Current Affairs of 10 May 2016 For MPSC Exams
चालू घडामोडी (10 मे 2016)
नोवाक जोकोविचला माद्रिद ओपन मास्टर्स किताब :
- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने ब्रिटनच्या अॅण्डी मरेलाचा अंतिम फेरीत पराभव करून 29 वेळा माद्रिद ओपन मास्टर्स किताब जिंकण्याची कामगिरी केली आहे.
- अंतिम फेरीत जोकोविचने मरेला 6-2, 3-6, 6-3 असे नमवून जेतेपदावर मोहोर उमटवली.
- जोकोविचचे या वर्षातील हे पाचवे जेतेपद ठरले आहे. यापूर्वी कतार ओपन, इंडियन वेल्स, मियामी ओपन व ऑस्ट्रेलियन ओपन किताब संपादन केला होता.
- मरेने उपांत्य फेरीत स्पेनच्या राफेल नदालला, तर जोकोविचने केई निशिकोरी याला नमवून अंतिम फेरी गाठली होती.
- नदालला विजेतेपदाचा दावेदार मानण्यात येत होते. मात्र, मरेने त्याचे आव्हान परतवून लावत आपणच किताब राखणार असल्याचे संकेत दिले.
Must Read (नक्की वाचा):
देशातील 56 हजार गावे मोबाईलने जोडली जाणार :
- दूरसंचार विभाग देशातील 55 हजार 669 गावांमध्ये मार्च 2019 पर्यंत टप्प्याटप्प्याने मोबाईल सेवा पुरवणार आहे.
- दूरसंचार विभागाकडून नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
- युती सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने दूरसंचार विभागातील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- तसेच या अहवालानुसार ईशान्य भारतात आठ हजार 621 गावांमध्ये 321 मोबाईल मनोऱ्यांच्या मदतीने सप्टेंबर 2017 पर्यंत मोबाईल सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
- ईशान्य भारतातील मोबाईल कनेक्टिव्हिटीसाठी आतापर्यंत पाच हजार 336 कोटींची दूरसंचार विकास योजना याआधीच मंजूर करण्यात आली आहे.
- ग्रामीण भारताला हायस्पीड ब्रॉडबॅण्डसोबत कनेक्ट करण्यासाठी 48 हजार 199 ग्रामपंचायती एप्रिल 2016 अखेरपर्यंत ऑप्टिक फायबरने जोडण्यात आल्या आहेत.
- अतिशय दुर्गम भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी केंद्र सरकारने भारतनेट प्रकल्प मिशन मोड म्हणून हाती घेतला आहे.
- तसेच त्यामध्ये अडीच लाख ग्रामपंचायतीमधील सुमारे साठ कोटी नागरिक “डिजिटली कनेक्ट” होतील.
- भारतनेटच्या माध्यमातून ई-गव्हर्नन्स सेवा, ई-कॉमर्स, टेली मेडिसीन, टेली एज्युकेशन, आर्थिक व्यवहार यांसारख्या सेवा तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोचतील.
- डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे रोजगाराच्या संधीदेखील ग्रामीण पातळीवर मिळणे शक्य होईल, असा विश्वास दूरसंचार विभागाने अहवालातून व्यक्त केला आहे.
अद्भुत खगोलीय दृश्य सूर्यावर काळा डाग :
- बुधाचा काळा ठिपका सूर्याच्या पृष्ठभागावरून सरकत असल्याचे अनोखे खगोलीय दृश्य (दि.9) बघायला मिळाले.
- दहा वर्षांच्या कालखंडानंतर आलेली बुध पारगमन किंवा अधिक्रमणाची ही दुर्मीळ घटना खगोलप्रेमींसाठी अनोखी मेजवानी ठरली.
- काय असते बुधाचे अधिक्रमण –
- (दि.9) संध्याकाळी 4.40 वाजता बुधाच्या पारगमनाला प्रारंभ झाला.
- तसेच हे दृश्य शतकातून केवळ 13-14 वेळा दिसते.
- भारतात 10 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग जुळून आला.
- युरोप, आफ्रिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्क्टिक, उत्तर अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागराच्या (पॅसिफिक) भागातही हे दृश्य दिसले.
- बुधाचे अधिक्रमण –
- 15 नोव्हेंबर 1999
- 7 मे 2003
- 8 नोव्हेंबर 2006
जगातील पहिला होलोग्राफिक स्मार्टफोन :
- त्रिमिती दृश्यचित्रफिती व प्रतिमा कुठलाही चष्मा किंवा अन्य साधनाचा वापर न करता बघता येतील, असा होलोग्राफिक स्मार्टफोन जगात प्रथमच तयार करण्यात आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. हा स्मार्टफोन लवचिक आहे.
- होलोफ्लेक्स असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याच्या मदतीने कुठलेही बाह्य़ साधन न वापरता त्रिमिती प्रतिमा व चित्रपट पाहता येतात.
