Current Affairs of 10 December 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (10 डिसेंबर 2015)

चालू घडामोडी (10 डिसेंबर 2015)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा :

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या वर्षी पाकिस्तानचा दौरा करतील, अशी माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.Narendra Modi
 • ‘हार्ट ऑफ एशिया’ या परिषदेत स्वराज सहभागी झाल्या आहेत. पत्रकारांशी बोलताना स्वराज म्हणाल्या, ‘मोदी दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य शिखर परिषदेत (सार्क) सहभागी होणार असून, पुढील वर्षी ते पाकिस्तानचा दौरा करणार आहेत.
 • सन 2012 नंतर प्रथमच भारताच्या परराष्ट्र मंत्री पाकिस्तान दौऱयावर गेल्या आहेत तर एस. एम. कृष्णा यांनी 2012 मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता.

बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत भारत चौथा :

 • बेकायदेशीर मार्गाने पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या क्रमवारीत जगात भारताचा क्रमांक चौथा आहे.
 • भारतातून 2004 ते 2013 दरम्यान दरवर्षी 51 अब्ज डॉलर रकमेचा ओघ बाहेर पडला आहे, अशी माहिती एका थिंक टँकच्या अहवालानुसार समोर आली आहे.  
 • अमेरिकेतील ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी या थिंक टँकच्या अहवालानुसार, बेकायदेशीररित्या पैसा बाहेर जाणाऱ्या देशांच्या यादीत चीनचा पहिला क्रमांक लागतो.
 • चीनमधून 2004 पासून 2013 पर्यंत दर वर्षाला 139 अब्ज डॉलरची रक्कम बाहेर गेली आहे. त्यापाठोपाठ रशिया (104 अब्ज डॉलर) व मेक्सिको (52.8 अब्ज डॉलर) या देशांमधून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा परदेशात पाठवण्यात आला आहे.

साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार पीयूष सिंग यांच्याकडे :

 • 385 कोटी रुपयांच्या महाघोटाळ्यात अडकलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आयएएस अधिकारी पीयूष सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला.
 • महामंडळात पहिल्यांदाच आयएएस अधिकाऱ्याला बसविण्यात आले आहे.

MPSC मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय :

 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता मराठी व इंग्रजी विषयांचे पेपर पारंपरिक ऐवजी बहुपर्यायी, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीविधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
 • सदर निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आयोगाच्या संकेतस्थळावर 20 जून 2015 रोजी घोषणा प्रसिद्ध करून या निर्णयाबाबत उमेदवारांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या.या संदर्भात लोकप्रतिनिधींचे निवेदन प्राप्त झाले आहे.
 • आयोगाच्या सदर घोषणेच्या अनुषंगाने प्राप्त सूचना विचारात घेऊ न याबाबत राज्य लोकसेवा आयोगाकडे विचारविनिमय सुरू असल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली.

दाऊदच्या मालकीच्या स्थावर मालमत्ते लिलाव :

 • अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालकीच्या दक्षिण मुंबईतील एका हॉटेलसह देशभरातील ठिकठिकाणच्या सहा स्थावर मालमत्ता व एका मोटारीचा सोमवारी जाहीर लिलाव करण्यात आला.
 • त्यापैकी पाकमोडिया स्ट्रीट येथील हॉटेल रौनक अफरोज तथा दिल्ली जायका अखेर 4 कोटी 28 लाखांना विकण्यात आले.
 • ज्येष्ठ पत्रकार व देशसेवा समिती या स्वयंसेवी संस्थेचे एस. बालाकृष्णन यांनी सर्वाधिक बोली लावत हा लिलाव जिंकला. त्याचप्रमाणे दाऊदची हुंदाई कंपनीची मोटार 32 हजारांना हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी विकत घेतली.
 • माटुंग्यातील फ्लॅट व गुजरातमधील चार शेतजमिनी अनुक्रमे मिलन संघवी, मुकेश शहा, जयदीप डोलनिसा व सुरत येथील राजबहाद्दूर शर्मा यांनी खरेदी केल्या.

एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक :

 • एच 1 बी व्हिसाचे प्रमाण पंधरा हजारांनी कमी करण्याचे विधेयक अमेरिकेच्या दोन सिनेटर्सनी मांडले आहे. हे विधेयक संमत झाल्यास भारतालाही फटका बसू शकतो.
 • डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर बिल नेल्सन व रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर जेफ सेशन्स यांनी हे विधेयक मांडले आहे.
 • दरवर्षी दिल्या जाणाऱ्या एच 1 बी व्हिसात कपात करण्याची मागणी करणारे विधेयक त्यांनी मांडले आहे.
 • पात्र अमेरिकी कर्मचारी उपलब्ध असताना अनेकदा बाहेरच्या देशातून कर्मचारी आणले जातात व त्यांच्याकडून कमी वेतनात काम करून घेतले जाते. सध्या कमाल 85,000 एच 1 बी व्हिसा दिले जातात त्यात वीस हजार व्हिसा विज्ञान व तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणिताचे अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना दिले जातात.
 • भारतातून येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना जास्त प्रमाणात व्हिसा दिला जातो. विधेयकात असे म्हटले आहे की, एच 1बी व्हिसाचे प्रमाण 15 हजारांनी कमी करावे, त्याचबरोबर 70 हजार व्हिसा वाटप करताना जास्त वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना तो द्यावा. त्यामुळे अमेरिकी कंपन्यांना प्रथम हे सिद्ध करावे लागेल की, त्यांनी आधी अमेरिकी कर्मचाऱ्यांना संधी दिली होती.
 • अमेरिकी कर्मचाऱ्याला काढून एच 1 बी व्हिसा असलेल्या कर्मचाऱ्याला घेता येणार नाही.

चेन्नईत चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद :

 • चेन्नईत 1-2 डिसेंबर रोजी चोवीस तासात गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 1901 पासून चोवीस तासात एवढा म्हणजे 20 इंच पाऊस पडण्याची ही पहिलीचNASA वेळ आहे, असे अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे.
 • नासाने चेन्नईच्या पावसाबाबत एक नकाशास्वरूपातील चित्रही जारी केले असून ते उपग्रहाने आग्नेय भारतात 1-2 डिसेंबर रोजी झालेल्या पावसाबाबतचे आहे. दर तीस मिनिटाला उपग्रहाने नोंदलेल्या माहितीच्या आधारे हे चित्र तयार केले आहे.
 • मान्सूननंतर ईशान्य मान्सूनमुळे चेन्नईत पावसाने थैमान घातले होते. तामिळनाडूत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला होता, असे नासाच्या अर्थ ऑब्झर्वेटरीने म्हटले आहे.

दिनविशेष :

 • मानवी हक्क दिन
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.