Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

Current Affairs of 10 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 जून 2016)

चालू घडामोडी (10 जून 2016)

नगरपालिकांची ऑनलाइन सेवा उपलब्ध होणार :

 • राज्य सरकारच्या विविध विभागाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांचे आधार क्रमांक जोडण्यात येणार असून, येत्या 2 ऑक्‍टोबरपासून नगरपालिकेच्या विविध सेवा ऑनलाइन देण्यात येणार आहेत.
 • माहिती तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक (दि.8) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
 • फडणवीस म्हणाले, की राज्यात नगरपालिकेतर्फे देण्यात येणारे विविध दाखले, प्रमाणपत्रे, परवाने 2 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन देण्याची कार्यवाही सुरू करावी, तसेच वैद्यकीय विभागातील सेवा एकाच ठिकाणाहून देता याव्यात यासाठी ‘क्‍लाऊड बेस सिस्टिम’चा उपयोग करावा.
 • सर्व योजनांतील वैयक्तिक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक घेऊन त्याची पडताळणी ई-केवायसी पद्धतीने करण्यात यावी.
 • शिधावाटप करण्यासाठी आधार प्रणालीवर आधारित बायोमेट्रिक पद्धती तातडीने संपूर्ण राज्यात राबवावी, असा आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
 • पुढील काळात आधार कार्ड नोंदणी ही सहा वर्षे वयोगटातील बालकांसाठी राबवावी.
 • रुग्णालये, शाळा व अंगणवाडी येथे नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. यासाठी अंगणवाडी परीक्षकांना टॅबलेट देण्यात यावेत.
 • तसेच सहा महिन्यांतून एकदा अंगणवाडीच्या ठिकाणी आधार नोंदणी शिबिर घेण्यात यावेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जून 2016)

भारतीय लेखक अखिल शर्मा यांना युरो पुरस्कार : 

 • भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला असून, एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 • आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.
 • दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत.
 • तसेच त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी 2015 मध्ये 40 हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता.
 • डब्लिन पुरस्कारासाठी 160 नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली.
 • ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना 13 वर्षे लागली.

तमिळनाडूमध्ये ‘टीएनपीएल’ क्रिकेट स्पर्धा आयोजित :

 • ‘इंडियन प्रीमियर लिग’ क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच आता तमिळनाडूमध्येही तमिळनाडू प्रीमियर लिग (टीएनपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे तमिळनाडू क्रिकेट संघटनेने जाहीर केले आहे.
 • स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीएनपीएल आयोजित करण्यात येणार आहे.
 • तसेच या मागे (टीएनपीएल) दोन उद्देश आहेत.
 • एक म्हणजे तमिळनाडूमधील खेळाडूंना त्यांच्यातील प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.  त्यामुळे आयपीएल किंवा इतर कोणतीही टीम त्यांना संधी उपलब्ध करून देऊ शकेल आणि त्यांचे भविष्य घडेल.
 • दुसरे म्हणजे क्रिकेट हा केवळ शहरातील खेळ असून चेन्नईपुरताच मर्यादित असल्याचे समज दूर होऊन तमिळनाडूतील प्रत्येक जिल्ह्यांत क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल.
 • अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे सदस्य एन. श्रीनिवासन यांनी दिली.

मोबाइल फोनमध्ये येणार पॅनिक बटन सुविधा :

 • आपत्कालीन स्थितीत साह्यभूत व्हावे, यासाठी सर्व मोबाइल फोनमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देऊ शकणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या सूचना सरकारने मोबाइल उत्पादक कंपन्यांना केली आहे.
 • दूरसंचार विभागाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे.
 • तसेच या आधी विभागाने कंपन्यांना 1 जानेवारी 2017 नंतर विकणाऱ्या सर्व फोनमध्ये ही सुविधा देण्याचे आदेश दिले होते.
 • आता सध्या अस्तित्वात असलेल्या फोनमध्येच ही सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे.
 • हँडसेट उत्पादक कंपन्यांना दिलेल्या निर्देशांत दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, सध्या ग्राहकांकडे असलेल्या हँडसेटमध्ये पॅनिक बटनसारखी सुविधा देणारे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ विक्री केंद्रांवर व्यवस्था करण्यात यावी.
 • जारी आदेशानुसार की-पॅडवरील 5 किंवा 9 क्रमांकाचे बटन दाबल्यास आपत्कालीन क्रमांक 112 वर फोन लागेल.
 • 112 हा आपत्कालीन क्रमांक 1 जानेवारीपासून कार्यान्वित होणार आहे.

भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्रप्रणाली देणार :

 • भारत व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ ही अत्याधुनिक क्रूझ क्षेपणास्त्रप्रणाली विकणार आहे.
 • शस्त्रास्त्र आयातीमध्ये जगात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या भारताने आता शस्त्रास्त्र निर्यातीकडे लक्ष पुरविण्यास सुरवात केली आहे.
 • व्हिएतनामसह आणखी पंधरा देशांना ही अत्याधुनिक क्षेपणास्त्रे निर्यात करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
 • चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्याच्या दृष्टीनेही भारताने पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
 • व्हिएतनामला ‘ब्राह्मोस’ निर्यात करण्याच्या निर्णयाकडे या नजरेतूनही पाहिले जात आहे.
 • भारत व रशियाच्या संयुक्त विद्यमाने ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे.
 • केंद्रातील मोदी सरकारने नुकतीच रशियाकडे ‘ब्राह्मोस’ एरोस्पेसची मागणी केली आहे.
 • तसेच या एरोस्पेसमधूनच क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते.
 • अत्याधुनिक क्षेपणास्त्र
 • ध्वनीच्या तिप्पट वेगवान असलेली ब्राह्मोस ही क्षेपणास्त्रप्रणाली सध्या जगातील सर्वांत अत्याधुनिक मानली जाते.
 • 290 किलोमीटर मारा करण्याची क्षमता असलेले ‘ब्राह्मोस’ हे क्षेपणास्त्र जमीन व समुद्र तसेच पाणबुडीवरून डागता येते.
 • हवेतून मारा करण्याबाबत सध्या ‘ब्राह्मोस’च्या चाचण्या सुरू आहेत.

भारताला मेक्सिकोचा विधायक पाठिंबा :

 • आण्विक पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोने (दि.9) पाठिंबा दिला.
 • 48 देश सदस्य असलेल्या एनएसजीचे खुले अधिवेशन होत असून, त्या पार्श्वभूमीवर मेक्सिकोचा पाठिंबा महत्त्वाचा आहे.
 • तसेच या गटातील सदस्य देश आपापसांत अणू तंत्रज्ञानाचा व्यापार व निर्यात करू शकतात.
 • मेक्सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना निएतो यांनी एनएसजीचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.
 • सदस्यत्व मिळण्यासाठी भारताच्या प्रयत्नांना मेक्सिकोचा सकारात्मक आणि विधायक पाठिंबा असल्याचे निएतो यांनी मोदी यांच्यासोबत घेतलेल्या परिषदेत सांगितले.

दिनविशेष :

 • 1924 : जागतिक दृष्टीदान दिन.
 • 1966 : ‘मिग’ या जातीच्या विमानांची नाशिक येथे निर्मिती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जून 2016)

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World