- होलोफ्लेक्समुळे स्मार्टफोनबरोबरच्या आंतरक्रिया बदलणार असून त्यामुळे वापरकर्त्यांच्या हालचालींना मर्यादा राहणार नाहीत, असे कॅनडातील क्विन्स विद्यापीठाचे रोएर व्हेर्टेगाल यांनी सांगितले.
- होलोफ्लेक्स स्मार्टफोनमध्ये 1920 गुणिले 1080 इतके उच्च विवर्तन असून त्यातील लाइट एमिटिंग डायोड लवचिक आहेत.
- तसेच त्यांना फ्लेक्सिबल ऑरगॅनिक लाइट एमिटिंग डायोड असे म्हणतात. त्यांचा वापर स्पर्श पडद्यात करण्यात आला आहे.
- होलोफ्लेक्समध्ये लवचिक सेन्सर असून त्यामुळे वापरकर्ते फोन वाकवू शकतात, झेड अक्षावर वस्तू फिरत असल्याचा आभास त्यात होईल.
- व्हेरटेगाल यांनी सांगितले की, होलोफ्लेक्स तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग आहेत.
- त्रिमिती प्रारूपे वापरून त्याप्रमाणे वस्तू तयार करणे शक्य होणार आहे.
- विशिष्ट कॅमेरा वापरून होलोग्राफिक व्हिडिओ कॉन्फरन्सेस घेता येतील.
गांधीलमाशीच्या नव्या प्रजातीस ब्रॅड पीट्सचे नाव :
- वैज्ञानिकांनी भारत व दक्षिण आफ्रिकेत गांधीलमाश्यांच्या दोन नवीन प्रजाती शोधल्या असून त्यातील एका प्रजातीला हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट याचे नाव देण्यात आले आहे.
- गांधील माश्यांच्या नव्या प्रजातीचे नाव कोनोब्रेगमा ब्रॅडपिटी असे ठेवले असून या माश्या पतंग व फुलपाखरांच्या अळ्यांवर वाढतात.
- तसेच या माश्या त्यांच्या यजमानाच्या शरीरात अंडी घालतात व नंतर त्यापासून नवीन माश्या तयार होऊन त्या ममीभूत अळीतून बाहेर पडतात.
- या गांधीलमाश्यांचे वर्तन प्राणघातक असले तरी त्या शेतीसाठी फार उपकारक असतात. त्यांच्यामुळे जैवनियंत्रणाची क्रिया साधली जाते.
- संतोष श्रीविहार व अवुनजीकट्टू परामबिल रणजिथ या केरळच्या कालिकत विद्यापीठातील दोघांनी माश्यांच्या या प्रजाती शोधल्या आहेत.
- तसेच त्यांनी शोधलेली आणखी दुसरी एक प्रजाती आहे ती परोपजीवीच असून भारतात या प्रजातीतील उपप्रजातीची ही माशी प्रथमच सापली आहे.
- नवीन माशीला नाव शोधत असताना थायलंडच्या चुलालोंगकोर्न विद्यापीठातील भूंतिका ए ब्यूटचर यांनी ब्रॅड पीटचे नाव देण्याचे ठरवले.
यंत्रमानवही विद्यापीठ प्रवेश परीक्षा देणार :
- यंत्रमानवाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रदान करता येते त्याला काही मर्यादा असल्या तरी विविध क्षेत्रांत त्यांचा वापर वाढत आहे.
- चीनमध्ये यंत्रमानवाला राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर बसवले जाणार आहे.
- विद्यापीठ प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या या प्रवेश परीक्षेस बसण्याची संधी त्याला पुढील वर्षी दिली जाणार आहे.
- विशिष्ट पद्धतीने तयार केलेला हा यंत्रमानव गणित, चिनी भाषा, मुक्त कलांची र्सवकष चाचणी अशा तीन परीक्षा देणार असून त्यात इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल हे विषय असणार आहेत, असे चेंगडू येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिन हुई यांनी म्हटले आहे.
- यंत्रमानवाला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ठराविक वेळेत उत्तरे लिहून पूर्ण करावी लागणार आहेत, बंद खोलीत परीक्षा घेतली जाणार असून, त्या वेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व नोटरी यांची उपस्थिती राहील.
- यंत्रमानव एका प्रिंटरला जोडलेला असेल, त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीची प्रश्नपत्रिका दिली जाईल.
- अर्थात, ती इतर मुलांना मिळेल तेव्हाच त्यालाही लोड केली जाणार आहे.
- यंत्रमानवाचा इंटरनेटशी काही संबंध असणार नाही, त्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्न राहणार नाही.
- हा यंत्रमानव त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आज्ञावलीच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे देईल असे चायना डेलीने म्हटले आहे.
दिनविशेष :
- मायक्रोनेशिया संविधान दिन.
- दक्षिण कोरिया पालक दिन.
- मेक्सिको मातृ दिन.
- महाराष्ट्र जलसंधारण दिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा