Current Affairs of 10 January 2017 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जानेवारी 2017)

चालू घडामोडी (10 जानेवारी 2017)

झाकीर हुसेन यांना एस डी बर्मन पुरस्कार जाहीर :

 • 15 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन व ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
 • तसेच याबरोबर, संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन यांना “एस.डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव पुरस्कार” जाहीर झाला आहे.
 • महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी 9 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
 • अपर्णा सेन प्रतिथयश अभिनेत्री, चित्रपट निर्मात्या असून त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. याशिवाय त्यांना चित्रपट क्षेत्रामधील राष्ट्रीय पातळीवरील तीन पुरस्कार मिळाले आहेत.
 • तीन कन्या (1961) या चित्रपटामधून पदार्पण करणाऱ्या सेन यांनी अपरिचितो या चित्रपटामधून जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते.
 • 36 चौरंगी लेन या चित्रपटासाठी 1981 मध्ये त्यांना राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्तम दिग्दर्शकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
 • महोत्सवाचे उद्घाटन येत्या 12 जानेवारी रोजी दुपारी 4.30 वाजता सिटी प्राइड (कोथरूड) चित्रपटगृहामध्ये होणार आहे.

रोनाल्डोला फिफा 2016चा उत्कृष्ट खेळाडू पुरस्कार :

 • फिफा संघटनेतर्फे दिल्या जाणार्‍या उत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने ख्रिस्तीयानो रोनाल्डोला सन्मानित करण्यात आले.
 • फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फॅन्टीनो यांच्या हस्ते त्याने हा पुरस्कार स्वीकारला.
 • 2016 मधील उत्कृष्ट फुटबॉल खेळाडूच्या शर्यतीत रोनाल्डोला फ्रान्सच्या अँन्टोनी ग्रीजमन व अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सी या प्रमुख खेळाडूंचे आव्हान होते. या दोन्ही खेळाडूंना मात देत त्याने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला.
 • रोनाल्डोने यापूर्वी बॅलन डीओर पुरस्कारही पटकावला होता. पोर्तुगाल संघाच्या युरो चषक स्पर्धेतील विजयामध्ये रोनाल्डोने महत्वाची भूमिका बजावली होती.
 • उत्कृष्ट रेफ्री म्हणून इटलीच्या क्लाऊडीओ रेनोडी यांना फिफाने याच कार्यक्रमात सन्मानित केले. त्यांनी फ्रान्सच्या झिनेदीन जिदानला मागे टाकून हा पुरस्कार पटकावला.

एन.डी. पाटील यांना ‘सांगली भूषण’ पुरस्कार :

 • 2016 या वर्षीचा ‘सांगली भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत, रयत शिक्षण संस्थेचे कार्यवाह, माजी मंत्री प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांना दिला जाणार आहे.
 • तसेच या पुरस्काराचे स्वरूप पंचवीस हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.
 • विश्वजागृती मंडळाचे अध्यक्ष अरुण दांडेकर हे आहेत. विश्वजागृती मंडळातर्फे गेल्या 19 वर्षांपासून सांगली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या व्यक्तीस ‘सांगली भूषण’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

कल्याण कृष्णमुर्ती हे फ्लिपकार्टचे नवे सीईओ :

 • इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टच्या व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
 • टायगर ग्लोबलचे माजी अधिकारी कल्याण कृष्णमुर्ती यांची फ्लिपकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) म्हणून बिन्नी बन्सल यांच्याजागी नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तसेच बिन्नी बन्सल यांच्यासाठी नव्या पदाची निर्मिती करून त्यांना ग्रुप सीईओ बनवण्यात आले आहे. व्यवस्थापनेतील पुनर्रचनेअंतर्गत हे बदल करण्यात आले आहेत.
 • जून 2016 मध्ये टायगर ग्लोबल सोडून कृष्णमुर्ती हे फ्लिपकार्टमध्ये आले होते. वाणिज्य प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 • टायगर ग्लोबल फ्लिपकार्टमधील सर्वात मोठा गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आहे.

दिनविशेष :    

 • इंग्लडने 10 जानेवारी 1840 रोजी पेनी पोस्ट सेवा सुरु केली.
 • भारतीय स्वातंत्र्यसैनिकमराठी साहित्यिक काकासाहेब तथा नरहर विष्णु गाडगीळ यांचा जन्म 10 जानेवारी 1896 रोजी झाला.  
 • 10 जानेवारी 1920 रोजी जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.