Current Affairs of 4 June 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (4 जून 2016)

चालू घडामोडी (4 जून 2016)

सर्वोच्च दहा नेत्यांमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश :

 • पंतप्रधानांच्या परदेश वाऱ्यांवर विरोधकांकडून टीका-टिप्पणी केली जाते. यावर जागतिक पातळीवर ज्यांचे विचार ऐकले जातात, त्या दहा प्रमुख नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
 • भारताला आता जागतिक पातळीवर ओळख मिळाली असून, जगभरात मान दिला जात आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत प्रत्येक देशातून होत आहे.
 • तसेच त्यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या योजनांची महती परदेशांत पोचली असून, जागतिक पातळीवरील पहिल्या दहा नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
 • भारताला ज्या पद्धतीने मोदी यांनी विकासाच्या वाटेवर आणले आहे, त्याचे जगभरात कौतुक होत आहे.
 • ‘ब्रिक्‍स’ परिषदेचे नेतृत्व भारताने यंदा प्रथमच केले.
 • तसेच मोदी यांच्या सूचनेवरून संयुक्त राष्ट्र संघटनेने ‘जागतिक योग दिन’ जाहीर केला.
 • 196 देशांनी त्यास मान्यता दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 जून 2016)

इंटरनेटच्या प्रसारात भारत हा जगातील ‘ब्राईट स्पॉट’ :

 • संपूर्ण जगाला एकत्र जोडणाऱ्या इंटरनेटच्या प्रसारामध्ये सध्या भारत हाच जगातील ‘ब्राईट स्पॉट’ असल्याचे ‘इंटरनेट ट्रेंड्‌स 2016’ या अहवालातून समोर आले आहे.
 • तसेच गेल्या वर्षभरात भारतातील इंटरनेट यूझर्सच्या संख्येत 40 टक्‍क्‍यांनी वाढ झाली.
 • या अहवालानुसार, इंटरनेट यूझर्सच्या संख्येत आता भारताने अमेरिकेला मागे टाकले असून, अव्वल क्रमांकावर चीन आहे.
 • विशेष म्हणजे, 2014 मध्ये यूझर्सच्या संख्येत 33 टक्‍क्‍यांनी वाढ झाली होती. या टक्केवारीत वाढ होणारा भारत हा एकमेव देश आहे.
 • भारतातील इंटरनेटवर आधारित अर्थव्यवस्था 2018 पर्यंत एक लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल, असा अंदाज ‘बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप’ आणि ‘आयएएमएआय’ यांनी काही महिन्यांपूर्वीच व्यक्त केला होता.

‘आयओसी’कडून नीता अंबानी यांना नामांकन :

 • भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या सहमालकीन नीता अंबानी यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीसाठी (आयओसी) नामांकन मिळाले आहे.
 • आयओसीच्या 129 व्या सत्राची निवडणूक ब्राझीलमधील रिओ डी जेनेरियो येथे 2 ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
 • आयओसी सदस्यांच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड प्रक्रिया नव्या पद्धतीने होते.
 • तसेच ही प्रक्रिया ऑलिम्पिक अजेंडा 2020 च्या सूचनांवर आधारित असून यामध्ये एकदा निवडून आल्यानंतर ती व्यक्ती वयाच्या 70व्या वर्षांपर्यंत सदस्य राहू शकते.

मेट्रो 4 च्या प्रकल्प अहवालास मंजूरी :

 • वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रो 4 च्या विस्तृत प्रकल्प अहवालास (डीपीआर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.3) एमएमआरडीएच्या बैठकीत मंजुरी दिली.
 • दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने हा अहवाल तयार केला आहे.
 • तसेच हा प्रकल्प 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.
 • या प्रकल्पाचा प्रकूण खर्च 14,549 कोटी रुपये असून त्यामुळे ठाणे व मुंबई शहर एकमेकांना जोडले जाणार आहेत.
 • प्रकल्प अहवालात एमएमआरडीएची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याची तसेच या प्रकल्पास निकडीचा सार्वजनिक प्रकल्प- महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठीची बिनविरोध निवडणूक :

 • राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
 • राज्यसभेच्या निवडणुकीत असलेले 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
 • आंध्र प्रदेशमधून रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे.
 • मिसा भारती आणि राम जेठमलानी यांचीही राज्यसभेसाठी निवड झाली आहे.
 • भाजपचे नेते आणि केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.
 • तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचीही राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.
 • राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, भाजपाचे विनय सहस्रबुद्धे आणि विकास महात्मे यांची राज्यसभेवर दुस-यांचा वर्णी लागली आहे.
 • तर शिवसेनेच्या संजय राऊत यांची राज्यसभेवर निवड झाली असून, ते पुन्हा एकदा खासदार झाले आहेत.

दिनविशेष :

 • हुतात्मा दिन.
 • विश्व निष्पाप बालक व आक्रमणपीडित दिन.
 • फिनलंड सेना दिन.
 • 1941 : राष्ट्र सेवादल दिवस.
 • 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 जून 2016)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.