला “गोल्डन ग्लोब” पुरस्कार :
- ‘ला ला लॅंड’ या बहुचर्चित चित्रपटाने तब्बल सात “गोल्डन ग्लोब” पुरस्कार मिळवित नवा विक्रम रचला आहे.
- किंबहुना ‘दिग्दर्शन, पटकथा, संगीत’ अशा ज्या ज्या क्षेत्रांत या चित्रपटास नामांकन मिळाले, त्या सर्व क्षेत्रांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली.
- तसेच या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका केलेल्या एमा स्टोन व रायन गोसलिंग या अभिनेत्यांनीही गोल्डन ग्लोबवर नाव कोरण्यात यश मिळविले.
- ला ला लॅंडशिवाय ‘मूनलाईट’ या चित्रपटानेही ‘बेस्ट ड्रामा पुरस्कार’ मिळविण्यात यश मिळविले.
- दी नाईट मॅनेजर आणि दी क्राऊन या मालिकांत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यांनाही गोल्डन ग्लोबने गौरविण्यात आले.
- ‘हॉलिवूड फॉरिन प्रेस असोसिएशन’तर्फे गोल्डन ग्लोब पुरस्कार घोषित केले जातात.
भारतीय वंशाचे राज शहा यांची अमेरिकेत उपसहायकपदी निवड :
- अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले राज शहा यांना व्हाईट हाऊसमध्ये महत्वाच्या पदावर नियुक्त केले आहे.
- तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे उपसहायक व संशोधक संचालक म्हणून राज शहा यांची निवड करण्यात आली.
- सध्या राज शहा हे रिपब्लिकन राष्ट्रीय समतीच्या ‘अपोझिशन रिसर्च’चे प्रमुख आहेत.
विदेशात कॅन्सरवरील औषध लोकांसाठी उपलब्ध :
- कॅन्सरच्या पेशींना विरघळून टाकणारे औषध आजपासून ऑस्ट्रेलियातील लोकांना उपलब्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- ऑगस्ट 2016 मध्ये अमेरिकेत या औषधाला परवानगी मिळाल्यानंतर या औषधाचा वापर लोकांसाठी सुरू झाला होता.
- मेलबर्नमध्ये व्हेनेटोक्लॅक्सतर्फे या औषधाची निर्मिती करण्यात आली असून, “व्हेनक्लेक्स्टा” या नावाने त्याची विक्री केली जात आहे.
- ज्या रुग्णांना कॅन्सरच्या अन्य औषधोपचारांचा उपयोग होत नाही, अशांसाठी हे औषध वापरले जाते.
- थेराप्युटिक गुड्स ऍडमिनिस्ट्रेशनने (टीजीए) हे औषध लोकांना वापरण्यास परवानगी दिली आहे. गेल्या 30 वर्षांपासून या औषधाचा शोध सुरू होता.
दिनविशेष :
- मराठीतील विख्यात साहित्यिक व ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते विष्णु सखाराम खांडेकर (वि.स. खांडेकर) यांचा जन्म 11 जानेवारी 1898 रोजी झाला.
- 11 जानेवारी 1916 रोजी नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
- सन 1922 मध्ये मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा