Current Affairs of 9 May 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (9 मे 2016)

चालू घडामोडी (9 मे 2016)

‘112’ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित :

 • कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास केवळ एकाच क्रमांकावर दुरध्वनी करुन मदत मिळविण्याची सोय आता 1 जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे.
 • अमेरिका, कॅनडा व ब्रिटनमध्ये ज्याप्रमाणे आपत्कालीन क्रमांक अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे भारतातही ‘112‘ हा राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 • दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) सरकारी दूरसंचार समितीने मंजुरी दिली.
 • दूरसंचार मंत्रालयाने एकच आपत्कालीन क्रमांक ठेवण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
 • अमेरिका आणि कॅनडामध्ये ‘911’ आणि ब्रिटनमध्ये ‘999’ हा क्रमांक राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक म्हणून वापरला जातो.
 • तसेच या धर्तीवर भारतातही ट्रायने राष्ट्रीय स्तरावर एक क्रमांक आपत्कालीन स्थितीत नागरिकांना वापरता यावा, यासाठी विचार केला होता.
 • भारतात 100 (पोलिस), 101 (अग्निशामन), 102 (रुग्णवाहिका) आणि 108 (आपत्ती व्यवस्थापन) या क्रमांकांचा वापर करण्यात येतो.
 • पण, आता या सर्व सुविधा ‘112’ क्रमांकावर उपलब्ध होणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मे 2016)

जगभरात ‘पासवर्ड दिन’ साजरा :

 • जगभरात 5 मे हा दिवस ‘पासवर्ड दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 • चांगला आणि सुरक्षित पासवर्ड वापरण्याच्या सवयी नेटकरांमध्ये रुजवणे, हा यामागील उद्देश आहे.
 • स्मार्टफोनच्या मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे आता इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांचा टक्का चांगलाच वाढला आहे.
 • पण ग्राहकांच्या नियमित आणि चुकीच्या सवयींमुळे अनेकदा माहिती चोरीला जाणे, अकाउंट हॅक होणे यासारखे प्रकार सुरूच आहेत.
 • 2016 या वर्षातील कमकुवत पासवर्डची यादी नुकतीच जाहीर झाली आहे.

ऋषिकेश श्रीवासची महाराष्ट्र हॉकी संघात निवड :

 • मणिपूरमधील इम्फाळ येथे 8 ते 16 मे या कालावधीत आयोजित राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता अकोला येथील ऋषिकेश आनंद श्रीवास याची निवड झाली आहे.
 • ऋषिकेश स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
 • पुणे येथे 27 ते 30 मार्च या कालावधीत महाराष्ट्र हॉकी असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र संघ निवड चाचणी आयोजित केली होती.
 • तसेच यामधून नोएल स्कूलचा विद्यार्थी व अकोला हॉकी असोसिएशनचा खेळाडू ऋषिकेश श्रीवास याने उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्‍चित केले.
 • महाराष्ट्र संघाचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर 27 एप्रिल ते 7 मे या कालावधीत पुणे येथे आयोजत केले होते.
 • ऋषिकेशने याआधी राष्ट्रीय व राज्यस्तर हॉकी स्पर्धा गाजविल्या आहेत.

माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत सिमोना हालेपला विजेतेपद :

 • जागतिक टेनिसमधील सातव्या क्रमांकाची रोमानियाच्या सिमोना हालेपने चमकदार कामगिरी करताना माद्रिद मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिलांच्या एकेरी गटाचे विजेतेपद उंचावले.
 • अंतिम सामन्यात एकहाती वर्चस्व राखताना हालेपने स्लोवाकियाच्या डोमिनिका सिबुकोवाचे आव्हान 2-0 असे सहजपणे परतावले.
 • सुमारे दीड तास रंगलेल्या अंतिम सामन्यात हालेपने सिबुकोवाला आपला खेळ करण्याची क्वचितच संधी दिली.
 • आक्रमक व ताकदवर फटक्यांची बरसात करताना हालेपने सिबुकोवाचा पराभव करताना 6-2, 6-4 असा दणदणीत विजय मिळवला.
 • विशेष म्हणजे मागील 14 महिन्यांत हालेपचे हे पहिलेच डब्ल्यूटीए विजेतेपद ठरले.
 • तसेच हालेपने कारकिर्दीत एकूण 12 वे जेतेपदही पटकावले.

8 मे पासून ‘जलमित्र अभियान’ ला सुरुवात :

 • सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता वर्तमान आणि भविष्यासाठी पाण्याचा थेंब अन् थेंब वाचविणे गरजेचे असून, यासंदर्भात ‘लोकमत’चे वाचक आणि नागरिकांमध्ये जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने हाती घेतलेल्या राज्यव्यापी जलमित्र अभियानास रविवार दि. 8 मेपासून प्रारंभ झाले.
 • सहा आठवड्यांच्या या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांसह व्यावसायिक, विद्यार्थी आणि सेलिब्रिटीज सहभागी होणार आहेत.
 • महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि देशातील 40 टक्के प्रदेशावर सध्या जलसंकट ओढावले आहे.
 • तसेच या स्थितीत पाण्याची बचत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे; पण समाजात आजवर यासंदर्भात नेमकेपणाने जागरुकता निर्माण केली गेली नाही.
 • या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने जलसाक्षरतेसाठी जलमित्र अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे.
 • सहा आठवड्यांच्या या अभियानात पहिल्या सप्ताहामध्ये ‘लोकमत’ च्या अंकात पाण्याचे महत्त्व आणि जलसाक्षरतेबाबत जनजागरण करणाऱ्या जाहिराती प्रसिद्धी करण्यात येणार आहेत.
 • ‘लोकमत डॉट कॉम’ आणि सोशल मीडिया विशेषत: फेसबुक, टिष्ट्वटरवरून जलबचतीसाठी जागृती करण्यात येईल.

वासुदेव कामत यांना पुरस्काराने सन्मानित :

 • जागतिक ख्यातीचे भारतीय चित्रकार वासुदेव कामत यांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेने सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार दिला आहे.
 • जे चित्रकार पोर्ट्रेट पेंटर म्हणून अविरतपणे निर्मिती करीत आहेत, या विषयाचे प्रशिक्षण देत आहेत, अशांना पोर्ट्रेट सोसायटी ऑफ अमेरिकेतर्फे सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप हा पुरस्कार देण्यात येतो.
 • चित्र व शिल्पकला क्षेत्रात पोर्ट्रेटला प्रोत्साहन देणारी ही आंतरराष्ट्रीय संस्था असून, जगभरातील अनेक नामवंत पेंटर्स या संस्थेचे सभासद आहेत.
 • दर चार वर्षांनी होणाऱ्या या संस्थेच्या परिषदेत जगातील 700 ते 800 कलाकार सहभागी होत असतात.
 • तसेच त्यातील आंतरराष्ट्रीय पोर्ट्रेट स्पर्धेतही हजारो कलाकारांचा सहभाग असतो. त्यातील अंतिम विजेत्यांची चित्रे प्रदर्शनात प्रदर्शित केली जातात.
 • कामत यांच्या माय वाइफ या पोर्ट्रेटला 2006 साली ड्रेपर ग्रँड प्राइझ या पुरस्काराने गौरवले होते.
 • तसेच यंदा एप्रिलमध्ये झालेल्या परिषदेत त्यांना सिग्नेचर स्टेट्स मेंबरशिप या पुरस्काराने गौरविले.

दिनविशेष :

 • 1781 : जॉर्ज स्टिफन्सन, आगगाडीचा जनक याचा जन्म.
 • 1890 : गिरणी कामगारांची रविवारच्या साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टी सुरुवात झाली.
 • 1947 : किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी यांचा जन्म.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मे 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.